एकांत.
एकांतात. मी पहात होतो आकाश पौर्णिमेस
चालू होता चंद्राचा तारकां सोबतचा लपंडावाचा खेळ.
उजवीकडे रमने भरलेला ग्लास.
एकी एक दुरकी दोन तिरकी तीन
करीत होता व्यायाम उजवा हात.
पहात चंद्राकडे. चंद्राचे चाळे चालूच होते,
नकळत चौकी चार झाले. हात आता मात्र दमला,
डोळ्यांना आता चन्द्र फुटलेल्या हाफ फ्राय सारखा दिसू लागला,
चांदण्या गायब . चन्द्र आता एकटा. मी एकटा. सोबतीचा
एकांत हि एकटा.
पाहून निद्रेने पांघरूण सरकवले डोळ्यांवर.
कोपरा.
मूठभर आपले हृदय,
म्हणजे हौसिंग सोसायटी.कितीतरी वेग वेग वेगळ्या हृदयांना
जागा देते, कोणास १ रूम किचन,
कोणास २ बेडरूम,काहींना पूर्ण मजलाच,
जसे प्रेम तसे जागा वाटप.
हृदय कोणाचे पण असो
प्रेमाने भरलेले असतेच असते,
द्वेषाने भरलेले हृदय
फार क्वचित.
हृदयात देखील एक गुपित
एक राखीव कोपरा, जो केवळ त्या
हृदयास माहीत.
कोपरा, एक अबोल प्रेमाचा असतो
अबोल प्रेम फार खास असत
जेथे हृदयच सवांद साधू शकते.
ह्या कोपऱ्यात रहाणाऱ्याला
एकांताशी मैत्री बरी वाटते
ह्या मैत्रीस व्याख्या नसते
No comments:
Post a Comment