Tuesday, October 13, 2020

वावटळ -८


 अनेक वेळा डोक्यात विचार एकाच वेळेस कल्लोळ करतात व वावटळी सारखे डोक्यात फिरत राहतात त्यांचा एकमेकाशी कसलाही मेळ नसतो.अशीच एक वावटळ .    


(धो धो कोसळणाऱ्या पावसाकडे

पहात मला पडलेला,एक प्रश्न?)

“नेमेची येतो मग पावसाळा

हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा”   

कवीने ही वाक्य रिम झिम पावसाला

पाहून लिहीली असावीत बहुतकरून.

गावातील नद्या,गुरे, ढोरे,घरे आणि शेते 

पूरात वाहून जाताना पहिले असते 

तर ह्याच कविने काय लिहिले असते?

बाळाला पावसाचे,सृष्टीचे कौतुक कर

असे सांगावेसे वाटले असते का?


बातमी: भारतात कोरोनाचे अगणीत रुग्ण!

थोडक्यात...हाताची घडी तोंडावर... नाही मास्कवर  बोट, 

गुमान घरी बसा आणि राहिलेले दिवस मोजा.

मोजता, मोजता,मोजा निघाला फाटका,

उभे काही रहावेना,पायाला बसला चटका, 

लागली तहान भारी,  प्यायलो वाकून नळाचे पाणी,

टना टन पडली खिशातून नाणी,

शोधून,शोधून थकलो, झाडावर जाऊन बसलो,

पाहून नव्या शेजाऱ्याला  पोपट जोरात हसला

हसता हसता म्हणाला, तुझी चोच कुठाय?

माझ्या चोचीची तुला कशाला  पोच?

बंद कर तुझी वटवट, खा पेरु चट पट

नि जा भुर्रर उडून झट झट .


चौकोन मला आवडत नाही 

सर्व काही असते काटकोनात 

अडकतो आपण चार भिंतीच्या आत,

उठतो, बसतो, बोलतो भांडतो 

कधी कधी श्वास गुदमरतो,

सर्वांगाला फुटतो घाम,

सांगता नाही येणार कधी म्हणू राम! 


माझे काही जात नाही 

जात असते तर दळले  असते 

मग ते कुठल्याही  जातीसाठी असो 

जात, जात , जात !

पाहा भाषेची करामत!!

शब्द एक,पण अर्थ मात्र ३ !!


*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर  उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आलेमेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.


 

 

 

 

 

  

  

 

 

Tuesday, October 6, 2020

"सिनेनटाच्या मरणाचे गूढ!"

एक नाही दोन नाही

तब्बल १४० दिवस!


टी  वी च्यानेल्सची

रोज उठून बोंबाबोंब

विषय मात्र एकच,  

"सिनेनटाच्या मरणाचे गूढ!"

 दिवस रात्रौ करून घसाफोड 

जमवले ना हो ह्यांनी वर्षाचे राशन! 

आत्महत्या!

कि 

हत्या!

आत्महत्या!

कि 

हत्या! 

आत्महत्या!

कि 

हत्या!

थांबवा ही बोंबा बोंब 

तुमच्यां ह्या आरडा ओरर्डीने

 जागा होईल गेलेला  

त्यालाच विचारा

"कायरे तुझी हत्या केली ? 

कि केलीस तू  आत्महत्या? 

तोच सांगू शकेल 

सत्यकथा!!!

 

चाफा आणि सोनटक्क्याचेअबोल प्रेम

 मी पाहिलंय ते अबोल प्रेम,    ते देखील दुतर्फी, विचार करा १ नाही तर ५ वर्षे  त्याचे रोज तिच्या बाकावर  नियमितपणे ती यावयाच्या पूर्वीच  हळुवा...