Monday, December 31, 2018
Saturday, December 29, 2018
७ दशके
संपले! संपले! २०१८ साल
संपले!३६५ दिवस भुर्रर करून उडाले.
बघता बघता आयुष्याची साडे सात
दशके पार केली. कशी?
ही अशी,
दशक पहिले.घरातल्यांशी ओळख होण्यात, ही
आई, हे वडील,हे भाऊ, ह्या बहिणी,हे आपले घर वगैरे वगैरे समजण्यात
संपले अर्धे दशक. पुढची ५ वर्षे गेली शाळेशी
ओळख होण्यात,अनेक विषय डोक्यातील कप्प्यात साठविण्यात.प्राथमिक, माध्यमिक करीत,केलाप्रवेश
२ऱ्या दशकात,जाणीव झाली भावंडा बाहेरही मित्र असू शकतात. गद्य, पद्य
ह्यातील फरक, बालकवी, विंदा, अनिल,बा.भ. पु.ल.ह्यांची दर्शनाशिवाय ओळख करून, गणित
व बीजगणितातील फरक समजून घेण्यात केव्हा शाळा संपली व कधी मिसुरड घेऊन विद्यालयाची
पायरी चढलो, ह्या पायऱ्यावर ओळख झाली सिनेतारका, नटांशी राज कपूर, देव आनद पासून ग्रेगरी
पेक,क्लिंट इस्टवूड आणि नर्गिस मीना कुमारी ते एलेझाबेथ टेलर, गोल्डी हॉर्न ह्यांच्याशी
मैत्री होते ना होते, तो लगेच नोकरीच्या घाण्याला
जुम्पंलो, सकाळी ९ ते...? करीत, ध्येयाची शिडी चढत,
तिसऱ्या दशकात प्रवेश केला,
मला वेळ नाही बघून
वरच्यानेच दया येऊन लग्न जुळवले, अंजलीच्या प्रवेशाने माझा अरुणोदय खऱ्याअर्थाने
झाला. प्रसिद्धी, पैसा, सन्मान आणि दोन गुणी मुले असा दुग्घ्दशर्कराचा योग पूर्ण
केला तिसऱ्या दशकाने.
४थ्या दशकाच्या सुरुवातीस स्वतःचे संस्थान प्रस्थापित
केले,देशभर नावारूपास आणले व
५व्या दशकात पाय ठेवला शुभ अशुभ, उद्योगातील
चढ उतार व आपलेच संस्थान सोडण्याचे प्रसंग ह्या दशकात पहिले.
६व्या दशकात
पुन्हा गमभन गिरवित नवीन संस्थान उभे केले, पूर्वार्धात उत्तम बस्थान बसविले,
उत्तरार्धातमात्र उतारावर उभे असल्याची जाणीव झाली,कामात ओहोटीची सुरुवात झाली,व
७व्या
दशकाची नांदी झाली,
स्वतःच्या पाठीवर स्वतःच्या
कर्तबगारीबद्दल थाप मारून शाब्बासकी दिली व ठरवले, बस्स! बहुत हो गया!
जा अरुण
जा जिले अपनी जिंदगी अपने ख़ुशी से! असे म्हणत
सातव्या दशकात
दुकान बंद केले. रोज एक रेखाटन,व मनात घोळणाऱ्या वेड्या विचारांना ब्लॉग
द्वारे वाट दिली,बघता बघता त्यात ४ वर्षे ६महिने गेले,त्याबरोबर २०१८ देखील सरले. (हो अजून एक दिवस बाकी आहे).
तो हि सरेल. साडे सात दशके नजरे
समोरून ७ दिवसा सारखी सरकली.
ह्या सात दशकांच्या वाटेत . आनंद, दुखः सहन करण्याची ईश्वराने हिम्मत दिली,
त्याच्या आशीर्वादाने हा सात दशकांचा प्रवास शक्य झाला. त्यला माझा साष्टांग दंडवत.
अशी हि सात दशकाची संक्षिप्त कहाणी सफळ संपूर्ण.
ह्या सात दशकांच्या वाटेत . आनंद, दुखः सहन करण्याची ईश्वराने हिम्मत दिली,
त्याच्या आशीर्वादाने हा सात दशकांचा प्रवास शक्य झाला. त्यला माझा साष्टांग दंडवत.
अशी हि सात दशकाची संक्षिप्त कहाणी सफळ संपूर्ण.
CHEERS!!!
HAPPY & HEALTHY 2019!!
Sunday, December 23, 2018
Monday, December 17, 2018
भाषा
मजा आला की
मजा आली
गाली दिली की
शिवी दिली
मी दवा घेतली की
मी औषध घेतले
मी म्हणल की
मी म्हंटल
का हून करून राहिलास की
हे काय केलेस
पुस्तक भेटले
पुस्तक मिळाले-- सापडले
भाषा भाषांभाषा !!
