Monday, August 14, 2023

श्राद्ध?


श्राद्ध? 


माझ्या लहानपणी पितृपक्षात श्राद्धासाठी भटजी यायचे
आमचे वडील आपल्या आई वडिलांचे श्राद्ध घालीत असत.
आम्ही या पुजेस, कुतुहलाने बघण्यास बसत असू. 
नंतर काही वर्षाने हा सोपस्कार बंद झाला. 
का? कशासाठी? हे प्रश्न वडिलांना विचारणे अशक्य.

वयाने मोठा झाल्यावर शंका निरसन स्वतःच केले.

हिंदू धर्मात मनुष्य गेल्यावर १३ दिवसाचे सुतक
पाळले जाते व ह्या तेरा दिवसात गेलेल्या माणसाच्या 
आत्म्यास शांती व मोक्ष मिळावा या साठी 
केलेला खटाटोप म्हंजे  श्राद्ध 

तरी देखील हे शंका निरसन पटण्या जोगे नव्हते. कारण...
हिंदू धर्म हेही सांगतो कि मृत्यू नंतर मनुष्याचा अमर आत्मा 
शरीर सोडून  लगेच एका नवीन शरीरात प्रवेश करतो 
म्हणजेच आपल्या आवडत्या व्यक्तीने दुसऱ्या रुपात पुन्हा 
जन्म घेतला असतो.

अनुतरीत प्रश्न?
मृत्यू नंतर आत्मा श्राद्ध पूर्ण होई पर्यंत भटकत रहातो का?
कि लगेच आत्मा दुसऱ्या शरीरात शिरतो?
कि तेरा दिवसांनतर दुसरे शरीर पत्करतो?

ह्या समजुतीस हिंदू धर्माची मान्यता असल्यास 
शरीर सोडून गेलेल्या त्या आत्म्याचे स्मरण म्हणून 
वर्षोन वर्षे आपण श्राद्ध का घालतो?
आत्मा अमर आहे असे भगवद गीतेत ह्या श्लोकाने 

नैनं छिद्रन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक: । 
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत ॥

नमूद केलेय.

म्हणजेच श्राद्ध  हे त्या अमर आत्म्याचे स्मरण नसून त्याने धारण 
केलेल्या  व आपल्या सहवासात  वावरलेल्या त्या शरीराचे 
स्मरण करण्या करिता असते म्हणणे किती चुकीचे? 
 
गेलेल्या व्यक्तीचे स्मरण श्राद्धा शिवाय होतेच.
असते म्हणजेच  व्यक्तीचे शरीर आपणास 
व्यक्तीच्या आत्म्यापेक्षा  प्रिय असते.

म्हणजेच श्राद्ध कशासाठी? 
ओघाने पित्रुपक्ष  कशासाठी ?


   


 
 




  

Sunday, August 6, 2023

मैत्री

 सकाळ पासून फोन ची 

टीन टीन चालू होती,

आज मैत्री दिवस आहे ह्याची आठवण

करून देणारे वेग वेगवेगळ्या शब्दांकनात 

मैत्रीचे चाफे गुंफले होते, 

ह्यात आनंद एका गोष्टीचा 

की अनेक वर्ष न भेटलेल्यान्च्या 

स्मृतीत मी अजूनही स्थान करून होतो 

ह्या सर्व शुभेच्छा मध्ये सर्वात 

लक्षात रहाणारी शुभेच्छा  म्हणजे

सुदामाने कृष्ण से पुच्छा 

" दोस्ती का सही मतलब क्या है"

कृष्णने हसकर  जवाब दीया,

जहा "मतलब" होता है 

वहा दोस्ती कहा होती है"

ह्यात खऱ्या मैत्रीचे सार आहे.

"मैत्री दिवसाच्या प्रेम पूर्वक शुभेच्छा"


*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर  उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आलेमेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.
  


