
यातील अनेक गुरु आज चंद्राने नेले.
प्रत्येक गुरुपोर्णिमेस,
चंद्र अधिक तेजोमय दिसू लागला.
आता हे विश्वची माझे गुरु.
या विश्वात येणाऱ्या सर्व गुरुपोर्णिमेस माझा चंद्रास नमस्कार,
मी करतो माझी गुरुपोर्णिमा साकार.

एके दिवशी काय झाले !
वाघाची डरकाळी जंगलातील
इतर वाघांना ऐकू येईनाशी झाली,
वाघ राजा गाय वासरांच्या व घडाळ्याच्या टीक
टीकेला भुलला त्या मैत्रीत जनतेचा,
आपल्या सैन्याचा, त्यास विसर पडला,
जंगलातील इतर वाघांची कुरबुर सुरु झाली
सैन्यातील वाघांना प्रश्न पडला
आता आपला रक्षणकर्ता राजा कोण?
एवढ्यात एक धीट वाघ पुढे आला
मित्रानो घाबरू नका ह्यावर बंड हा एकच उपाय
चला माझ्याबरोबर मी दाखवतो मार्ग,
सेनापती बनून पुकारले त्यांनी वाघांना
"खरे, सच्चे वाघ" असाल तर जागे व्हा
हे जंगल सोडून या माझ्या मागे,
त्याच्या हाकेला होकार देऊन
आले जंगल सोडून, चाळीस जण
ओरिसाच्या जंगलात पोहोचवले सेनापतीने,
शब्दास जागून त्यांची योग्य ती बडदास्त
ठेवली.
ह्या जंगलात कमळाने भरलेले
एक तळे होते त्यातील कमळे पाहून
वाघ हर्षित झाले आता त्यांची खात्री
झाली की सेनापती योग्य ठिकाणी
घेऊन आलाय. त्यांच्या खुशालीचे
वर्तमान ऐकून एक एक करून
चाळीस वाघ जमा झाले.
इथे जंगलच्या राजाला काही सुचेना
आपली राज गुहा तर्कटपणे सोडून
कुटुंबीया समवेत जुन्या स्वगुहेत आला.
घड्याळ व गाय वासरू
आता राजाचे सांत्वन करू लागले
पण मनोमनी राजा खिन्न झाला
मोठ्या गर्वाने वागल्याचा,चुकीचे
मित्र केल्याचा पश्चाताप झाला,
आता त्याला ध्वज गमविण्याची
भीती भेडसाऊ लागली
खोटे अवसान आणून
कावरा बावरा होऊन तो
सैन्य गोळा करू लागला
पण...
"बुंद से गई वो हौद से कैसे आती"
आता उशीर झाला होता,
जंगलातील इतर वाघांनी
आपला नवा नेता निवडला,
तात्पर्य :
राज्य चालविताना आपल्या सैन्याचा
सम्भाळ इतर कोठल्याही संकटापेक्षा महत्वाचा.!
*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आले, मेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.
शाळेत असताना मराठी चा
तास माझ्या आवडीचा सुंदर, आल्हाद दायक,
स्फुरणदायक विचारांच्या, कविता!
शिकवल्या जात व इतर विषयात लक्ष
न लागणारा मी ह्या तासाला मात्र एकाग्रतेने
ऐकत असे, नकळत यां शालेय जीवनातील
बर्याचशा कविता आज देखील पाठ आहेत..
आज सकाळी जागा झालो ती ह्या
केशव सुतांच्या तुतारीने.
एक तुतारी द्या मज आणुनी
फुंकीन जी मी स्वप्राणानेवेळ,
१९ ७४ साली आमची भेट वरच्या ने
घडवून आणली. अगा जे घडणे मला अशक्य वाटले
ते त्याने घडवून आणले.
आजही मला राहून राहून त्याची कमाल वाटते.
१९७६ ला
पती पत्नीच्या नात्यात बांधले गेलो \
दोन चाकाचा संसार सुरु झाला
.आज अक्षय तृतीयेला ४६ वर्षे पूर्ण होतील..म्हणतात न तसेच...पण नांद्लो.
वरच्याच्या वरद हस्ताने भरभराटीचे
पिक मात्र साथ देत गेले.
संसारातील येणाऱ्या उचक्या पडसे खोकला
ताप, दोघांनी यशस्वी रित्या झेलले..
आनंदी मात्र आजतागयात आहोत
हा तुझा आशीर्वाद कायम राहो.
===============================

आंनद
दोन महीने झाले कामात व्यस्त असल्याने
लिहिण्याकडे दुर्लक्ष झाले. कालच काम संपवलेआणि आज
लिहावयाचे ठरविले पण काय लिहावयाचे ? प्रश्न पडला एवढ्यात
२०००सालातील डायरी नजरेस पडली. चाळत असताना,
२१ वर्षाने मिळालेल्या वहीत 'एक शब्द' घेऊन
त्या शब्दाने डोळ्यासमोर येणार्या भावना खरडल्या होत्या
त्याच उतरवाव्यात असे वाटले.
