५ -६ वर्षापूर्वी माझे वजन जरा जास्तच वाढले होते आरशात स्वतःला पाहणे सोडून
दिले होते त्याच वेळेस कोणीतरी एका भेटीत नवीन डायेटीशनचे नाव सुचवले. दुसर्याच
दिवशी मी स्वतःचे पाय पुन्हा स्वतःलादिसतील ह्या आशेने त्यांच्या पार्ल्यातील क्लिनिक
मध्ये हजर झालो पहील्या क्षणीच समोर बसलेल्या डॉक्टरांकडे (डॉक्टरांची उंची ६’ असावी तसेच शिडशिडीत बांधा )पाहून आपले
वजन नक्कीच ह्या कमी करू शकतील ह्याची खात्री पटली.त्यानंतर त्यांच्या
सांगण्याप्रमाणे १ महिना डायेट केला व पुन्हा मी आपल्या पायांचे दर्शन घेऊ शकलो.त्यांच्या ह्या जादूच्या कांडीस (डायेटला) व अथक पृथ्वी वरील वजन कमीकरण्याच्या प्रयत्नास माझा एक
छोटासा सलाम.
आमची काया तुमची माया
आमचा बी पी तुमची रेसिपी
आमचा कोलोस्टरोल तुमचा कंट्रोल
काल ५०० ग्राम कमीआज ६०० ग्राम कमी
वजनात घट होतेय भरा भरा
महिन्या अखेर रिपोर्ट आला बरा
पोटाचा नगारा झाला सपाट
पोटाचा नगारा झाला सपाट
नको आता पिझ्झा
नको वडा पाव
नको वास बासुंदीचा
नको वास बासुंदीचा
नको वास बिर्याणीचा
आता आरसा झाला सखा!
आता केवळएकच ध्यास सशक्त
आणि निरोगी शरीराचा
आभार! आभार! डॉक्टर ...
No comments:
Post a Comment