दिपावली
तुमची, माझी, आपली
आली, आली,आली, यंदा बार उडवीत आली,
हसत, खुशीत, आनंदात, आली वाजत गाजत !
झगमग झगमग झगमगाट पणत्यांचा,
दारोदारी पसरीत गालिचे रांगोळ्याचे !
ऐका गम्मत आमुच्या घरची,
वर्शो न वर्षे न बदले काही
मिट्ट काळोखी डोळे चोळीत
पहाटेचे स्वागत करती भाव गीतांनी
तेल उटणे लाउनी झाली तयारी, अभ्यंग स्नानाची
लहाना पासून मोठ्या पर्यंत झाली सज्ज,
लाडू, चकली, करंजी, अनारसे आणि चिरोटे,
आईने, सजवली फराळ ताटे,
सरसावून हात मारीती सारे फराळावरी.
आजीने उजवल्या पणत्या अंगणात,
केले वाटप बाबांनी फुलबाजा,अनाराचे,
प्रसन्न होई मन पाहुनी, कारंजे, फुलबाजे फुलताना,
पाहून भुई चक्राला, सर सर फिरताना वाटे,
असेच असावे, चक्र सुदर्शन त्या गिरीधराचे.
आली मावशी आली आत्या,
पाहून मामा मामीला,
फुलली कळीआजीची,
पाहिले तीस मी पदराने,
गजबजले घर, अंगण, गप्पा शप्पाने .
आली दिपावली घेउनी ४ दिवस
कौटुंबिक जिव्हाळ्याचे,
ना समजले न उमजले
कधी गेले ४ दिवस मजेचे
हिरमुसली आजी एकली विचाराने
पाहीन का मी हा आनंद येत्या वर्षी
भरल्या डोळ्यांनी.
जमले कुटुंब हळू हळू विखुरले
घर गजबजलेले, आता शांत झाले,
आली आली गेलीगेली दिपावली,आनंद पसरून.
No comments:
Post a Comment