मोबाईलने जीवन सुखकर केल्या पासून फोन करण्या ऐवजी तरुण मंडळी Whats-app वर लिहून कळविणे पसंद करतात.असाच एक निरोप माझ्या पुतणी ने मला केला...त्याला उत्तर देताना न कळत मजेशीर यमक जुळत गेले. एक गम्मत.
पुतणी: काका,मी आज येऊ का भेटायला?
मी: वळकम अम्मा!
पुतणी: मी ४ वाजेपर्यंत पोहचते
मी: ओके अम्मा!
पुतणी: c u
soon, on my way, could be delayed by 15 min.
मी: ओके अम्मा!
(माझा मेंदू सरकला आणि...whats-appवर फिरू लागली बोटे )
...ओके बोके डोक्यावर पडले खोके
खोक्यातून पडला साबण तुझा मित्र रावण
रावणाची आई सुगरण तिने केले शिकरण
शिक्रणात पडली माशी झाली शिकरण नकोशी
रावणाची आई चिडली झाडावर जाऊन बसली
डोक्यात पडला पेरू रागावून आई म्हणाली
आता याला कसा कापू?नाही सुरी नाही चाकू
केला केला विचार तिने मारली उडी झाडावरून
रागाने गेली पाय आपटीत घरात
पाहून तिला धूमस्ताना लागला रावण हसायला
म्हणाला आई आई शांत हो एवढा क्रोध बरा नव्हे
काप त्या पेरूला उभा आडवा भर त्यात तीखट मीठ चाट मसाला
आणि दे सर्वाना खायला ऐकून रावणाचे बोलणे
आईला खुद्करून हसली...
एवढ्यात बेल दाराची वाजली
मी आलो whats-app मधून बाहेर
दार उघडले आणि लागलो हसायला
पुतणीने विचारले काय झाले काका
पट करून उत्तरलो काकांचा झाला बोका
बोक्याचा झाला खोका ...
No comments:
Post a Comment