Tuesday, October 31, 2023

ह्याला जीवन ऐसे नाव...

 गेल्या पंधरवड्यात कॉलेज मधील वर्गातीलएक मित्र व एक मैत्रीण गेल्याचे फोन वर

कळले. मेंदू सररर करून वर्गात जाऊन बसला, 
सर्व वर्गात नजर फिरली व गेलेल्या 
मित्राच्या जागेवर खिळली,. अर्थात त्याच्याबरोबर 
घालविल्या दिवसांची आठवणही उजळली. 
बातमी आलेली मैत्रीण खूप हुशार होती.
ह्या बातम्या आता अंगवळणी होत होत्या,

ह्या वरून मनात एक वावटळ  उठले.
वेग वेगळ्या वयात येणाऱ्या बातम्यांचे महत्व, 
स्वरूप त्याच वयात कळण्या सारखे असते

वय वर्षे ५/६ 
झाली कि अवती भवतीच्या
ह्या वयात आपल्याला वाढ दिवसाच्या बातम्या 
कानावर येतात आज बबनचां
वाढदिवस उद्या चिंगीचा... आनंदि आनंद 

वय वर्षे १० ते १५...
आर्या पहिली आली, विनोद ला ९०%
आशीर्वादला विज्ञान शाखेत प्रवेश मिळाला,
मालिनी चे अरंगेत्रम शुक्रवारी... 

वय वर्षे १६ ते २०...

देव आनंदचा ‘काला बाझार,’ मेकांनाज गोल्ड 
कसला तुफान, हिच्कोक भन्नाट डिरेक्टर,
नौशादने कसले म्युझिक दिलय यार...
अशोक इन्जिनिअरिन्गला गेला...
अनिल मेडिकलला जायचे म्हणतोय...

वय वर्षे २२ ते २५...

शिला, राम जेठमलानी बरोबर काम करते,
निर्मला मास्टर्स करायला यु एसला
गेली, वाडकरांचा सुरेष शिक्षण सोडून
गातो म्हणे,गणेशचे लग्न ठरलय,
रघु आणि मैना पळून गेले...

वय वर्षे २५ ते ३०...
सन्नी, मोहन,गंगा... जवळजवळ
सर्वांची लग्न झाली, आशुतोष नेहमीच
सर्वापुढे त्याला दोन लेकरे आहेत आणि
बंगळूर मध्ये स्थायिक देखील झाला...

 वय वर्षे ३५ ते ४५,,,
 
किशनचा वरूण लार्सेन मध्ये लागला,
जामसंडेकर अमेरिकेत सेटल झाला,
परवा गौरीच्या मुलीचे लग्न खांडेकरच्या
मुलाशी ठरले, राघव च्या पार्टीत कसली 
धमाल केली, जुन्या आठवणी गप्पाना उत
आला पहाटेचे ३ वाजले... बापटची आई वारली, 
सारंग चे वडील १५ दिवसापूर्वी गेले...

वय वर्षे ५० ते ६०...
 
साठेला प्यारेलेसीस झाला उजवी बाजू
कामातून गेली, काशीला डायाबेटीसने
फुल ग्रासलेय, हरीश आता मोदीचा
टेक्निकल सल्लागार झालाय वट वाढली 
लेकाचे करून करून भागले आणि...
वृंदा, भारत भारतात परतले 
पुण्यात सेटलझाले,शामच्या 
मुलाने आई बापाला केसरी 
मधून जग फिरवले


वय वर्षे ६५ ते ७५...

मधुकर गेला...हरीचे पण खरे नाही
शालिनी शिव गेल्या पासून एकटी पडली
घनश्याम वृद्धाश्रमात राहायला गेला,
मंदाकिनी मंदारचा आजार काढून थकलीय...

आपले काय?
आतापर्यंत तरी आल वेल...! 

