अहो, चाललय काय?
ट्राफिक नाही हलत,
पाऊस नाही थांबत,
ट्रेन नाही चालत,
विरोधकांसाठी सरकार नाही चालत,पेट्रोल, डीझेल, फळे भाजी पाला,
महागाई शिवाय देश नाही चालत,
अहो, चाललय काय?
अहो, देश चाललाय की !
लष्कराची दमदाटी,राजकीय हेराफेरी,
बँकांची लुट मार चालूच,
अहो, चाललय काय?
अहो, देश चाललाय की !
निवडणुका कोपऱ्यावर
मुख्य मंत्र्यांच्या नवीन गर्जना
चालूच आहेत, बनून भाट,
दिल्लीच्या धन्याची स्तवन गातायत,
अहो, चाललय काय?
अहो, देश चाललाय की !
ऐका, हो ऐका
आठवण झाली लाडक्या बहिणींची
मिळणार ओवाळणीचे गाजर १५०० रुपये
खिसा रीकामा असताना लाडक्या बहिणींना,
अहो, चाललय काय?
अहो, देश चाललाय की !
ह्या पिंजऱ्यातून दुसऱ्या पिंजऱ्यात
घोडे बाजार नेहमीचा झालाय
अहो, चाललय काय?
अहो, देश चाललाय की !
देवाचा अंश असलेला एकमेव पंतप्रधान
लाभलाय या देशाला आता कसली भीती
मागाल ते वरदान पडेल पदरात.
अहो, चाललय काय?
अहो, देश चाललाय की !
आपण खुर्चीवर नसणार ह्या खात्रीने,
गर्जना बहिऱ्या कानी पडतायतात
घोटाळे चालूच आहेत,जरांगे बोम्बलतोय, उपोषण करतोय
तरी देखील देश चाललाय,राष्ट्र चाललंय
असा हा सावळा गोंधळ
राज्या राज्यातून चाललाय
अहो, चाललय काय?
अहो, देश चाललाय की !
अर्थमंत्री, कॉर्पोरेटना खुश करून
बजेटचा शिरा फक्त ब्राम्हणा बरोबर खातायत,
ओबीसी दोघे दारातून वास घेतायत
अहो, चाललय काय?
अहो, देश चाललाय की !
पंतप्रधानांचे भ्रमण मात्र जोरात चाललय,
मीच राजा समजून पंतप्रधान ऑस्ट्रियाला
ऑस्ट्रेलिया सम्बोधून जगाला हसवतायत,
विराट छक्के मारून संघास निडर बनवतोय,
कंगना मी खासदार म्हणून गालावरील
५ बोटांचा ठसा लपवतेय
अहो, चाललय काय?
अहो, देश चाललाय की !
दस्तूर खुद पंतप्रधान व गृह मंत्री
कळसूत्री बाहुल्यांचा खेळ करतायत
शेअर बाजार वधारतोय,
अहो, चाललय काय?
अहो, देश चाललाय की !
स्वातंत्र्य दिवस साजरा करू या.
हर घर मे तिरंगा लावू या!
लाल किल्ल्यावरून पुन्हा एकदा जनतेस
खोटी वचने देऊया
गांधीजींच्या तीन माकडाच्या
उलट अवस्था, आता झालीय जनतेची
डोळे, कान, भाष्य उघडे ठेऊन,
हे सर्व बघत ऐकत तुमचे, माझे,
आयुष्याचे रहाट गाडे चालवू या !
अहो, देश चाललाय की !
यंदा स्वातंत्र्य दिवसाला लाजरा करूया.
No comments:
Post a Comment