झाल्या निवडणूका
सुटला होता वारा भाजपा चा
अब कि बार ४०० पार
होता हा नारा!
शहाण्यां जनता जनार्दनांनी
बदलली दिशा वाऱ्याची,
रडत खडत २४० मिळवले भाजपाने
मात्र सत्तेसाठी कमी पडले
लंगडत रडत कुबड्या शोधल्या,
स्वार्थी आले पुढे दोन, सरकार पुढे शर्ती ठेऊन,
केले सरकार त्यांनी चालू
स्वार्थी निर्लज्ज बोके पुन्हा एकदा
गादीवर बसले,
राष्ट्र्पतींनी, दिलेले भाषण वाचले,
राष्ट्रपतींच्या भाषणास खणखणीत
प्रत्युतर दिले विरोधक म्होरक्याने
धाबे दणाणून सोडले सत्ताधाऱ्यांचं
विरोधक आता राहिले नाही कच्चे
सर्व सरकारी तोंडे बंद केली भाषणाने
जनतेस आता चांगला बोध मिळाला
बोलेल तो करेल काय?
झोप उडवली गु...गँगची
उतरादाखल केली टाळा टाळ
हवा गेलेल्या ५६ इंच छातीने
जेव्हां आली पाळी भाषणाची
समजेना बोलू काय?
उकरत बसले थडगी ५० वर्षा पूर्वीची
नव्हता रस जनतेला केले कान बंद
२४० टाळ्या मिळवून, झाले विराजमान
खोटे खोटे खुश होऊनि
कळून चुकले मनोमनी आपले दिवस सम्पले
खात्री पटली आता काही खैर नाही
आता अरे ला कारे होत रहाणार
तेव्हां धूम ठोकली परदेशी
गेले ज्या देशी,
त्याचे नावही चुकविले भाषणी
आता धनाजी संताजीच्या रूपाने
विरोधक दिवसा ढवळ्या दिसू लागले
सरकार आता भागो विरोधक आया
भीतीने पळते झाले.
अवतरले देवाचे अंश महाराष्ट्री
गोड गॉड वचने देऊन पुसली पाने
१+२ उप-मंत्र्यांना,माना डोलावत मुखवास
चघळत राहिले वचने १+२ उपमंत्री .
१+२ उप मंत्र्यांना वाटली वचने खरी
लाडक्या बहीणभावांना
खिरापत वाटली शब्दांची
करीत आपलेसे पुढील निवडणुकीला.
दिवाळी उलटून जाईल ओवाळणीचे
ताट मात्र रिकामे राहील ताई दादांचे
जनतेचा विश्वास उडाला
असा हा सावळा गोंधळ
राज्या राज्यातून चालला
सरड्याचे कुंपण आता लहान झाले
कळून चुकले बागडण्याचे
उडण्याचे दिवस सम्पले
जनतेनेच पंख छाटले
जनतेस चांगला बोध मिळाला.
सावधानतेने टाकूया पाय
जेणे करून मत फुकट ना जाय.
बोलेल तो करेल काय ...
No comments:
Post a Comment