श्राद्ध?
माझ्या लहानपणी पितृपक्षात श्राद्धासाठी भटजी यायचे
आमचे वडील आपल्या आई वडिलांचे श्राद्ध घालीत असत.
आम्ही या पुजेस, कुतुहलाने बघण्यास बसत असू.
नंतर काही वर्षाने हा सोपस्कार बंद झाला.
का? कशासाठी? हे प्रश्न वडिलांना विचारणे अशक्य.
वयाने मोठा झाल्यावर शंका निरसन स्वतःच केले.
हिंदू धर्मात मनुष्य गेल्यावर १३ दिवसाचे सुतक
पाळले जाते व ह्या तेरा दिवसात गेलेल्या माणसाच्या
आत्म्यास शांती व मोक्ष मिळावा या साठी
केलेला खटाटोप म्हंजे श्राद्ध
तरी देखील हे शंका निरसन पटण्या जोगे नव्हते. कारण...
हिंदू धर्म हेही सांगतो कि मृत्यू नंतर मनुष्याचा अमर आत्मा
शरीर सोडून लगेच एका नवीन शरीरात प्रवेश करतो
म्हणजेच आपल्या आवडत्या व्यक्तीने दुसऱ्या रुपात पुन्हा
जन्म घेतला असतो.
अनुतरीत प्रश्न?
मृत्यू नंतर आत्मा श्राद्ध पूर्ण होई पर्यंत भटकत रहातो का?
कि लगेच आत्मा दुसऱ्या शरीरात शिरतो?
कि तेरा दिवसांनतर दुसरे शरीर पत्करतो?
ह्या समजुतीस हिंदू धर्माची मान्यता असल्यास
शरीर सोडून गेलेल्या त्या आत्म्याचे स्मरण म्हणून
वर्षोन वर्षे आपण श्राद्ध का घालतो?
आत्मा अमर आहे असे भगवद गीतेत ह्या श्लोकाने
नैनं छिद्रन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक: ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत ॥
नमूद केलेय.
म्हणजेच श्राद्ध हे त्या अमर आत्म्याचे स्मरण नसून त्याने धारण
केलेल्या व आपल्या सहवासात वावरलेल्या त्या शरीराचे
स्मरण करण्या करिता असते म्हणणे किती चुकीचे?
गेलेल्या व्यक्तीचे स्मरण श्राद्धा शिवाय होतेच.
असते म्हणजेच व्यक्तीचे शरीर आपणास
व्यक्तीच्या आत्म्यापेक्षा प्रिय असते.
म्हणजेच श्राद्ध कशासाठी?
ओघाने पित्रुपक्ष कशासाठी ?
No comments:
Post a Comment