ढवळा ढवळ
वर्षांपूर्वी लिहिलेला ब्लॉग टाकायचा राहून गेला होता कि मी पुन्हा पब्लिश करतोय? वाचला असल्यास पुन्हा एकदा स्वीकार करा.
गेल्या काही दिवसात देश विविध समस्यांनी ढवळून निघाला आहे.
उगवत्या सीने ताऱ्याच्या गूढ मृत्युने पूर्ण महाराष्ट्र झाकोळला आहे.
खून कि आत्महत्या यावर सर्व प्रसार माध्यम आपली पोळी भाजून
घेत आहेत. खरी मृत्युची चौकशी बाजूस राहून नशेबाजीवर
केंद्रबिंदू सरकला आहे.बरेच सापळे बाहेर येत आहेत.
ढीग वाढत चालला आहे.
प्रश्न: होणारा केर काढायला रोज कोण येणार ?.
एका उर्मट सिनेतारीकेने राजकारणी पाठींबा घेऊन
आपल्याच सह कलाकारांचे वाभाडे काढण्यास सुरवात केली
त्यात तिने राजकीय पक्षाच्या वर्तमान पत्रावर चिखलफेक
करून आपल्याच अंगावर चिखल उडवून घेतला आहे.
महाराष्ट्रात आपली तिजोरी भरून,
आता त्याच महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेवर
अविश्वास दाखवून केंद्रा कडून सुरक्षा मिळविली आहे.
महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना द्वेषाचे राजकारण करावयास भाग पाडले आहे.
अचानक तिला आठवण झाली कि आपण महिला आहोत
म्हणून तिने दिल्लीच्या ताईना गळ घातलीय,
"ताई मला होणाऱ्या अन्याया पासून वाचवा
एक महिलाच माझे दु:ख समजू शकते ."
ताईंनी कानावर हात ठेवले.
जशी वटवट वाढली तशी शासनानेआपल्या चाकोरीत काम केले,
राणीचा राजवाडा उध्वस्त केला.तशी राज्यपालांकडे कडे धावली.
झाशीची राणी म्हणून मिरविणाऱ्या या तारिकेस शेवटी उपसलेली
तलवार म्यान करायला लागली. सुरु केलेली लढाई आता
तिच्याच अंगलट आलीय बघून स्वगावी परतली.
पण टीवटीव नाही थांबविली,
बसल्या जागी, कुरापती, उचापती चालूच ठेवल्या आहेत,
प्रश्न: भूंकणाऱ्या कुत्रीचे भुंकणे थांबवायचे कसे?
कोरोनाने आपला जोर काही कमी केलेला नाही. जनता आता ऐकेनाशी झालीय.
कोरोना पसरतच चाललाय.राज्यकर्ते नामो हरम झाले आहेत.
आता " माझे कुटुंब माझा परिवार" असे काहीसे ठरवून
घरोघरी रोग निदानासाठी पथके पोहचत आहेत.
प्रश्न: यावर उपाय काय? पहिली लस कधी येणार?
आरक्षण,आरक्षण.आरक्षण.
भटक्या, माग्स्लेल्या,व्मुक्त.आदिवासी व इतर जाती
यांना ३०/% (?)
आणि कुठल्या जमातीस २०%आरक्षण मग मराठ्याना ६०%
का नको? हवे तर आम्ही न्याय निवाडा जाणत नाही,
सरकारची चूक आम्ही भोगतोय.
आरक्षण मिळालेच पाहिजे.
प्रश्न: उच्च जातीयांनी काय करावे.
*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आले, मेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.
No comments:
Post a Comment