Saturday, November 2, 2019

तुझ्या गळा ...


नुकतेच मतदानाची धांदल संपली व बालहट्ट सुरु झाले,
“मला मुख्यमंत्र्याची खुर्ची पाहिजे”,
“मी ती खुर्ची अडवली आहे, 
तुला नाही मिळणार” वाद  सुरु  झाले
त्यावरून सुचलेले हे विडम्बन.    

नु
तुझ्या गळा, माझ्या गळा 
गुंफू तीर कमळांच्या माळा
 माझी खुर्ची,तुझी खच्ची,
अमितभाई, तर मग खुर्ची कोणाला?
चल रे पोत्त्या, चहाटळा,
खूळ  लागले त्या बाळाला!
आणखी पदे कोणाला?
मला कशाचेकमळाला!    
ज पगडीतु चिरडी!
आणखी फेटे कोणाला?
नाव सांगू का बाबांना?
सांग मर्दमराठ्या स्वारीला!
मुसू मुसू, गालि रडू
वरवर अपुले हसू हसू
चल निघ, येथे नको बसू  
अता कट्टी फू कमळाशी
तर मग गट्टी कोणाशी?  
गंमत अमितभाईची खाशी!


1 comment:

चाफा आणि सोनटक्क्याचेअबोल प्रेम

 मी पाहिलंय ते अबोल प्रेम,    ते देखील दुतर्फी, विचार करा १ नाही तर ५ वर्षे  त्याचे रोज तिच्या बाकावर  नियमितपणे ती यावयाच्या पूर्वीच  हळुवा...