संपले! संपले! २०१८ साल
संपले!३६५ दिवस भुर्रर करून उडाले.
बघता बघता आयुष्याची साडे सात
दशके पार केली. कशी?
ही अशी,
दशक पहिले.घरातल्यांशी ओळख होण्यात, ही
आई, हे वडील,हे भाऊ, ह्या बहिणी,हे आपले घर वगैरे वगैरे समजण्यात
संपले अर्धे दशक. पुढची ५ वर्षे गेली शाळेशी
ओळख होण्यात,अनेक विषय डोक्यातील कप्प्यात साठविण्यात.प्राथमिक, माध्यमिक करीत,केलाप्रवेश
२ऱ्या दशकात,जाणीव झाली भावंडा बाहेरही मित्र असू शकतात. गद्य, पद्य
ह्यातील फरक, बालकवी, विंदा, अनिल,बा.भ. पु.ल.ह्यांची दर्शनाशिवाय ओळख करून, गणित
व बीजगणितातील फरक समजून घेण्यात केव्हा शाळा संपली व कधी मिसुरड घेऊन विद्यालयाची
पायरी चढलो, ह्या पायऱ्यावर ओळख झाली सिनेतारका, नटांशी राज कपूर, देव आनद पासून ग्रेगरी
पेक,क्लिंट इस्टवूड आणि नर्गिस मीना कुमारी ते एलेझाबेथ टेलर, गोल्डी हॉर्न ह्यांच्याशी
मैत्री होते ना होते, तो लगेच नोकरीच्या घाण्याला
जुम्पंलो, सकाळी ९ ते...? करीत, ध्येयाची शिडी चढत,
तिसऱ्या दशकात प्रवेश केला,
मला वेळ नाही बघून
वरच्यानेच दया येऊन लग्न जुळवले, अंजलीच्या प्रवेशाने माझा अरुणोदय खऱ्याअर्थाने
झाला. प्रसिद्धी, पैसा, सन्मान आणि दोन गुणी मुले असा दुग्घ्दशर्कराचा योग पूर्ण
केला तिसऱ्या दशकाने.
४थ्या दशकाच्या सुरुवातीस स्वतःचे संस्थान प्रस्थापित
केले,देशभर नावारूपास आणले व
५व्या दशकात पाय ठेवला शुभ अशुभ, उद्योगातील
चढ उतार व आपलेच संस्थान सोडण्याचे प्रसंग ह्या दशकात पहिले.
६व्या दशकात
पुन्हा गमभन गिरवित नवीन संस्थान उभे केले, पूर्वार्धात उत्तम बस्थान बसविले,
उत्तरार्धातमात्र उतारावर उभे असल्याची जाणीव झाली,कामात ओहोटीची सुरुवात झाली,व
७व्या
दशकाची नांदी झाली,
स्वतःच्या पाठीवर स्वतःच्या
कर्तबगारीबद्दल थाप मारून शाब्बासकी दिली व ठरवले, बस्स! बहुत हो गया!
जा अरुण
जा जिले अपनी जिंदगी अपने ख़ुशी से! असे म्हणत
सातव्या दशकात
दुकान बंद केले. रोज एक रेखाटन,व मनात घोळणाऱ्या वेड्या विचारांना ब्लॉग
द्वारे वाट दिली,बघता बघता त्यात ४ वर्षे ६महिने गेले,त्याबरोबर २०१८ देखील सरले. (हो अजून एक दिवस बाकी आहे).
तो हि सरेल. साडे सात दशके नजरे
समोरून ७ दिवसा सारखी सरकली.
ह्या सात दशकांच्या वाटेत . आनंद, दुखः सहन करण्याची ईश्वराने हिम्मत दिली,
त्याच्या आशीर्वादाने हा सात दशकांचा प्रवास शक्य झाला. त्यला माझा साष्टांग दंडवत.
अशी हि सात दशकाची संक्षिप्त कहाणी सफळ संपूर्ण.
ह्या सात दशकांच्या वाटेत . आनंद, दुखः सहन करण्याची ईश्वराने हिम्मत दिली,
त्याच्या आशीर्वादाने हा सात दशकांचा प्रवास शक्य झाला. त्यला माझा साष्टांग दंडवत.
अशी हि सात दशकाची संक्षिप्त कहाणी सफळ संपूर्ण.
CHEERS!!!
HAPPY & HEALTHY 2019!!
No comments:
Post a Comment