Sunday, December 31, 2023

सूर्योदय २०२४

 

सूर्योदय २०२४

दिसला सूर्योदय २०२४ चा, नव्या वर्षाचा. 

पडले आणखी एका नव्या वर्षात पाऊल,

वाढून काय ठेवले ह्या वर्षाच्या ताटात 

पाहू या तरी रोज उगवणाऱ्या दिनकराच्या साक्षीने,

गेल्या वर्षांत विशेष काही घडले नाही 

जे काही घडले ते तसे काही वाईट नाही ना उत्तम,

आणि आपण तरी ह्या वयात अपेक्षा कराव्यात तरी कशाच्या 

प्रकृती, आरोग्य, खाणे, पिणे, सर्व काही ठीक ठाक 

मुले बाळे खुशीत कि आपण खुशीत,

काही मित्र, नातलग वर गेल्याच्या बातम्या 

हे अंगवळणी पाडून... मनात म्हणावयाचे 

राम भजन कर लेना रे भाई 

एक दिन जाना रे भाई.

नैराश्याचे नावही न घेणे

येणे, जाणे हे नियतीचे चक्र

थांबवणे न आपुल्या हाती.


माझ्या  खास मित्रांसाठी एक आधारित गाणे

कसं काय पाटील बरं हाय का, अहो बरं हाय का ?

काल काय काय प्यालात , ते आठवतंय  का ?


अहो राव तुम्ही, ते नाही तुम्ही, अहो चष्मेवाले तुम्ही

न्हाय, न्हाय, न्हाय, न्हाय, मोबाइल वाले तुम्ही

सांगा काय ऐकलं ते खरं हाय का ?


काल म्हनं तुम्ही पार्टीला  गेला, 

रम व्हिस्की बिअर ने तहान  भागवलीत  का?

झिंग झिंग झिंगाट नाचलात  का?

सांगा काय ऐकलं ते खरं हाय का ?

पार्टीत म्हनं मोबाईल इसरून आला

इसरल्या ठायी, गावलं का न्हाई, 

आज तरि संगती आणलंय का ?

काल म्हनं तुम्ही पार्टी ला गेला, 

डोक्यातला ऐवज हरवून आला

आरंरं आज काय शिल्लक र्‍हायलंय का ?

काल काय ऐकलं ते खरं आहे का?


काल म्हनं तुम्ही पार्टीस  गेला, 

पिता पिता घोटाळा झाला

काय झालं पुढं, सांगा तरि थोडं आठवतंय  का ?

खाली नका बघु आता लाजताय का ?

आगं बया बया,काल काय ऐकलं ते खरं आहे का?



२०२४चे आगमन आनंदात साजरे करा.


Tuesday, December 26, 2023

आरक्षण,आरक्षण.आरक्षण.

 आरक्षण,आरक्षण.आरक्षण.



भटक्या,मागासलेल्या,आदिवासी व इतर जाती यांना ३०/% (?
आणि कुठल्या जमातीस २०%आरक्षण मग मराठ्याना ६०% 
का नको? 

हवे तर आम्ही न्याय निवाडा जाणत नाही, 
सरकारची चूक आम्ही भोगतोय.
आरक्षण  मिळालेच पाहिजे. 

प्रश्न: उच्च जातीयांनी काय करावे?

एकच उपाय सर्व उच्च जातीने 

आरक्षणाची जात पत्करणे 

पूर्ण महाराष्ट्रात आरक्षण.

तंटे, बखेडे मोर्चे उपोषण  

सर्व काही बंद.

आनंदी आनंद.  


Saturday, December 23, 2023

संकल्प ! २०२४

 संपले वर्ष २०२3

करा तयारी २०२४ च्या स्वागताची संकल्पाने!


का नाही? अहो सकारात्मक संकल्प करण्यास काय हरकत.

आता सकारात्मक  म्हणजे?काय? विचारू नका, सुरुवात करा स्वतः पासून...मी काय करणार? गेल्या वर्षातील चुका, अडथळे, कसे सुधारावेत ह्याचे नियोजन आता पासून करणार . 

