ध्रुवोत्तर
प्रश्न पडत होता म्हणून, उत्तर सरसावले,प्रश्नाला हात देऊन, त्यांनी त्यास सावरले
तेव्हढ्यात कोणीतरी ओरडले
चूक चूक उत्तर चुकतेय, उत्तरांनी दिला हात सोडून,
गेले तिथून निघून. प्रश्न पुन्हा (बुचकळ्यात) पडला,
उत्तर काही दृष्टि पडेना, कोणास उत्तर सापडेना
शोधा शोध केली सर्व अक्षरांनी, स्वल्प विराम,
अवतरण,उद्गार,अर्ध विराम
शोधून शोधून थकले.
बुचकळ्यातून प्रश्नाला ना काढू शकले.
प्रश्न,प्रश्न
बुचकळ्यातून बाहेर येईना,
अन उत्तरीत प्रश्न तसाच राहिला अनुत्तरित
"जीवन म्हणजे काय?"
अक्षरांना बाजूस सारून
पूर्व,पश्चिम,दक्षिण धावून आले मदतीला,
म्हणाले 'चला शोधूया उत्तरेला'
लुक लुक लुक्णाऱ्या ध्रुवाने हक मारली
अरे वेड्यांनो, उत्तर माझ्या घरात आहे
सर्व एक सुरात ओरडले, ठाऊक आहे आम्हाला,
पण प्र्श्नाच्चे उत्तर कुठाय? माहित आहे काय?"
फारच सोपे आहे उत्तर, हसत,हसत ध्रुव म्हणाला
ऐका तर "जीवन म्हणजे अढळ रहाणे "
कोणी न म्हणावे "उठ " कोणी न म्हणावे "बस"
आपले 'जीवन' ही आपली नौका
वल्हवा आत्मबळावर,
आपल्या मर्जीने, पाहिजे त्या दिशेने,
हेच जीवनाचे सार.
.