Friday, October 25, 2019

वावटळ 7



अनेक वेळा डोक्यात विचार एकाच वेळेस कल्लोळ करतात व वावटळी सारखे डोक्यात फिरत राहतात त्यांचा एकमेकाशी कसलाही मेळ नसतो.अशीच एक वावटळ .    









 

Wednesday, October 2, 2019

तारुण्यात पुनर प्रवेश (पुन्हा एकदा)


माझ्या समवयस्क मित्रानो मैत्रिणिनो

तरुण व्हायचय?
सापडला! सापडला! सापडला!
तरुण व्हायचा घरगुती उपाय सापडला!
घरगुती उपाय सापडला!
केव्हाही, कुठेही, कधीही,
करता येण्यासारखा सोपा उपाय...
आता यास लागणारी

सामग्री:
तुमचा laptop अथवा
स्मार्ट फोन, घरातील अथवा बाहेर कुठेही
एक शांत कोपरा,जागा, हेड फोन्स,
एकांत, शाबूत असलेली श्रवण इंद्रिये.
वेळोवेळी आठवणी टिपलेला मेंदू,
सर्वात महत्वाचे नेटवर्क मिळणारी जागा
झालात तुम्ही तरुण.
कृती:
आपल्या आवडत्या एकांतात बसल्यावर
हळुवार  स्मार्ट फोन, laptop उघडा
4G नेट वर्क चेक करा, आता यु टयूब वर जा
टाईप करा “५० best songs of
लता मंगेशकर” क्लिक करा ...
डोळे पाहिजे तर बंद करा
आठवणी डोळ्यासमोर
आणायच्या असतील तर उघडे ठेवा
समोरचा व्हिडीओ पहा, आणि,,,
ऐकता ऐकता, बघता बघता १ मिनिटात
तुमची ४०/४५ वर्षे कमी होतील
पूर्ण तारुण्य तुमच्या बंद डोळ्यासमोर उभे राहील,
उघड्या डोळ्यांनी त्यावेळेस पाहिलेल्या
प्रत्येक चित्रपटाची आठवण येईल
कोणा बरोबर, कधी, कुठल्या,थिएटरमध्ये,कॉलेज बुड्वून फर्स्टदे फर्स्ट शो
आवडती हिरोईन, आवडता हिरो,
अहो त्या दिवशी कोणी कुठले कपडे
घातले होते इथ पर्यंत तारुण्याची झलक मिळेल,  
एक प्रकारचा नशा येईल,रक्त सळसळेल,डोळे उघडू नयेसे वाटेल
उघड्या डोळ्यांनी तुम्ही त्या काळात भ्रमंती कराल.
पण लक्षात घ्या त्या पार्श्व गायिकेची,
गान कोकिळेची, मधाळ आवजाची ५० वर्षाची
कमाल तुम्हाला  रिझवण्याची,
झाले बहु होतीलही बहु
पण लता सम लताच !!!
भाग्यवान आपण, आपल्या तारुण्यास
लताने तिच्या आवाजाची
एक सोनेरी झालर लावली.
तिला ऐकता ऐकता ५० वर्षे कशी
गेली हे कळालेच नाही.
३ एक दिवसापूर्वी तिला ९० वर्षे
पूर्ण झाली. माझ्या भाग्यात मात्र
एक डिझाइनर  म्हणून
“लता ५० वर्षे”
ह्या एच एम व्ही तर्फे प्रकाशित
केलेल्या क्यासेट कव्हर्स करण्यास मिळाले
व माझ्या आवडत्या गायिकेची स्वाक्ष्ररी
घेण्यास मिळाली, हा क्षण मी कधीही
विसरू कसा शकेन

“लता शतायू भव”   


   