Saturday, August 5, 2023

नशा

 ४ वर्षांपूर्वी लिहिलेला ब्लॉग मी पुन्हा पब्लिश करतोयआजही योग्य पेक्षा वाढत्या व्यसनाचे वाढते परिणाम आपल्याला रोजच ऐकायला मिळतात म्हणून, पुन्हा एकदा स्वीकार करा.



 व्यसन लागले  

Two teenagers drown in Tapi River while taking a selfie.

Taking a selfie turns tragic at Bandra; girl, rescuer feared drowned.



विसरती जग भोवतालचे
हाती स्मार्ट फोन घेउनी
झाली युवा पिढी व्यसनी.
करावयाचे काय ग्रंथालय,
गरज काय ह्या मैदानांची
वाचन लेखन संगीत खेळ कुद
सर्व काही मिळते ह्या फोनवरी

कशा 
वेळ  फुकट घालवावा
संगीताच्या मैफिलीना
असता कानी स्मार्ट फोन! 

चुकून कधी भेटले चार मित्र
असले एकत्र तरी  

नाही हशा, नाही सम्भाषण 
विसरुनी भाषा मैत्रीची,
अवगतली मूक भाषा    
एकत्र आहोत आम्ही शरीराने!
करावयाची काय दुसरी भाषा

रोग हा सांसर्गिक पसरला
वणव्या परी,न सुटले पादचारी,
न वाहनचालक, आई,बाबा,
मामा,मावशी,अडकली कामवाली या पाशात  

प्रश्न भेडसावी एकच,
'विज्ञान संशोधन' लिहील का 
ह्या भूतलाचा अंत?

*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर  उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आलेमेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.
  


Wednesday, August 2, 2023

ढवळा ढवळ

ढवळा ढवळ 
वर्षांपूर्वी लिहिलेला ब्लॉग टाकायचा राहून गेला होता कि मी पुन्हा पब्लिश करतोय? वाचला असल्यास पुन्हा एकदा स्वीकार करा. 




गेल्या काही दिवसात देश विविध समस्यांनी ढवळून  निघाला आहे.

उगवत्या सीने ताऱ्याच्या  गूढ मृत्युने पूर्ण महाराष्ट्र झाकोळला आहे.
खून कि आत्महत्या यावर सर्व प्रसार  माध्यम आपली पोळी भाजून 
घेत आहेत. खरी मृत्युची चौकशी बाजूस राहून नशेबाजीवर 
केंद्रबिंदू सरकला आहे.बरेच सापळे बाहेर येत आहेत.
ढीग  वाढत चालला आहे. 

प्रश्न:  होणारा केर काढायला रोज कोण येणार ?.

एका उर्मट सिनेतारीकेने राजकारणी पाठींबा घेऊन
आपल्याच सह कलाकारांचे वाभाडे काढण्यास सुरवात केली
त्यात तिने राजकीय पक्षाच्या वर्तमान पत्रावर चिखलफेक 
करून आपल्याच अंगावर चिखल उडवून घेतला आहे.
महाराष्ट्रात आपली तिजोरी भरून,
आता  त्याच महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेवर 
अविश्वास दाखवून केंद्रा कडून सुरक्षा मिळविली आहे.
महाराष्ट्राच्या  राज्यकर्त्यांना द्वेषाचे राजकारण करावयास भाग पाडले आहे. 
अचानक  तिला आठवण झाली कि आपण महिला आहोत 
म्हणून तिने  दिल्लीच्या ताईना गळ घातलीय, 
"ताई मला होणाऱ्या अन्याया  पासून वाचवा 
एक महिलाच माझे दु:ख समजू शकते ."
ताईंनी कानावर हात ठेवले.
जशी वटवट वाढली तशी शासनानेआपल्या चाकोरीत काम केले,
राणीचा राजवाडा उध्वस्त केला.तशी राज्यपालांकडे  कडे धावली.  
झाशीची राणी म्हणून मिरविणाऱ्या या तारिकेस शेवटी उपसलेली 
तलवार म्यान करायला लागली. सुरु केलेली लढाई आता 
तिच्याच अंगलट आलीय बघून स्वगावी परतली. 
पण टीवटीव नाही थांबविली,
बसल्या जागी, कुरापती, उचापती चालूच ठेवल्या आहेत, 
प्रश्न: भूंकणाऱ्या कुत्रीचे  भुंकणे थांबवायचे  कसे? 
 
