नव वर्षआरंभ.
आज लागला मुहूर्त. ५ दिवस उलटून गेले.
३६० राहिले.सवय झालीय आता
दिवस मोजण्याची.
खास भेट मिळालेल्या घोटीव कागदाच्या
वहीत सुरवात केली.
माझ्या विद्यार्थीनिची हंपीवरून
आणलेली भेट.
विद्यार्थ्या कडून भेट घेणे
माझ्या स्वभावाला न पटण्या सारखे.
तिने देताना सर गुरुदक्षिणा, म्हणून आणलीय.
त्यावरील चित्र पहा, ते पाहून मला तुम्ही दिसलात..
आणि माझ्या खिशाला परवडण्या सारखी होती.
मी काही न बोलता स्वीकारली.
सर,दुकानात असलेल्या गर्दीत सामील झाले
आणि माझी नजर ह्या छोट्याशा वहिवर पडली,
ते चित्र पाहून तुमच्या वृक्षासारख्या ज्ञानाच्यासावलीचा लाभ आम्हाला मिळाला
म्हणून ही गुरुदक्षिणा समजा.
मी गप्प,
नववर्षाची सुरवात ह्याहून
उत्तम होऊच शकत नाही.
HAPPY NEW YEAR EVERYONE
*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आले, मेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.
No comments:
Post a Comment