गेल्या पंधरवड्यात कॉलेज मधील वर्गातीलएक मित्र व एक मैत्रीण गेल्याचे फोन वर
सर्व वर्गात नजर फिरली व गेलेल्या
मित्राच्या जागेवर खिळली,. अर्थात त्याच्याबरोबर
घालविल्या दिवसांची आठवणही उजळली.
बातमी आलेली मैत्रीण खूप हुशार होती.
ह्या बातम्या आता अंगवळणी होत होत्या,
ह्या वरून मनात एक वावटळ उठले.
वेग वेगळ्या वयात येणाऱ्या बातम्यांचे महत्व,
स्वरूप त्याच वयात कळण्या सारखे असते
वय वर्षे ५/६
झाली कि अवती भवतीच्या
ह्या वयात आपल्याला वाढ दिवसाच्या बातम्या
कानावर येतात आज बबनचां
वाढदिवस उद्या चिंगीचा... आनंदि आनंद
वय वर्षे १० ते १५...
आर्या पहिली आली, विनोद ला ९०%
आशीर्वादला विज्ञान शाखेत प्रवेश मिळाला,
मालिनी चे अरंगेत्रम शुक्रवारी...
वय वर्षे १६ ते २०...
देव आनंदचा ‘काला बाझार,’ मेकांनाज गोल्ड
कसला तुफान, हिच्कोक भन्नाट डिरेक्टर,
नौशादने कसले म्युझिक दिलय यार...
अशोक इन्जिनिअरिन्गला गेला...
अनिल मेडिकलला जायचे म्हणतोय...
वय वर्षे २२ ते २५...
शिला, राम जेठमलानी बरोबर काम करते,
निर्मला मास्टर्स करायला यु एसला
गेली, वाडकरांचा सुरेष शिक्षण सोडून
गातो म्हणे,गणेशचे लग्न ठरलय,
रघु आणि मैना पळून गेले...
वय वर्षे २५ ते ३०...
सन्नी, मोहन,गंगा... जवळजवळ
सर्वांची लग्न झाली, आशुतोष नेहमीच
सर्वापुढे त्याला दोन लेकरे आहेत आणि
बंगळूर मध्ये स्थायिक देखील झाला...
वय वर्षे ३५ ते ४५,,,
किशनचा वरूण लार्सेन मध्ये लागला,
जामसंडेकर अमेरिकेत सेटल झाला,
परवा गौरीच्या मुलीचे लग्न खांडेकरच्या
मुलाशी ठरले, राघव च्या पार्टीत कसली
धमाल केली, जुन्या आठवणी गप्पाना उत
आला पहाटेचे ३ वाजले... बापटची आई वारली,
सारंग चे वडील १५ दिवसापूर्वी गेले...
वय वर्षे ५० ते ६०...
साठेला प्यारेलेसीस झाला उजवी बाजू
कामातून गेली, काशीला डायाबेटीसने
फुल ग्रासलेय, हरीश आता मोदीचा
टेक्निकल सल्लागार झालाय वट वाढली
लेकाचे करून करून भागले आणि...
वृंदा, भारत भारतात परतले
पुण्यात सेटलझाले,शामच्या
मुलाने आई बापाला केसरी
मधून जग फिरवले
वय वर्षे ६५ ते ७५...
मधुकर गेला...हरीचे पण खरे नाही
शालिनी शिव गेल्या पासून एकटी पडली
घनश्याम वृद्धाश्रमात राहायला गेला,
मंदाकिनी मंदारचा आजार काढून थकलीय...
आपले काय?
आतापर्यंत तरी आल वेल...!
अशा ह्या वयोपरत्वे बातम्या माझ्या
कानावर पडत गेल्या व त्यांचे ह्या
वावटळीत शब्दांकन करावेसे वाटले.
ह्याला जीवन ऐसे नाव...
No comments:
Post a Comment