Tuesday, November 19, 2019

तीन पायाची खुर्ची

एक महिना उलटूनी गेला,
खुर्ची बापुडी रिकामी
डरकाळ्या मारून थकला वाघोबा 
सोडून  कमळाची साथ,
पकडला घड्याळाने काट्यात,
काटे काही हलेनात पंजा शिवाय   
होती वाघाला घाई खुर्चीवर बसावयाची
डरकाळी शांत लुप्त झाली, पाहतोय वाट
कधी सरकविल पंजा, कधी सरकविल घड्याळाचे काटे?  
कधी सुरु होईल त्री मूर्तींची भेट ?
डरकाळ्याना आवरून, समजावीत मनाला,
केवळ होईल शक्य, आता श्रद्धा सबुरीने,
म्हणे मनाशी वाघोबा, नाही मुकावयाचे 
मज  त्या खुर्चीला,
पिताश्रीना दिलेल्या त्या वचनाला?
वाघ, पंजा, घड्याळ करतील कधी समझौता?
अन्नदाता आपुला बळीराजा करीत आहे याचना
बहिऱ्या राज्यकर्त्यांच्या येईल कां पाणी लोचना
वैतागून पाहत बसले सारे मतदाता,
मनाशी करुनी विचार मात्र पक्का
स्वार्थासाठी  सारे अराजक हे माजले 
५ वर्षाने कशासाठी का कोणावर मारावा शिक्का!!





No comments:

Post a Comment

चाफा आणि सोनटक्क्याचेअबोल प्रेम

 मी पाहिलंय ते अबोल प्रेम,    ते देखील दुतर्फी, विचार करा १ नाही तर ५ वर्षे  त्याचे रोज तिच्या बाकावर  नियमितपणे ती यावयाच्या पूर्वीच  हळुवा...