बसल्या जागी, रिकामपणे
मेंदूची निरर्थक विचारांनी
होणारी फरफट काही थांबत नाही.
जन्म का होतो?
मरण लिहिले असते म्हणून ?
कि कीर्ती रूपे उरावे म्हणून ?
😜पण सर्वच कीर्तिमान कसे होणार?
प्रश्न?
ओळखी का होतात?
प्रवासात, शाळा, कॉलेज, दुकानात,
बाजारात, दरवाजात,ऑफिसात
शेजारी,पाजारी, न्हावी, धोबी,
ओळखी काही थांबत नाहीत...
काही होतात केवळ
काही मिनिटासाठी
त्या का विसरण्यासाठी?
की ...
पूर्व जन्माच्या गाठी?
अगणीत, कशासाठी?
आठवणीसाठी?
एका जन्मात त्या तरी किती
आणि कुठे साठवणार?
प्रश्न?
देव जाणे म्हणजे काय?
ऐकत आलो आहे,
तो सर्व जाणतो, मग आपल्याला
भविष्य जाणून घेण्याचे कारण?
जिज्ञासा? जिज्ञासा तर
कायमच बरोबर रहाते
म्हणजेच देव काय जाणतो
ते शोधत जन्म आपण घालवतो, का ?
प्रश्न?
आपल्या देशाची लोक संख्या
१३६ कोटी
देवांच्या ३३ कोटी संख्ये पेक्षा
अंदाजे ४ पट
म्हणजे प्रत्येक देवास रोज
४ माणसांचे भविष्य घडवायचे
असते का?
प्रश्न?
कंटाळा म्हणजे काय?
ज्यास टाळता येत नाही तो का?
कि कंटाळा म्हण्जेआळस का?
प्रश्न?
उत्तर : होय! मग पुढे काय?
तात्पर्य : आळस हा मनुष्याचा शत्रू आहे
निरर्थक विचार बंद करा.
*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आले, मेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.
No comments:
Post a Comment