Tuesday, September 24, 2019

रहाट गाडा

मला काय?
तुला काय?
ह्याला काय?
त्याला काय??
कुणाला काय? तर कुणाला काय

मग चाललय काय?
ट्राफिक नाही हलत,
पाऊस नाही थांबत,
ट्रेन नाही चालत,
विरोधकांसाठी सरकार नाही चालत,
इविएम मशीन्स देखील नाही चालत,
पेट्रोल डीझेल देखील महागलंय,
मग चाललय काय?
खऱ्याखोट्या नोटा
पेटीएम,क्रेडीट कार्ड,
लष्कराची दमदाटी,
राजकीय हेरां फेरी,
बँकांची लुट मार चालूच
मग चाललय काय?
निवडणुका कोपऱ्यावर आल्यात
मोठे मोठे मासे इडीच्या जाळ्यात
खुर्चीसाठी पक्षी उडतायत,
स्वाभिमानी भुंगा कमळाभोवती
पिंगा घालतोय,ऐका,नऐका
गृहमंत्र्यांच्या नवीन गर्जना
चालूच आहेत
आता जणगणना म्हणे फोनवर,
विलीनीकरणाच्या भीतीने
बँका संप मागे पुढे करतायत,
अहो अचानक बँका बंद होतायत
 खातेदार रस्त्यावर रडतायत
अर्थमंत्री कॉर्पोरेट ना खुश करून
स्वतःखुश होऊन भरतनाटयम करतायत,
इटली,मुक सरदारांना घेऊन
लुंगीला भेटायला तिहारचा फेरफटका मारतायत
विराट धक्के मारून संघास निडर बनवतोय,
कंगना अम्मा बनण्यासाठी कष्ट घेतेय,
शेअर बाजार वधारतोय,
हो, चद्रयानाचे भ्रमण थांबले
पंत प्रधानांचे भ्रमण मात्र जोरात चाललय,
मग चाललय काय?
हे सर्व बघत ऐकत तुमचे, माझे,
आयुष्याचे रहाट गाडे चाललय!



Saturday, September 7, 2019

३६५ दिवस


३६५ दिवस  गेले उडून भुर्रकन.
आमची मत माउलीचे वय १ वर्षाने वाढले.
तिच्या वाढदिवसाच्या निमिताने येते ७ दिवस 
जत्रा भरते. आमच्या साठी हे ७दिवस अमळशा दगदगीचे,
मेरीने  दिलेल्या जागेत,  तिच्या पाय्थ्याशी आमची 
४२ वर्षे गेली.येथे राहायला आलो तेव्हां पासून
ते आज पर्यंत आमची गावदेवी म्हणून तिने 
आम्हाला काहीही कमी पडू दिले नाही. 
मत माऊलीस वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.




Sunday, September 1, 2019

आगमन







अहो बघता बघता लागला की हो
९वा महिना या वर्षाचा.
सुरुवात किती छान हर्तालीकेच्या पुजेने,
उद्या पासून तर जल्लोष सुरु होणार
सर्वांच्या लाडक्या दैवताची,श्री गणेशाची,
आनंदाची लाट घेऊन होणार आगमन.
‘गणपतीबाप्पा मोरया,’
‘पायी हळूहळू चाला मुखाने गजानन बोला’,
सुखकर्ता दुखःहर्ता... जल्लोषात.  
सर्व शहरातून,गावागावातून
मंगलमय वातावरण पसरेल.    
श्री गजानन, घरो घरी,
आपले बस्तान बसवतील.
शहरातून प्रत्येक नाक्यावर सार्वजनिक
गजाननाची स्थापना होईल,
आमचा राजा, तुमचा राजा,त्यांचा राजा,
श्रीमंत राजा,पाहण्यास,देवदर्शनास
उन्हा तान्हाची पर्वा न करता
लांब,लांब रांगा लावतील,
हा उत्साह अनंत चतुर्दशी पर्यंत
वाढतच जाईल.
अनंत चतुर्थीचा दिवस बाप्पाला,
जड अंतकर्णाने निरोप देण्यास
सर्व महाराष्ट्र एक मुखाने
“गणपतीबाप्पा मोरया
पुढच्यावर्षी लवकर या”
गर्जनेत बाप्पाचा निरोप घेतील.
पुन्हा रोजच्या रहाटगाडग्याला
स्वतःला जुम्प्तील.
मनात मात्र गजाननाच्या
आठवणीनेs पुटपुटतील  
“गणपती आले नाचून गेले”

Sunday, August 25, 2019

वावटळ७

अनेक वेळा डोक्यात विचार एकाच वेळेस कल्लोळ करतात व वावटळी सारखे डोक्यात फिरत राहतात त्यांचा एकमेकाशी कसलाही मेळ नसतो.अशीच एक वावटळ .    