कोरोनाने आपला जोर काही कमी केलेला नाही. जनता आता ऐकेनाशी झालीय.
कोरोना पसरतच चाललाय.राज्यकर्ते नामो हरम झाले आहेत.
आता " माझे कुटुंब माझा परिवार" असे काहीसे ठरवून 
घरोघरी रोग निदानासाठी पथके पोहचत आहेत.  
प्रश्न: यावर उपाय काय? पहिली लस कधी येणार?
आरक्षण,आरक्षण.आरक्षण.

भटक्या, माग्स्लेल्या,व्मुक्त.आदिवासी व इतर जाती 
यांना ३०/% (?) 
आणि कुठल्या जमातीस २०%आरक्षण मग मराठ्याना ६०% 
का नको? हवे तर आम्ही न्याय निवाडा जाणत नाही, 
सरकारची चूक आम्ही भोगतोय.
आरक्षण  मिळालेच पाहिजे. 
प्रश्न: उच्च जातीयांनी काय करावे.


 

*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर  उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आलेमेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.





मंद झुळूक

“वाटते सानुली मंद झुळूक

मी व्हावे,घेईल ओढ मन, तिकडे स्वैर झुकावे" 


ही कविता म्हणजे मूर्तस्वरूपात मी.
लहानपणापासून माझे चित्त/मन/मेंदू कधीच एके ठिकाणी स्वस्थ विसावले/विसावला नाही,
चांगले का वाईट याचा मी कधीच आढावा घेतला नाही,
कारण ह्या विचारांना आजही ह्या मनाच्या अश्वाला मला लगाम घालता आला नाही.
एका विचाराचा दुसऱ्या विचाराशी काहीही संबंध नाते नसते. 

थोडक्यात सांगायचे तरह्यांचे नाते संबंध म्हणजे हिंग-पुस्तक-तलवार,

गाण्यांच्या, कवितेच्या ओळीपासूनते शाळेत कोयबा खेळताना कसा जिंकलो ते, शब्दांच्या नवीन व्याख्या पर्यत काहीही विचारांची भरकट.यात अनेक आठवणी, चेहरे, आयुष्यात ओझरते का होईना भेटलेले प्रवासी,मित्र, मैत्रिणी, सहकारी, शिक्षक, नोकर,चाकर, येणारे जाणारे,पट करून काही सेकंदासाठी डोकावतात एखादी आठवण करून देतात व लगेच नाहीसे होतात,

त्यांची जागा पुढील विचाराने घेतलीही असते.
असो.
जाहिरात क्षेत्रांत या भिर भिरत्या, फिरत्या मनाचा हा स्वैराचार फार उपयोगी पडला.
त्यामुळेच थोडे फार यश पदरात पडले.
ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधाना करिता कागदावर  उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, 
ना बाल गीतेमनी जसे आलेमेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,
हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.
माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.
ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,
काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.


'खचखोळ' {काही निवडक}-- १

 

गेली ३/४ वर्षे लिहलेल्या ब्लॉग ची उजळणी करताना मला असे जाणवले की,

बऱ्याच ब्लॉग मध्ये कांही कळत नकळ्त बरे विचार मांडले गेले आहेत 

म्हणून हे निवडक विचार पुन्हा एकदा मांडण्याचे धाडस. 


