आज दुपारी मराठी गाणी ऐकायचा मूढ लागला यूट्यूब वर चाळत असता भा. रा तांबे ह्यांच्या कवितान वर नजर गेली व कविता ऐकू लागलो. एका मागे एक ऐकत होतो व ह्या राज कवींच्या विचारांची भिंगरी कशी फिरत असेल व हे कल्पनाशक्ती बाहेरील काम, त्याही पलीकडे जाऊन हा अमुल्य ठेवा जेव्हां लता,आशा हृदयनाथ उषा मंगेशकरांनी आपल्या स्वर्गीय स्वरान्म्ध्ये गाऊन आपल्या महाराष्ट्रास जगभरात ध्रुव स्थान मिळवून दिले आहे.
भा रा तांबे , कवी अनिल, कुसुमाग्रज, केशव सुत, ग दि मा., मंगेश पाडगावकर,,सुरेश भट्ट, शांताबाई शेळके, असे असंख्य कवी, महाराष्ट्राचे भूषण असलेले ज्ञानेश्वर. तुकाराम, मुक्ताबाई,असे अनेक संत ह्या सर्वांची सुरेल स्वरात ओळख करून देण्याचे महान कार्य केवळ एका कुटुंबाने पेलले. 'मंगेशकर कुटुंबीय.' माझ्या बुद्धीस अजरामर होणे म्हणजेच 'मंगेशकर कुटुंबीय 'होणे व ऐकणारे सर्व आम्ही भारावलेले.
ओळख.
- (भास्कर रामचंद्र तांबे (ऑक्टोबर २७, १८७३ - डिसेंबर ७, १९४१)[१], अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी. ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते. हिंदी काव्य, उर्दू नज़्म आणि गज़ल यांच्याशी झालेला परिचय, तसेच वैदिक परंपरेचे शास्त्रशुद्ध शिक्षण असे संस्कार घेऊन तांबे यांनी मराठी कवितेत विशुद्ध आनंदवादाची मळवाट रुंद केली. ’राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता’ या ग्रंथात त्यांची कविता १९३५ मध्ये प्रकाशित झाली आहे. या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. भा.रा. तांबे यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते)
- भा रा च्या काही अविस्मरणीय कविता :
- कशी काळ नागिणी
- कळा ज्या लागल्या जीव
- घट तिचा रिकामा
- घन तमीं शुक्र बघ
- जन पळभर म्हणतील हाय हाय
- डोळे हे जुलमि गडे
- तिनी सांजा सखे मिळाल्या
- तुझ्या गळा माझ्या गळा
- नववधू प्रिया मी बावरतें
- निजल्या तान्ह्यावरी माउली
- मधु मागशी माझ्यमावळत्या दिनकरा
- या बाळांनो या रे या
- रे हिंदबांधवा थांब
थोडासा अवसर शोधून आपल्या श्रवण इंद्राना सुखमय अनुभव जरूर द्या,
*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आले, मेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.
No comments:
Post a Comment