झाली सुरवात जानेवारीत
गेले पूर्ण जग हादरून
एका वायरस कोरोनाने
महा मारीत केली गणती स्वतःची
सर्व नजरा चीन कडे
खोकून शिंकून
हा हा हाकार उडाला
बघताबघता पसरला
जग व्यापून बसला
कधी जाणार? नाही माहित .
शाळा बंद... बरे झाले!
मॉल बंद... आता कुठे फिरायचे?
होटेल बंद... ब्रह्मचार्यांचे काय?
कॉलेज बंद ,,, भेटायचे कुठे?
बसेस बंद ... नका हो करू
विमाने बंद ... देस भी नाही परदेस भी नाही
झाले दळण वळण बंद ...
कधी उघडणार? नाही माहित
क्रिकेट बंद...
टेनिस बंद.
फुटबॉल बंद ...
खेळ कुदच बंद
व्यायाम बंद .
कधी उघडणार? नाही माहित
लग्न समारंभ बंद
लग्न समारंभ बंद
मोर्चे बद,, सभा बंद ...
भाषण बंद .घोषणा बंदव...
बोलतीच बंद झाली की?
कधी उघडणार? नाही माहित
गाव बंद शहर बंद
झाले राज्यही बंद.
कधी उघडणार? नाही माहित
चीन बंद अमेरिका, स्पेन, जपान, इटाली
अखं युरोप, सर्व जग बंद.?,,,
तुम्ही येऊ नकात
आम्ही पण नाही येणार
पर्यटन बंद !
कधी उघडणार?नाही माहित
कोरोनाला नाही करुणा
मनुष्य हानी करीत राहिलायमदेव देखील थकला!
थकले नाहीत इस्पीतळातील
सेवक. सेविका आणि डॉक्टर
त्यांना करूया वंदन
सेवक. सेविका आणि डॉक्टर
त्यांना करूया वंदन
.