त्या संध्याकाळी, मी खरडलेला पेपर उघडला आणि त्यावर खरडलेली 

अक्षरे मला आवडली, आकर्षक वाटली. त्यांच्यात असंबंधित विचारांचा समावेश होता, 

जो माझ्या डोक्यात सारखा फिरत असतो. ह्या वेड्या विचारांनीच 

मला ब्लॉग चे नाव 'खचखोळ' ठेवण्यास प्रेरणा दिली. होय. 


वर्तमानात श्वास घेत, भूतकाळातील गुंता सोडवीत, स्मितहास्य करीत, 

सरत्या भविष्याचे स्वप्न बघावयाचे दिवस !

एकमेकास जपावयाचे दिवस 


आणखी एक दिवस उजाडला, 

हात लिहिताना नाही थरथरला, 

हस्ताक्षर उगाचच हसू लागले.


"जागृती" चित्रपट बरेच काही शिकवून गेला, 

दे दि हमी आझादी खडग बिना ढाल, साबरमती के संत तुने कर दिया कमाल!


माझे अनेक गुरु आज चंद्राने नेले. प्रत्येक गुरुपोर्णिमेस, चंद्र अधिक तेजोमय दिसू लागला.
गुरुपोर्णिमेस माझा चंद्रास नमस्कार,मी करतो माझी गुरुपोर्णिमा साकार. 

ह्या तिरकस विचारांनी मला प्रवाहा विरुद्ध वाटचाल करण्यास शिकविले 

एका रटाळ १५० मुलांच्या वर्गात, विज्ञान शाखेत १ अपयशी वर्ष घालविल्यानंतर, जे जे च्या सुंदर वास्तूत प्रवेश केला व प्रेमात पडलो. आता हेच आपले देऊळ मानून शिकायचे ठरविले.  

पृथ्वीवरील कोणतेही नाते वाईट नाही तुमचा तो दृष्टीकोन आहे. प्रयत्न करा आणि इतर दृष्टीकोनातून पहा नातं बदलेल.


कळणे, मिळणे, जुळणे हे तीन शब्द माझ्यासाठी आयुष्याचे सार सांगतात बघा विचार करून.



आपले 'जीवन' ही आपली नौका. वल्हवा, आत्मबळावर, वल्हवा आपल्या मर्जीने,पाहिजे त्या दिशेने हेच जीवनाचे सार. 


"जीवन म्हणजे अढळ रहाणे "कोणी न म्हणावे "उठ " कोणी न म्हणावे "बस"


अबोल प्रेम,

चाफ्याचे आणि सोनटक्याचे

फुलांची अदला बदल 

हेच त्यांचे बोल

एक सुवासिक प्रेम 

अबोलच राहिले. 


राज्य चालविताना आपल्या सैन्याचा सम्भाळ हा इतर कोठल्याही संकटापेक्षा महत्वाचा.! 

जुने जाऊ द्या मरणालागुनि

जाळूनी किंवा पुरुनी टाका

सडत न एका ठायी ठाका
सावध ऐका पुढल्या हाका


आनंद : म्हणजेच

प्रथम माता होण्याचा  

नवजात बाळाचे पहिले रडणे ऐकण्याचा

कळी खुलताना पहाण्याचा

इंद्रधनुष्य पहाण्याचा 

झऱ्या चा खळखळाट ऐकण्याचा 

पौर्णिमेचा चंद्र प्रतिबिंब पहाण्याचा

अचानक आलेल्या पत्राचा 

दुचाकी सायकल शिकल्याचा

म्हणजे आनंद.

 

जगण्यासाठी एकच काळ.वर्तमान काळ.  

चाफा आणि सोनटक्क्याचेअबोल प्रेम

 मी पाहिलंय ते अबोल प्रेम,    ते देखील दुतर्फी, विचार करा १ नाही तर ५ वर्षे  त्याचे रोज तिच्या बाकावर  नियमितपणे ती यावयाच्या पूर्वीच  हळुवा...