हिंदी सिने सृष्टीतील संगीतकार म्हणून एक अढळ स्थान मिळविलेला "ध्रुव तारा'."
रेल्वे स्टेशन मास्तरांचा मुलगा. तारुण्यात सिनेमा नाटकाचे वेड लागलेला "अलबेला".
१७वर्षांचा, नववी पास घर सोडून कोल्हापूरला येतो लवकरच "नागानंद" सिनेमात भूमिका पटकावतो तोंड घशी पडल्यावर हिरो होण्याचे वेड सोडून मुंबईचा रस्ता धरतो. आता तो आपल्या दुसऱ्या प्रेमाकडे "संगीता "कडे वळतो.
गंधर्व महा विद्यालयात विनायक बुवा, गोविंदराव पटवर्धन ह्यांच्या कडून शिक्षण घेतो व सिनेमात छोट्या भूमिका जशा मिळतील तशा करतो. सिनेमाची कधी न ऐकलेली नावे 'आत्मा तरंग' "सैदे हवंस' १९३६ /३७.
ओळखलंत का कोण? नाही ना पुढचा प्रवास वाचा.
मिनर्व्हा थिएटर मधील संगीतकारांना पेटीची साथ करता करता एक दोन तामील फिल्मना संगीत देतो.
ह्या अलबेलाच्या उडत्या गाण्यांना वेस्टर्न गाण्यांचा साज होता, तसेच हिंदुस्थानी गाण्यास रागदारीची झालर होती. ओळखलंत का? नाही मग चला पुढे, ह्याच्या संगीतास तारुण्याचा उन्माद ठासून भरलेला त्यांनी सेक्साफोन च्या जोडीला गिटार आणि माऊथ ऑर्गन ची जोड देऊन हा उन्माद खरा ठरवला ."आना मेरी जान" "शोला जो भडके" ह्यात बॉन्गो, सेक्साफोन वापरून रॉक म्युझिक ची ओळख बॉलीवूड मध्ये आणली. पहा आठवून " इन मीना डिंका " सारखे अजरामर गाणे तुमचे पाय आपोआप ठेका धरतील. १९४२ च्य सुमारास हे साहेब त्याकाळातील विनोदी अभिनेता भगवान दादांना भेटले आणि चमत्कारास सुरुवात झाली केवळ वयाच्या २४ वर्षी, "ललकारी," "सम्राट चन्द्र गुप्त", "भक्तराज" फिल्म्स ने त्याच्या उदयास सुरुवात झाली, भक्तराजच्या प्रोड्युसर जयंत देसाई यांनी त्याचे नावच बदलून टाकले मग काय विचारता सूर्यउदय झाला, आता तरी ओळखलंत,
बरोबर! दुसरे तिसरे कोणी नसून हा 'अलबेला' म्हणजे सी. रामचंद्र सर्वांचे लाडके अण्णा.
अण्णा प्लेबॅक देताना मात्र खरे नाव 'चितळकर' लावीत.
(जो पर्यंत मी नाव सांगत नव्हतो तो पर्यंत "अरे ""कारे", मध्ये मी उल्लेख करत होतो जसे नाव उलगडले तसे माझ्या करवी आपोआप आदरार्थी सम्बोधन होऊ लागले.)
अण्णांचा आवाज माझ्या तारुण्यात सुरु झाला. मी १० वीत होतो इंपिरिअल थेटरला भगवान दादांचं अलबेला, मी अकरावी पास होईपर्यंत ठाण मांडून बसला होता.
अहो गाणी आठवा... 'भोली सुरत, शोला जो भडके, धीरेसे आजारे..." सिनेमातले प्रत्येक गाणे हिट अण्णांच्या म्युझिक बरोबर भगवानदादा देखील उदयास आले.
अण्णांचा दबदबा वाढला तो "अनारकली" नन्तर व तेव्हां खऱ्या अर्थाने "सी.रामचंद्र" हे नाव "झाले बहू होतील बहू " परंतु ह्या सम हा!" यादीत बसले . अनारकली नन्तर अण्णा आणि लता दीदी हि जोडी अतूट झाली. लंडन मधील एका पत्रकाराने "अनारकली" पहिल्यांनंतर लिहिले कि सिनेमातील हिरोईन एखाद्या स्वर्गातल्या परी सारखी गायली, त्या बिचाऱ्याला लता दीदी माहित नव्हती.
अण्णांची महती वाढतच गेली त्यात लता दीदीची साथ. नवरंग, स्त्री, अनारकली,आझाद, नास्तिक, पतंगा,पैगाम,अनेक बहारदार संगीताने नटलेले चित्रपट ८०% गाण्याच्या मदारीवर चालले अहो हेच ते अण्णा ,"झाले बहू होतील बहू...अण्णांचा दरारा बॉलीवूड मध्य वाढू लागला, एस डी बर्मन सारख्या नामी संगीतकारास देखील काही बदल सुचवलेत. तुम्हाला " थन्डी हवाये" गाणे आठवते का? त्यात "ला ला ला' ची जोड अण्णांनी सुचवली व गाणे हिट झाले असे हे "झाले बहू होतील बहू... अण्णा.
१९५० चे दशक ह्या अलबेलाने गाजवले, अण्णांनी त्यांच्या उडत्या व भावूक गाण्यांनी देश गाजवला.
ह्या सर्व शिखरावर त्यांनी कळस चढवला तो १९५३ साली प्रजासत्ताक दिनी झालेल्या सोहळ्यात अजरामर गाण्याने. लता दीदी च्या गळ्यातून उतरलेली "ऐ मेरे वतन के लोगो" आर्त हाकेने पंडित जवाहरहलालजीनी देखील अश्रू ढाळले आज ७० वर्षे, दर २६ जानेवारीस गल्लो गल्ली हे गाणे घुमते, अंगावर शहारे आणते, केवळ अण्णा तुमच्या संगीताने.
अण्णा तुम्ही माझ्यासाठी मात्र सदैव "झाले बहू होतील बहू.... "
No comments:
Post a Comment