पुन्हा एकदा मोर.
आज सकाळी जागआली व खिडकी बाहेर पाहिले आकाश काळ्या ढगांनी आच्छादलेले. पाहून त्या आकाशाकडे , आठवण झाली जुन्या ब्लॉगची. पहा वाचून आजही वाचण्यात किती आनंद आहे तो.
काळे ढग वेगाने धावत आकाशात एकत्र जमू लागले
एका पांढऱ्या ढगाने काळ्या ढगास विचारले
“ अरे कारे जमला आहात तुम्ही सारे? ”
तसे काळा म्हणाला “ माहित कसे नाही तुला?
सारे काळे जमले म्हणजे आता मोर नाचणार!
आम्ही सर्व एकमेकावर आपटून ढोल वाजवणार,
आमची मैत्रीण डिस्को बिजली, लाईट चालू करणार,
तुला यायचे आहे का? तर चल... पण आधी काळा हो”
असे म्हणताच पाढरयाने काळयास मिठी मारली व झाला काळा.
निघाला नाच पहायला, ढोल वाजवायला.
पोहोचले सर्व महाला समोरील बागेवर. लागले हळू हळू ढोल वाजवायला,
ऐकून ढोल, मोरांचा थवा लागला थुई थुई नाचायला,पिसारे लागले फुलायला,
डिस्को बिजलीने सुरु केला थय थयाट, आता मोर, ढग,बिजली येऊ लागले रंगात,गडगडाट,कडकडाट, गडगडाट, कडकडाट आवाज वाढू लागले
बगीचा पिसाऱ्यानी कृष्णमय झाला, एवढ्यात...
काळ्याचे ढोल फाटले, आणि पावसाच्या धारा लागल्या,
बिजली पळाली भिजून,थकले मोर नाचून,
धरती मात्र हसू लागली हिरवीगार होऊन.
No comments:
Post a Comment