Saturday, November 30, 2019

सत्य मेव जयते.






सत्य मेव जयते.

गेला संपूर्ण अश्वीन–कार्तिक  मास
वाघोबाना सत्याचा ध्यास
भरलेल्या कमळतळ्या काठी,
डरकाळ्या फोडून घसा सुकवला
पण बुडी काही मारली नाही.
तळ्याकाठी भेटले पंजा आणि घड्याळ,
पाहून सुका घसा वाघोबाचा, म्हणाले
धर हात आमचा, उपटूया या कमळाना,
एकत्र येऊन, बुडी मारून होऊया सुचीर्भूत,
करून घे घसा पण तुझा ओला
अचानक भेटीने विचारात वाघोबा बुडाला ,
बघता बघता मार्गशीष उजाडला.
हो हो नाही नाही करत हात मिळवणी
ठरवले तिघांनी संगंनमत
करूया उच्चाटन ह्या कमळाचे
घ्यावा ताबा ह्या सरोवराचा    
केली हात पकडून साखळी
न जुमानता कमळाची आरोळी
मारली उडी एकत्र  उपटीत कमळे बाजू!
वाघोबा मात्र आता खुश झाला
मनाशी म्हणाला दगाबाज
मित्रा पेक्षा शत्रू बरा.
संगनमताने तिघानि आखिले
महाराष्ट्राचे भवितव्य
देऊनी प्राधान्य,
गांजलेल्या बळीराजाला कर्जमुक्त करोनी,
जनतेची सेवा, हे एकच ध्येय
समोर ठेवोनी करूया संपन्न
स्वप्न गरिबांचे. दिवस योग्य पाहोनी 
जमविले आप आपले सवंगडी
शिव तीर्थावर शपथ विधीचा सोहोळा,
घेतली सुराज्याची, सुबत्तेची शपथ,
जन सागराच्या साक्षीने.
पार पडिला सोहळा
फेडूनी पारणे डोळ्याची
दूमदूमले अवघे शिवतीर्थ
आई वडिलांच्या आशीर्वादाने
महाराजांच्या नाम जल्लोषाने

No comments:

Post a Comment

चाफा आणि सोनटक्क्याचेअबोल प्रेम

 मी पाहिलंय ते अबोल प्रेम,    ते देखील दुतर्फी, विचार करा १ नाही तर ५ वर्षे  त्याचे रोज तिच्या बाकावर  नियमितपणे ती यावयाच्या पूर्वीच  हळुवा...