Monday, October 23, 2023

|| दसरा ||

 



सायंकाळी सोने लुटुनी मोरू परतुनि आला ।|
बहीण काशी ओवाळी मग त्याला ।| 
||दसरा सण मोठा,  नाही आनंदा तोटा||

माझ्या दसऱ्याच्या काही आठवणी.   


आमचे अण्णा आम्हाला दसऱ्यास सकाळी उठवताना " सकाळ झाली मोरू चा बाप मोरूस म्हणाला, आज दसरा,मोरू उठ. ,
 

त्या काळात आमच्या कडे आचार्य अत्रेंचा " मराठा" वर्तमान पत्र येत असे.  मंत्री मोरारजी देसाई यांच्यावर लिहिलेल्या 
आपल्या टीकेनी भरलेल्या दसऱ्याच्या अग्रलेखास अत्रेंनी सुरवात सकाळ झाली मोरू चा बाप मोरूस म्हणाला, आज दसरा,मोरू उठ. ह्या वाक्याने केली होती ही आठवण.
दसऱ्यास झेंडू व आंब्याच्या पानांचे तोरण अण्णा स्वतः दरवाज्यास बांधीत. आजही  माझ्या दरवाजात तोरण बांधताना डोळ्यासमोरून ही आठवण सरकते. दसऱ्याचे महत्व पांडवानी शमीच्या झाडावरील लपविलेली शस्त्रे उतरवली होती, त्यामुळे दसऱ्यास शमीची पाने एकमेका सोने म्हणून देण्याची प्रथा पडली असे आईने गोष्टीत सांगितल्याची आठवण.
ह्या दिवशी होणाऱ्या जेवणाची आठवण. वरण भात,वालाची उसळ,काकडीची कोशिंबीर, हिरवी कैरीची चटणी, पापड, आणि जेवणातील महत्वाचा व माझ्या आवडीचे श्रीखंड, किवां मसाला दूध  आजही मैना भुलुंगा.
आमच्याकडे तसे येणारे नातेवाईक फार कमी त्यामुळे सोने आम्ही भावन्डे आप आपसात वाटत असू,पुढे जे जे  त गेल्यावर मित्रपरिवारात वाटण्यास सुरवात झाली, आमचे एक सर मात्र सोन्या ऐवजी ग्रीटिंग कार्ड्स करायचे व आपल्या लाडक्या विद्यर्थ्यांना पाठवीतही आठवण. आमच्या दादाचे लग्न दसऱ्याचे ही  एक आठवण,  दसरा आला कि गेली काही वर्षे मोबाइल वरून सतत टिंग करत कोणी ना कोणीतरी शुभेच्छा पाठवीत  रहातात त्यांना वयोपरत्वे विसरू नये म्हणून लगेच आपल्या बाजूने रिटर्न सदिच्छा न विसरता न दुखवता पाठवण्याची आणखी एक आठवण, जी विसरून चालत नाही, मोबाइलच्या जन्मापासून सर्वाना हायसे वाटले असावे घर बसल्या सर्वाना सदिच्छा पाठवणे सोपे झालेय. ते देखील न भेटता. तेव्ढ्यावरून होणाऱ्या गैर समंजस टाळण्याची आठवण.
थोडक्यात माझ्याचसाठी दसरा ह्यावयात समरणशक्ती टेस्ट. आठवणी म्हणजे दसरा हे समीकरण माझ्या साठी.थोडक्यात माझ्याचसाठी दसरा ह्यावयात समरणशक्ती टेस्ट.   
    

* दसरा शब्दाची एक व्युत्पत्ती दशहरा अशीही आहे. दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरल्या आहेत. दसर्‍याच्या आधीच्या नऊ दिवसांत म्हणजेच नवरात्रात देवीच्या शक्ती रुपांनी दाही दिशांवर विजय मिळवला, असे सांगितले जाते. विजयाच्या संदर्भात या दिवसाला दशहरा, दसरा आणि विजयादशमी अशी नावे आहेत. श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला, तोही याच दिवशी. या अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला विजयादशमी असे म्हटले जाते. पांडवांनी अज्ञातवास संपताच शक्तीपूजन करून शमीच्या वृक्षावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या गायी पळवणार्‍या कौरव सैन्यावर स्वारी करून विजय मिळवला, तोही याच दिवशी. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितापूजन आणि शस्त्रपूजा ही चार कृत्ये करायची असतात.





चातुर्मासातील एक महत्त्वाचा सण म्हणजे दसरा. साडेतीन मुहुर्तांपैकी दसरा एक मानला जातो.चातुर्मासातअश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत नवरात्र साजरे केल्यानंतर दहाव्या दिवशी म्हणजेच दशमीला दसरा साजरा केला जातो. या सणाला धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते. त्याचे प्रतीक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पाने, पाटी-पुस्तके अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रास्त्रांचे पूजन करण्यात येते. धनसंपदा (महालक्ष्मी), शक्ती (महाकाली), ज्ञानसंपदा (महासरस्वती) या तीन शक्ती देवतांचे स्मरण दसऱ्याला केले जाते. नवरात्रौत्सवात बसविलेल्या देवी मूर्ती आणि घटांची मिरवणूक काढून विसर्जन केले जाते. दसऱ्याला सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडाची पाने देण्याची प्रथा आजही टिकून असल्याचे दिसून येते

*
वरील माहिती गुगल च्या साहाय्याने घेतली आहे.

No comments:

Post a Comment

चाफा आणि सोनटक्क्याचेअबोल प्रेम

 मी पाहिलंय ते अबोल प्रेम,    ते देखील दुतर्फी, विचार करा १ नाही तर ५ वर्षे  त्याचे रोज तिच्या बाकावर  नियमितपणे ती यावयाच्या पूर्वीच  हळुवा...