गेली ३/४ वर्षे लिहलेल्या ब्लॉग ची उजळणी करताना मला असे जाणवले की,बऱ्याच ब्लॉग मध्ये कांही कळत नकळ्त बरे विचार मांडले गेले आहेत म्हणून हे निवडक विचार पुन्हा एकदा मांडण्याचे धाडस.
मन स्वछ असणे हे काच स्वछ ठेवण्या सारखे.
मनाला स्थिर ठेवणे हे श्वास बंद करण्या येव्हढे कठीण.
रद्दी माणसांची व्याख्या काय?
करायचीच झाली तर "गरज सरो वैद्य मरो" हि व्याख्या.
कशा वेळ फुकट घालवावा
संगीताच्या मैफिलीना
असता कानी स्मार्ट फोन!
नाही हशा, नाही सम्भाषण
विसरुनी भाषा मैत्रीची,
अवगतली मूक भाषा
एकत्र आहोत आम्ही शरीराने!
करावयाची काय दुसरी भाषा
असता कानी स्मार्ट फोन!
आणखी एक दिवस उजाडला
हात लिहिताना नाही थरथरला!
हस्ताक्षर उगाचच हसू लागले.
सारे कसे रम्य पण प्रसन्न,
पापण्यांत साठवून हे तारांगण,
शिरलो मी कुशीत गाढ निद्रेच्या.
नाही. त्याला देश
नाही वेश नाही,
रंग रूप तो ठरवेल तेच
आपली भेटीची वेळ स्वतः तो ठरवितो.
एका लाटेत शेकडो,हजारो, लाखो
बासरीवाल्या सारखा तो
एकाच वेळेस घेऊन जातो.
No comments:
Post a Comment