Wednesday, August 2, 2023

मंद झुळूक

“वाटते सानुली मंद झुळूक

मी व्हावे,घेईल ओढ मन, तिकडे स्वैर झुकावे" 


ही कविता म्हणजे मूर्तस्वरूपात मी.
लहानपणापासून माझे चित्त/मन/मेंदू कधीच एके ठिकाणी स्वस्थ विसावले/विसावला नाही,
चांगले का वाईट याचा मी कधीच आढावा घेतला नाही,
कारण ह्या विचारांना आजही ह्या मनाच्या अश्वाला मला लगाम घालता आला नाही.
एका विचाराचा दुसऱ्या विचाराशी काहीही संबंध नाते नसते. 

थोडक्यात सांगायचे तरह्यांचे नाते संबंध म्हणजे हिंग-पुस्तक-तलवार,

गाण्यांच्या, कवितेच्या ओळीपासूनते शाळेत कोयबा खेळताना कसा जिंकलो ते, शब्दांच्या नवीन व्याख्या पर्यत काहीही विचारांची भरकट.यात अनेक आठवणी, चेहरे, आयुष्यात ओझरते का होईना भेटलेले प्रवासी,मित्र, मैत्रिणी, सहकारी, शिक्षक, नोकर,चाकर, येणारे जाणारे,पट करून काही सेकंदासाठी डोकावतात एखादी आठवण करून देतात व लगेच नाहीसे होतात,

त्यांची जागा पुढील विचाराने घेतलीही असते.
असो.
जाहिरात क्षेत्रांत या भिर भिरत्या, फिरत्या मनाचा हा स्वैराचार फार उपयोगी पडला.
त्यामुळेच थोडे फार यश पदरात पडले.
ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधाना करिता कागदावर  उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, 
ना बाल गीतेमनी जसे आलेमेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,
हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.
माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.
ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,
काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.


No comments:

Post a Comment

चाफा आणि सोनटक्क्याचेअबोल प्रेम

 मी पाहिलंय ते अबोल प्रेम,    ते देखील दुतर्फी, विचार करा १ नाही तर ५ वर्षे  त्याचे रोज तिच्या बाकावर  नियमितपणे ती यावयाच्या पूर्वीच  हळुवा...