गेले काही दिवस मी केलेल्या कामाचा सुटसुटीत पोरटफोलिओ बनवायला बसलो होतो.. सुरवातीला वाटले कि सहज एक दोन दिवसात आटपेल. पण मला स्वत:लाही विश्वास बसणार नाही एव्हढे काम मी गेल्य्या ५५ वर्षाच्या कारकिर्दीत केले आहे.
क्षमा करा मी गेली ५५ वर्षे जाहिरात व्यवसायात क्रिएटीव्ह डीरेकटर म्हाणून सक्रीय आहे.
माझेच काम मी कॉम्पुटरवर एकत्रित करत बसलो(य) जे अजून हि संपले नाहीय. कमीत कमी १५ दिवस अजून जातील से वाटते आहे.
जाहिरात विश्वातील माझ्या माहिती प्रमाणे आज मिती पर्यंत सर्वात अधिक वर्षे सक्रीय असणारा मी एकमेव असेन , असा माझा तरी समज आहे.
ह्या ५५ वर्षात मी सर्व प्रकारच्या मिडीयम मध्ये, म्हणजे वर्तमान पत्रे, होर्डीगस. पोस्टर्स,फिल्म. टी. व्ही. काम केले आहे. हि एक प्रकारे कामाशी प्रामाणिक राहून केलेली तपश्चर्या होय.
आज का कुणास ठाऊक आपल्या ब्लॉग वर आपले काम टाकावेसे वाटले. माझ्या मोजक्या वाचकासाठी एक छोटसे प्रदर्शन समजा. आवडल्यास जरूर कळवा, आणखी बरेच काम येथे टाकू शकत नाही कारण मला येथे निट रचनेत मांडता येत नाही त्याबद्दल खेद.
No comments:
Post a Comment