सारे
जग हादरून गेलेय
कोरोना
व्हायरसने.
जगाला
प्रथमच कुलूप
लागले.
अथक
प्रयत्नाने देखील
कुठल्याही देशाला आज पर्यंत
कुठल्याही देशाला आज पर्यंत
ह्या
कुलुपाची चावी बनविण्यास
यश आले
नाही.
एकाहून
एक महान देश थकले
ज्याची
ओरिजिनल चावीच
कोणी
पहिली नाही त्यांना
डूप्लीकेट कशी बनवता येणार.
काय
सांगावे,बनवतील देखील.
असो,
लहान
तोंडी मोठा घास!
“घरातील
टीव्ही लाऊ नका.”
त्यावरील
मृतांची व इतर आकडेमोड
आणि रोज
मरे त्याला कोण रडे असा
लोकांचा
स्वैराचार पहिला तर
उगाचच
धडकी भरते.
जमल्यास, ती वेळ आपआपल्या
आवडी
नुसार सत्कारणी लावा.
असे
रिकामे दिवस पुन्हा येणे नाहीत.
काल मी
नेटवर फेरी मारत असतांना
आपले
लाडके कवी मंगेश पाडगावकरांच्या
चार
ओळी सापडल्या बघा
तुम्हाला
आवडतात का?
१ ‘
प्रत्येकाच्या मनात एक
गोड
गोड गुपित असत,
दरवळणारे
अत्तर जस
इवल्याश्या
कुपीत असते. ‘
२ करून
करून हिशोब धूर्त
खूप
काही मिळेल
पण फुल
का फुलत
हे कसे
कळेल?
३ कोऱ्या
कोऱ्या कागदावर
असल
जरी छापल,
ओठावर
आल्याखेरीज
गाण
नसत आपल
आणि मला आवडलेल्या
चार ओळी
“ सांगा कस जगायचं
कण्हत कण्हत की गाण
म्हणत तुम्हीच ठरवा."
अफाट साहित्याचा समुद्र
आपली अनमोल ठेव
अफाट साहित्याचा समुद्र
आपली अनमोल ठेव
मराठी साहित्य समुद्रातील
मी एक ओंजळ भर जरी साहित्य
वाचले तरी आयुष्याचे सार्थक
झाल्याचे समाधान मला लाभेल.