Saturday, May 30, 2020

मानाचा (?) गजरा.



गेल्या आठवड्यात झोपण्याआधी  रिमोटने टीवी चाळत होतो,

चाळताना एका च्यानलवर राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला चित्रपटाचे नाव झळकले व मी थांबलो व उत्कंठेने चित्रपट पाहू लागलो. १५/२० मिनिटात लक्षात आले कि चित्रपट अल्झामाय्रर (स्मृती भ्रंश) झालेल्या एका विद्वान प्रोफेस्सरच्या अवस्थेवर आधारीत कथा असावी.

पण ह्या प्रसिद्ध कथा लेखिकेचा / दिग्दर्शिकेचा कोठेतरी गोंधळ झाला व आपण हत्ती बद्दल लिहावे कि माहूतां बद्दल की माहुताच्या प्रेमळ बायको बद्दल कि प्रोफेसरच्या सतत रडका चेहरा घेऊन फिरणाऱ्या मुली बद्दल कि उगाचच पात्रे वाढविण्याकरिता घेतलेली जावई व नात ह्यांच्या बद्दल कि मुंबईहून काम सोडून आलेल्या मुली बद्दल कळेनासे झाले.

त्यामुळे बाईना दिग्दर्शन देखील कायकरावे समजेनासे झाले.

पण आपल्या कथीत हुशार परीक्षकांना ही लेखिकेची कसरत ( हत्तीला मुख्य भूमिका दिलेली) आवडली असावी. किंवा त्या वर्षी एकच मराठी चित्रपट असावा, परीक्षकानी बाईंच्या इभ्र्तीस धक्का नको म्हणून तिच्या केसात आणखी एक बक्षिसाचा गजरा माळून वादाला तोंड नको म्हणून आपले अस्तित्व राखले. ( तेही  राष्ट्रीय पुरस्कार देऊन?)

माझा आवाज काही ह्या परीक्षकांच्या कानावर पडणार नाही पण मी माझ्या डोक्यातील किडा काढून टाकल्याचे मला समाधान. .परीक्षक हो  थोडे तरी धीट व्हा. काळ्याला काळा म्हणा. एकमेकाची पाठ खाजवणे  सोडा.

माझ्या चार/पांच वाचकानो वेळ मिळाला तर STILL ALICE’ हा चित्रपट जरूर पहा..

अस्तु.


1 comment:

चाफा आणि सोनटक्क्याचेअबोल प्रेम

 मी पाहिलंय ते अबोल प्रेम,    ते देखील दुतर्फी, विचार करा १ नाही तर ५ वर्षे  त्याचे रोज तिच्या बाकावर  नियमितपणे ती यावयाच्या पूर्वीच  हळुवा...