 संकल्प !

आपल्या अवती भवोतीचे वातावरण बदलणे शक्य नाही तेथे चक्क डोळे झाक करणार.  म्हणजे काय?

राजकारण:  राज? का रण? हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार नाही  चर्चा करण्यात वेळ वाया घालवणार नाही.

कारण? सरळ साधे सोपे. मला त्याची ऍलर्जी आहे. संकल्प !

खेळ: सर्व पहाणार,  ह्या सारखे सुख नाही. जगभर अनेक प्रकारचे खेळ चालू असतात, हातात रिमोट असला की जगात कुठल्याही स्टेडियम वर असलेला सामना बघण्यात हाती असलेला रिकामं वेळ घालवणार.बसल्या बसल्या फेर जगात फटका. संकल्प !

व्यायाम: आपल्या प्रकृती प्रमाणे वयानुसार नियमित फेरफटका सकाळचा चालू ठेवणार खंड पडू देणार नाही.संकल्प !

वाचन : ह्या सारखा दुसरा मित्र नाही, वेळ मिळत नाही म्हणून कारणे न देता ही आवड पुढे चालू ठेवणार.काय वाचणार? काहीही हाती येईल ते, तशी पुस्तकालयात जायची आवडही आहे. सध्या तीन सम व्यावसायिकांनी लेखन केलेली वाचनात आहेत.संकल्प !

लेखन: आपले विचार मांडण्याची मला पहिल्या पासून आवड आहे. खचखोळ चालू राहीलच. माझ्या आनंदासाठी.

प्रवास: ह्या वर्षात परदेशगमन करण्याचा मनसुबा आहे, पाहू कसे जमते ते. संकल्प !

व्यवसाय: आले अंगावर तर घेईन शिंगावर ह्या तयारीत मी नेहमीच असतो.संकल्प !

शिक्षण: मी कधीच थांबलो नाही. सध्याच्या कॉम्प्युटरयुगात  माझ्या व्यवसायास लागणारे सर्व मी शिकत आहे व शिकत रहाणार. आज तरुण मुले जाहिरात व्यवसायातील एकमेकांशी सवांद साधतात त्यात भाग घेण्या एव्हडी तयारी नक्कीच ठेवणार. तसा फारसा  मागे मी नाही,कासवांसारखे(खऱ्या ) का असेना सशांच्या शर्यतीत खांदा लावून प्रयत्न नक्कीच करेन. संकल्प !

आहार : मागील पानावरून पुढे खाऊ हे तत्व जोपासणार. संकल्प!

करमणूक : ह्याला घरी टीव्ही असल्या कारणाने व आवड असल्याने ओटीटी मुबलक करमणूकिचे मोठे साधन, बातम्या पासून नवीन ओटीटी  रिलीजेस पहाण्यास कंटाळा येऊ न देण्यास वेळ काढणे.संकल्प !

विश्रांती: आवडता विषय नाही नुसता झोपण्या पूर्ती नव्हे तर भिर भिरत्या मनाचे गणपत वाण्या सारखे मनोरंजन करणे.संकल्प !

निद्रा : वयामुळे नाश पावत असणारी गोष्ट. पण त्यावरील देखील उपाय म्हणजे रात्री नाश पावलेला वेळ वाम कुक्षीत भरून काढणे.वाचलात माझा दिनक्रम/उपक्रम /स्वप्न/संकल्प !

संकल्प!  उद्याच्या श्वासाची शाशवती नसताना देखील... मनुष्य प्राणी केवळ ह्यावर जगतो.असो. 

नवं वर्षाच्या शुभेच्छा.

चाफा आणि सोनटक्क्याचेअबोल प्रेम

 मी पाहिलंय ते अबोल प्रेम,    ते देखील दुतर्फी, विचार करा १ नाही तर ५ वर्षे  त्याचे रोज तिच्या बाकावर  नियमितपणे ती यावयाच्या पूर्वीच  हळुवा...