गेली ३/४ वर्षे लिहलेल्या ब्लॉग ची उजळणी करताना मला असे जाणवले की,
बऱ्याच ब्लॉग मध्ये कांही कळत नकळ्त बरे विचार मांडले गेले आहेत
म्हणून हे निवडक विचार पुन्हा एकदा मांडण्याचे धाडस.
त्या संध्याकाळी, मी खरडलेला पेपर उघडला आणि त्यावर खरडलेली
अक्षरे मला आवडली, आकर्षक वाटली. त्यांच्यात असंबंधित विचारांचा समावेश होता,
जो माझ्या डोक्यात सारखा फिरत असतो. ह्या वेड्या विचारांनीच
मला ब्लॉग चे नाव 'खचखोळ' ठेवण्यास प्रेरणा दिली. होय.
वर्तमानात श्वास घेत, भूतकाळातील गुंता सोडवीत, स्मितहास्य करीत,
सरत्या भविष्याचे स्वप्न बघावयाचे दिवस !
एकमेकास जपावयाचे दिवस
आणखी एक दिवस उजाडला,
हात लिहिताना नाही थरथरला,
हस्ताक्षर उगाचच हसू लागले.
"जागृती" चित्रपट बरेच काही शिकवून गेला,
कळणे, मिळणे, जुळणे हे तीन शब्द माझ्यासाठी आयुष्याचे सार सांगतात बघा विचार करून.
आपले 'जीवन' ही आपली नौका. वल्हवा, आत्मबळावर, वल्हवा आपल्या मर्जीने,पाहिजे त्या दिशेने हेच जीवनाचे सार.
"जीवन म्हणजे अढळ रहाणे "कोणी न म्हणावे "उठ " कोणी न म्हणावे "बस"
अबोल प्रेम,
चाफ्याचे आणि सोनटक्याचे
फुलांची अदला बदल
हेच त्यांचे बोल
एक सुवासिक प्रेम
अबोलच राहिले.
राज्य चालविताना आपल्या सैन्याचा सम्भाळ हा इतर कोठल्याही संकटापेक्षा महत्वाचा.!
जुने जाऊ द्या मरणालागुनि
जाळूनी किंवा पुरुनी टाका
सडत न एका ठायी ठाका
सावध ऐका पुढल्या हाका
आनंद : म्हणजेच
प्रथम माता होण्याचा
नवजात बाळाचे पहिले रडणे ऐकण्याचा
कळी खुलताना पहाण्याचा
इंद्रधनुष्य पहाण्याचा
झऱ्या चा खळखळाट ऐकण्याचा
पौर्णिमेचा चंद्र प्रतिबिंब पहाण्याचा
अचानक आलेल्या पत्राचा
दुचाकी सायकल शिकल्याचा
म्हणजे आनंद.
जगण्यासाठी एकच काळ.वर्तमान काळ.
No comments:
Post a Comment