शब्द : आनंद : म्हणजे
प्रथम माता होण्याचा
नवजात बाळाचे पहिले रडणे ऐकण्याचा
कळी खुलताना पहाण्याचा
इंद्राधनुष्य पहाण्याचा
झर्याचा खळखळाट ऐकण्याचा
पौर्णिमेचा चंद्र प्रतिबिंब पहाण्याचा
अचानकआलेल्या पत्राचा
दुचाकी सायकल शिकल्याचा
स्वैर विचारांचा
उत्स्फूर्त सुचलेल्या कवितेचा
खळ खळून हसण्याचा
बाळ उभे राहिल्याचा
पांढर्या शुभ्र ढगांचा
निळ्य आकाशात डोलणाऱ्या पतंगाचा
शीळ वाजवता आल्यावरचा
उन्हातून आल्यावर पाणी चवीने पिण्याचा
थंड सावलीचा, वार्याच्या झुळूकेचा
घंटेच्या निनादाचा
पहिल्या कमाईचा
दुसर्सयाच्गी होण्याचा
शून्यातून निर्माण करण्याचा
दिवा स्वप्ने पहाण्याचा
रात्री नंतर पहाट बघण्याचा
सूर्योदय, सूर्यास्त पहाण्याचा
लाटा किनार्यावर ये जा करताना
पहिल्या सरीचा
पक्षांच्या किलबिलीचा
अंधारात दूर दिवा दिसण्याचा
चांगल्या वाचनाचा
चांगल्या संगीताचा
नवीन कपड्यांचा
दिवाळीतील पणत्या रांगोळीचा
थोडक्यात ...
आनंदी आनद गडे
जिकडे तिकडे चोहीकडे
आनंद नव वर्षाचा
गुढीपाडव्याच्या सर्वांस शुभेच्छा
आनंद पहाण्यास सुरवात करूया
चला या शुभ दिनीचा हा संकल्प करूया
*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आले, मेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.
मी इयत्ता तिसरीत असेन त्तेव्हा तिचा आवाज मी प्रथम ऐकला
आणि तिथेच माझा छोटासा कलिजा खल्लास झाला
ते देखील ती बाला नजरेस न पडता !
गाणे होते " ऐ मेरे दिल कही और चल" (दाग)
त्यानंतर मी तुझा, तुझ्या आवाजाचा वेडा झालो
तो आज तागयात वेडाच राहिलो व मरेपर्यंत वेडा राहीन.
ह्या गाण्या पाठोपाठ माझ्या ओठावर चिकटलेले शहारे आणणारे गाणे म्हणजे
"आयेगा आनेवाला..."(महल). आठवड्यातून एकदा तरी शिट्टी वर न कळत वाजले जाते .
" एका तळ्यात होती ... हे भाव गीत ऐकले कि मला
ते कुरूप बदक कधी पाण्यात स्वतःला पाहिलं
व त्याचा राजहंस होईल हे ऐकण्यासाठी कान अधीर होत.
' कल्पवृक्ष कन्येसाठी"... गाणे ऐकले की आजही अंतरमन गहिवरून येते.
अगणित गाणी,अगणित भाव केवळ तुझा कंठ हि करामत करू शकतो.
भाव गीते, अभंग, सिने गीत. ३५ भाषेतील कुठलेही गाणे ऐका,
तुझ्या दैवी आवाजाने जगाला भारावून टाकले आहेस.
स्वत: मी दुसऱ्या आवाजात कधीच रमलो नाही, रमणे शक्यही नाही.
तुझ्या स्वराना ऐकून मी तरूणच राहीन.
झाले बहू होतील बहू... तुझ्यासम कोणी होणे नाही.
सहा फेब्रुवारी सकाळी ८:१२ मिनिटाने तुझा कंठ अबोल झाला.
नुसत्या बातमीने हादरलो. जरी अलीकडे तू गात नव्हतीस.
पोटात कालवा कालव झाली, हृदयाची घालमेल झाली,
मूक होऊन टीव्ही समोर तुला शांत झोपलेले पहात बसलो.
सायंकाळी तू पंचतत्वात विलीन होई पर्यंतनजर हटवली नाही.
तुझ्या लाखो करोडो चाहत्याचे डोळे मात्र भरून आले.
पहिले प्रेम हेच खरे असे म्हणतात,
तुझ्यावरील माझे प्रेम अमर राहील.
प्रिय मैत्रीणे तुला चीर शांती लाभो ही प्रार्थना.
खुर्ची ऑफिसमध्ये एकदा एकटाच बसलो होतो. समोर माझी खुर्ची होती. रोजचीच. अनेक वर्षे वापरलेली. त्या दिवशी मात्र पहिल्यांदाच तिच्याकडे नीट...