संपले वर्ष २०२3
करा तयारी २०२४ च्या स्वागताची संकल्पाने!
का नाही? अहो सकारात्मक संकल्प करण्यास काय हरकत.
आता सकारात्मक म्हणजे?काय? विचारू नका, सुरुवात करा स्वतः पासून...मी काय करणार? गेल्या वर्षातील चुका, अडथळे, कसे सुधारावेत ह्याचे नियोजन आता पासून करणार .
संकल्प !
आपल्या अवती भवोतीचे वातावरण बदलणे शक्य नाही तेथे चक्क डोळे झाक करणार. म्हणजे काय?
राजकारण: राज? का रण? हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार नाही चर्चा करण्यात वेळ वाया घालवणार नाही.
कारण? सरळ साधे सोपे. मला त्याची ऍलर्जी आहे. संकल्प !
खेळ: सर्व पहाणार, ह्या सारखे सुख नाही. जगभर अनेक प्रकारचे खेळ चालू असतात, हातात रिमोट असला की जगात कुठल्याही स्टेडियम वर असलेला सामना बघण्यात हाती असलेला रिकामं वेळ घालवणार.बसल्या बसल्या फेर जगात फटका. संकल्प !
व्यायाम: आपल्या प्रकृती प्रमाणे वयानुसार नियमित फेरफटका सकाळचा चालू ठेवणार खंड पडू देणार नाही.संकल्प !
वाचन : ह्या सारखा दुसरा मित्र नाही, वेळ मिळत नाही म्हणून कारणे न देता ही आवड पुढे चालू ठेवणार.काय वाचणार? काहीही हाती येईल ते, तशी पुस्तकालयात जायची आवडही आहे. सध्या तीन सम व्यावसायिकांनी लेखन केलेली वाचनात आहेत.संकल्प !
लेखन: आपले विचार मांडण्याची मला पहिल्या पासून आवड आहे. खचखोळ चालू राहीलच. माझ्या आनंदासाठी.
प्रवास: ह्या वर्षात परदेशगमन करण्याचा मनसुबा आहे, पाहू कसे जमते ते. संकल्प !
व्यवसाय: आले अंगावर तर घेईन शिंगावर ह्या तयारीत मी नेहमीच असतो.संकल्प !
शिक्षण: मी कधीच थांबलो नाही. सध्याच्या कॉम्प्युटरयुगात माझ्या व्यवसायास लागणारे सर्व मी शिकत आहे व शिकत रहाणार. आज तरुण मुले जाहिरात व्यवसायातील एकमेकांशी सवांद साधतात त्यात भाग घेण्या एव्हडी तयारी नक्कीच ठेवणार. तसा फारसा मागे मी नाही,कासवांसारखे(खऱ्या ) का असेना सशांच्या शर्यतीत खांदा लावून प्रयत्न नक्कीच करेन. संकल्प !
आहार : मागील पानावरून पुढे खाऊ हे तत्व जोपासणार. संकल्प!
करमणूक : ह्याला घरी टीव्ही असल्या कारणाने व आवड असल्याने ओटीटी मुबलक करमणूकिचे मोठे साधन, बातम्या पासून नवीन ओटीटी रिलीजेस पहाण्यास कंटाळा येऊ न देण्यास वेळ काढणे.संकल्प !
विश्रांती: आवडता विषय नाही नुसता झोपण्या पूर्ती नव्हे तर भिर भिरत्या मनाचे गणपत वाण्या सारखे मनोरंजन करणे.संकल्प !
निद्रा : वयामुळे नाश पावत असणारी गोष्ट. पण त्यावरील देखील उपाय म्हणजे रात्री नाश पावलेला वेळ वाम कुक्षीत भरून काढणे.वाचलात माझा दिनक्रम/उपक्रम /स्वप्न/संकल्प !
No comments:
Post a Comment