झाले बहू... ही ब्लॉगमाला माझ्या १५ वया पासून २१ वया पर्यंत लागलेल्या व्यसनांतील मोजके बॉलीवूड हिरो, हेरॉईनस, म्युझिक डायरेक्टर, डायरेक्टर्स, ज्यांनी मला त्यांच्या विविध कलागुणाने आकर्षित केले व आनंद दिला त्यांना समर्पित,
याहू!... याहू!
बरोबर ओळखलंत,
एकमेव शम्मी कपूर.
१९५८ मी ९ वित्त होतो,
सुपर सिनेमा
मी माझे तीन सिनेमा वेडे मित्र.
१२ आण्याचे तिकीट.
स्क्रिन पासून ३ री लाईन.
मान डोळे वरती.
इंडियन न्युज संपते न संपते तो...
सेन्सॉर सर्टिफिकेट,
सिनेमाचे नाव "उजाला" वाचून कर्कश शिट्या,
पिक्चर सुरु, कानठळ्या बसण्या एव्हढ्या शिट्या,
रामू { शम्मी कपूर ), छबिली (माला सिन्हा) जानि व्हिलन कालू ( राज कुमार ) ,
रामूची ३ भावन्डे, हिंदी सिनेमात जिचे हसू कोणीही न पाहिलेली सदा रडणारीआई,{लीला चिटणीस ) असा नेहमीचा संच
रामू सज्जन, कालू च्या दोस्तीस बळी पडून वाईट मार्गास लागतो,बहिणीस अपघात झाल्यावर सुधारण्याचा प्रयत्न करतो ,,,, वगैरे, वगैरे
आता रामू छबिली जोडीचे गाणे पडद्यावर येते आमच्या आजू बाजूचा पब्लिक वेडा होतो...
गाणे: "झूमता मोसम मस्त महिना",समोर शम्मी कपूर, माला सिन्हा
पब्लिक सीटवर उभे, केवळ विद्यार्थी म्हणून आम्ही स्वतःला आवरून बसून राहिलो..
काय सांगू तुम्हाला अहो शम्मी कपूर ने ह्या एका गाण्यावर लाखोंनी फॅन्स कमावले ते कायम राहिले त्यात अस्मादिक हि सामावले.
हे गाणे जरूर बघा बघा बघा.
सिनेमातील अविसमरणीय क्लायमॅक्स सिन,
कालू आणि रामू मधील फाईट.
दोघे एका हात गाडीच्या दोन बाजूस,
एक मेकास खो खो खेळातील हूल देत,
अचानक कालू हातगाडीवर उडी मारतो
खिशातून सर्र्र्र करून चाकू काढतो,
रामूला उद्देशून जानी... आणि...
कालूच्या बाजूचे प्रेक्षक, शिट्यानि
थेटर दुमदुमून सोडतात,
राजकुमारला फॅन्स मिळतात,
सिनेमा सुटल्यावर जानि...जानि ...
जयघोष
शम्मी कपूरचे सर्व सिनेमे. मी पहिले.यादी खूपच मोठीआहे तरी पण नोंद केल्याशिवाय रहावत नाही.
१९५६ तुमसा नही देखा
अहो ह्या सिनेमाची सुरवातच
शम्मी च्या बूट हलवताना होते
आणि अमिताला पाहून गाणे
युं तौ हमने लाख हंसी देक्खी है..
पब्लिक वेडा,मी...
१९५८ उजाला
याला याला दिल ले गइ...
१९५९ दिल देखे देखो.
दिल देखे देखो
१९६१ जंगली
याहू याहू ... जरूर पहावे असे, त्याचे कुठलेही गाणे घ्या तुम्हाला आनंद मिळताच पाहिजे.
एक छोट्टासा किस्सा ( कौतुक नाही}साल १९८७/८८
माझा मुलगा अपूर्व ८ वर्षाचा शाळेतून घरीआला कि पलंगावर बसून टॉम न जेरी वगैरे कार्टून व्हिडीओ पाहायचा त्यात घरातील 'जंगली' चा व्हिडीओ देखील लावायचा, त्याने जवळ जवळ ६५ वेळा ''जंगली' केवळ शम्मी कपूर साठी पाहिलाय. बर्याच वेळेस तो कॅसेट लावून बाहेर बसायचा पण आत कुठला सिन चाललाय ते डायलॉग सहित सांगायचा विचारले कि सांगायचा याहू गाणे बघायला मजा येते. असे हे गाणे,
यादी
१९६२ प्रोफेसर
१९६३ चायना टाऊन
१९६३ ब्लफ मास्टर, राज कुमार,काश्मीर कि कली, जानवर, तिसरी मंझिल ,इव्हिनिंग इन पॅरिस, ब्रम्हचारी, प्रिन्स,अंदाज लिस्ट न संपणारी
गोविंदा आला रे आला ...
गेली साठ वर्षे प्रत्येक दहीकाल्या च्या दिवशी वाजलेच पाहिजे ह्या गाण्याचा विडिओ पहा अहो शम्मी चा नाच बघा.
त्याच्या नंतर अनेक हिरोनी ह्या गाण्यावर नाच केले पण नाही नाही कोणीही जवळ नाही पोचले, पोहचणेअशक्य,अशक्य.
शम्मी कपूरचा कुठलेही गाणे घ्या त्यातील नाच पहा कुठंही लैंगिक हातवारे दिसणार नाहीत उलट त्यात तो रमलेला
उत्तम डान्सर पहायला मिळतो त्याची देहबोली आपणास आपलेसे करते व त्यामुळेच त्याचे फॅन खुश होतात.म्हणूनच तो या सम...
यू ट्यूब वर हे गाणे पहा.
हिंदी स्क्रीन वरील एकमेव ६ फूट देह,
त्याची अदाकारी नाच अनेकांनी प्रयत्न करून ही जमले नाही म्हणूनच तो या सम...
निळसर हिरवे डोळे,चेहऱ्याला साजेसे केस, देह, केवळ हिरो होण्यासाठीच ईश्वराने जन्मास घातलेला, तो दुसरा कुठल्याही व्यवसायात शोभालाही नसता. म्हणूनच तो या सम...
आज पावेतो बॉलीवूडमध्ये पैदा नही हुआ ना होगा.म्हणूनच तो या सम...
आपल्या खात्री करीता यु ट्युब वर शम्मी कपूर ची गाणी पहा व त्याच्या अदाकारीने तुम्ही नकळत फॅन व्हाल. आजच्या एका हीरो चे नाव घ्या कि जो शम्मी कपूर सामोरे उजवा दिसेल /ठरेल.
म्हणूनच तो या सम...
त्याच्या अदाकारीमुळेच शम्मी कपूर अमर राहील,
म्हणूनच तो या सम...
No comments:
Post a Comment