शहर बदलले तशी
भाषा बदलली!भाषा भाषांभाषा !!
एक महाराष्ट्र. एक मराठी भाषा..
भाषेच्या १२ बोली तऱ्हा, आदिवासी
भटक्या, विमुक्त जाती बोली
धरून ३८ तऱ्हा.
सर्व बोलीनां वान्ग्मयात तेवढेच
प्राधान्य म्हणूनच 'झुलवा' कादंबरीकार
उत्तम बंडू तुपे सारखे आपल्या मनातील
विचार आपल्या बोलीत
समाजा
सामोरे आणू शकतात व
मराठी भाषेस बळकट करतात.
कवी माधवजुलिअन
यांच्या कवितेतील ह्या पंक्ती
भाषेचे किती सुन्दर वर्णन करतात,
मराठी असे आमुची मायबोली
जरी भिन्नधर्मानुयायी असूं
पुरी बांणली बंधुता अंतरंगीं,
हिच्या एक ताटांत आम्ही बसूं
हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडूं
वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरीं
जगन्मान्यता हीस अर्पूं प्रतापें
हिला बैसवूं वैभवाच्या शिरीं ॥
आपल्या भाषेचा आदर करणे
म्हणजेच आईचे रक्षण करणे.
जय मायबोली ||
.
Tuesday, December 11, 2018
सत्य
आपले कोणी ऐकेनासे झाले
की समजावे सुरु झाली
नांदी उतारवयाची
आता no more अपेक्षा फ्रॉम एनी वन
आपल्या हाकेस आता कान नाही
बहिरे आपण नाही
ह्याची हि पावती
आता आपला
पेशन्स हाच खेळ
घालवायला वेळ,
आता स्वगत बोलायचे
आता आपला
पेशन्स हाच खेळ
घालवायला वेळ,
आता स्वगत बोलायचे
स्वगत ऐकायचे,
डोकाविले कोणी तर
स्मित हास्य तयार ठेवायचे,
जमल्यास सर्व ठीक असल्याची
खात्री, हात उंचावून द्यायची
आता राहिला एकच उपायडोकाविले कोणी तर
स्मित हास्य तयार ठेवायचे,
जमल्यास सर्व ठीक असल्याची
खात्री, हात उंचावून द्यायची
कोणता?
जो स्वये कष्टतची गेला
तोची भला रे भला,
हा मार्ग एक आपुला!
Saturday, December 1, 2018
जन्मदिवस
माझा वाढदिवस
जगाच्या दृष्टीतून.
पण मनात एक विचार डोकावला
या वयात कसे काय हो वाढदिवस ?
ह्या पुढे रोज उगवलेला दिवस
हा वाढदिवस न म्हणता
काढ(ला) आणखी एक दिवस
मी आज पासून ठरविले
या पुढील येणारे (आले तर)
वाढ दिवस, मी काढले हो
यंदा साजरा केला मी माझा जन्म दिवस
कसा?
जसा आलो तसा,
म्हणजे?
केले डोके खाली
केले पाय वर,
बायको ला म्हंटले
मार एक चापट ढुंगणावर’
चापट बसली तसा रडण्याचा सूर काढला
मग जसे केले पाय खाली तसे झाले
डोके वर
मनाशी हसत म्हणालो झाला
माझा जन्म दिवस साजरा,
कोणी केला होता का कधी साजरा
असा आपला जन्म दिवस?
Subscribe to:
Posts (Atom)
चाफा आणि सोनटक्क्याचेअबोल प्रेम
मी पाहिलंय ते अबोल प्रेम, ते देखील दुतर्फी, विचार करा १ नाही तर ५ वर्षे त्याचे रोज तिच्या बाकावर नियमितपणे ती यावयाच्या पूर्वीच हळुवा...
-
एकाच वेळीस मनात भिर भिरणार्या विचारांची वावटळ, १) जो आला तो आपला जो गेला तोही आपला आलेला ही चांगला गेला तो ही चांगला दृष्टीकोन मात्र अ...
-
मी पाहिलेला अनभिषिक्त राजा जे जे मध्ये १९६२ मध्ये प्रवेश करून २/३ महिने गेल्यावर वर्गातील सर्व मुलांची एकमेका सोबत ओळख झाली होती. माझी क...
-
आला, आला आला वारा! सोसाट्याचा वारा !! ताड नाही पडला माड नाही पडला नारळ नाही हल्ला...अरेरे छत्रपतींचा 35 फुटांचा पुतळा मात्र पाडून ग...