आज एक प्रेम कविता
चक्क वर्तमान पत्रात मिळाली
लिहिलेल्या लेखात, लेखिकेने
आपल्या वडिलांनी
आई गेल्यावर केलेली कविता
ते रोज कसे प्रार्थने सारखे तिच्या फोटो
जवळ उभे राहून वाचत असत
ह्याचा उल्लेख केला आहे.
मला ह्या खऱ्या प्रेमाची प्रार्थना
खुपच स्पर्श करून गेली
ही प्रेम प्रार्थना मी मराठीत अनुवादित करून सादर करतोय
"आज तुझी आठवण मी प्रेमाने काढली
पण त्यात काही नावीन्य नव्हते
मी काल देखील तुझी आठवण काढली
आणि त्याच्या आदल्या दिवशी देखील
शांत चित्ताने देखील मी तुझा विचार करतो
तुझे नाव देखील घेतो
माझ्या पाशी केवळ तुझ्या आठवणीच
आणि तुझे छाया चित्र असलेली ही फोटो फ्रेम
तुझ्या आठवणी केवळ माझ्यासाठी
मी त्या कधीच दूर करू शकत नाही,
करणार ही नाही,
परमेश्वरासाठी तू त्याच्या स्वर्गात आहेस
माझ्यासाठी मात्र तू सदैव
माझ्या हृदयातच रहाशील. "
No comments:
Post a Comment