‘वावटळ’
नेहमी प्रमाणे सकाळचा ‘शुभ प्रभात’ चा
संदेश गेल्या बरोबर त्या पाठोपाठ
दुसरा संदेश माझ्या नियमित ब्लॉग वाचकाचा,
म्हणजेच बहिणीचा आला ‘बऱ्याच दिवसात
काही लिहिले नाहीस’ काहीतरी उत्तर द्यावयाचे
म्हणून लंगडी सबब पुढे केली,
पण लिहावयाचे नक्की केले.
पण काय?
वह्यांचे बाड काढून बसलो पण काहीच
खास ‘विचार’ खरडलेले आढळले नाहीत,
जे काही होते त्याची ‘वावटळ’ मध्येच
गणना होती.
तर ही ती  ‘वावटळ’

‘आत्मा’
स्वप्नात? जाग? आली तेव्हां मी त्रिशंकू सारखा
अधांतरी लटकत होतो, ना धरती ना आकाश
मग लक्षात आले मी शरीर सोडले होते
व मी ‘आत्मा’ रुपात भटकत होतो.

मुखवटा 
जन्मदात्यांनी दिलेला मुखवटा एका ठराविक
काळापर्यंत मिरवतो आणि नंतर जसे वय वाढते तसे  प्रसंगानुसार मुखवटे बदलत रहातो, मग आपला खरा मुखवटाच 
आपण हरवतो
मग कधीतरी एकांतात...
तो सावलीसारखा डोकावतो,
पण पुन्हा त्यालां वापरण्याचे धैर्य,
फार थोड्यांनाच जमते.

ताजा तवाना!
मेंदू बुरसट  होऊ नये म्हणून
एक जालीम उपाय रोज
दिवसातून दोन वाक्य लिहावीत,
चार वाक्य वाचावीत,
व आठ वाक्ये स्मरावीत.
तरच तो राहील ताजा तवाना!

रस्ता 
रस्ता सापडत नाही म्हणून हताश
होऊ नये जोमाने दुसरा रस्ता शोधावा
नाहीच मिळाला तर स्वतःतयार करावा.

Monday, August 5, 2019

रिकामे मडके


   
अंदाजे २५ दिवस होत आले पण
माझे मडके मात्र रिकामे,विचारात ३ आठवडे गमावले.
आज ठाम विचार केला काही झाले तरी
मेंदूला गदा गदा हलवून,जागृत करून,
बाहेर पडणाऱ्या मुसळधार सरी पासून
प्रेरणा घ्यावयाची व ब्लॉग मध्ये काहीतरी
खरडायचे. पण काय?
निसर्गाने कोप केलाय त्यावर ...?
कश्मीर राजकारण... नको नको...
ज्यात समज नाहीत्यात नाक खुपसू नये 
आईची शिकवण,मग खेळ विशेष वर...? 
नकोरे बाप्पा!सर्वांनाच खेळ थोडेच आवडतात?
JJच्या नवीनच, प्रथमच,अंगीकारल्या
भूमिकेबद्दल? नको...नको...
आता तर थोडी मुलांशी ओळख होतेय,
प्रत्येकाच्या मेंदूच्या सुरुकत्यांची शिरगणती 
मीच घेतोय,मग त्यावर लिहिण्यास अजून 
६ महिने तरी लागतील...ह्याचाच अर्थ...
‘थांबला तो संपला काळपुढे चालला
धावत्यास शक्ती येई आणि रस्ता सापडे...’

आता उपाय एकच धावत रहाणे.
bhag arun bhag...


खुर्ची

  खुर्ची ऑफिसमध्ये एकदा एकटाच बसलो होतो. समोर माझी खुर्ची होती. रोजचीच. अनेक वर्षे वापरलेली. त्या दिवशी मात्र पहिल्यांदाच तिच्याकडे नीट...