अशा ह्या वयोपरत्वे बातम्या माझ्या
कानावर पडत गेल्या व त्यांचे ह्या 
वावटळीत शब्दांकन करावेसे वाटले.

ह्याला जीवन ऐसे नाव...



Monday, October 23, 2023

|| दसरा ||

 



सायंकाळी सोने लुटुनी मोरू परतुनि आला ।|
बहीण काशी ओवाळी मग त्याला ।| 
||दसरा सण मोठा,  नाही आनंदा तोटा||

माझ्या दसऱ्याच्या काही आठवणी.   


आमचे अण्णा आम्हाला दसऱ्यास सकाळी उठवताना " सकाळ झाली मोरू चा बाप मोरूस म्हणाला, आज दसरा,मोरू उठ. ,
 

त्या काळात आमच्या कडे आचार्य अत्रेंचा " मराठा" वर्तमान पत्र येत असे.  मंत्री मोरारजी देसाई यांच्यावर लिहिलेल्या 
आपल्या टीकेनी भरलेल्या दसऱ्याच्या अग्रलेखास अत्रेंनी सुरवात सकाळ झाली मोरू चा बाप मोरूस म्हणाला, आज दसरा,मोरू उठ. ह्या वाक्याने केली होती ही आठवण.
दसऱ्यास झेंडू व आंब्याच्या पानांचे तोरण अण्णा स्वतः दरवाज्यास बांधीत. आजही  माझ्या दरवाजात तोरण बांधताना डोळ्यासमोरून ही आठवण सरकते. दसऱ्याचे महत्व पांडवानी शमीच्या झाडावरील लपविलेली शस्त्रे उतरवली होती, त्यामुळे दसऱ्यास शमीची पाने एकमेका सोने म्हणून देण्याची प्रथा पडली असे आईने गोष्टीत सांगितल्याची आठवण.
ह्या दिवशी होणाऱ्या जेवणाची आठवण. वरण भात,वालाची उसळ,काकडीची कोशिंबीर, हिरवी कैरीची चटणी, पापड, आणि जेवणातील महत्वाचा व माझ्या आवडीचे श्रीखंड, किवां मसाला दूध  आजही मैना भुलुंगा.
आमच्याकडे तसे येणारे नातेवाईक फार कमी त्यामुळे सोने आम्ही भावन्डे आप आपसात वाटत असू,पुढे जे जे  त गेल्यावर मित्रपरिवारात वाटण्यास सुरवात झाली, आमचे एक सर मात्र सोन्या ऐवजी ग्रीटिंग कार्ड्स करायचे व आपल्या लाडक्या विद्यर्थ्यांना पाठवीतही आठवण. आमच्या दादाचे लग्न दसऱ्याचे ही  एक आठवण,  दसरा आला कि गेली काही वर्षे मोबाइल वरून सतत टिंग करत कोणी ना कोणीतरी शुभेच्छा पाठवीत  रहातात त्यांना वयोपरत्वे विसरू नये म्हणून लगेच आपल्या बाजूने रिटर्न सदिच्छा न विसरता न दुखवता पाठवण्याची आणखी एक आठवण, जी विसरून चालत नाही, मोबाइलच्या जन्मापासून सर्वाना हायसे वाटले असावे घर बसल्या सर्वाना सदिच्छा पाठवणे सोपे झालेय. ते देखील न भेटता. तेव्ढ्यावरून होणाऱ्या गैर समंजस टाळण्याची आठवण.
थोडक्यात माझ्याचसाठी दसरा ह्यावयात समरणशक्ती टेस्ट. आठवणी म्हणजे दसरा हे समीकरण माझ्या साठी.थोडक्यात माझ्याचसाठी दसरा ह्यावयात समरणशक्ती टेस्ट.   
    

* दसरा शब्दाची एक व्युत्पत्ती दशहरा अशीही आहे. दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरल्या आहेत. दसर्‍याच्या आधीच्या नऊ दिवसांत म्हणजेच नवरात्रात देवीच्या शक्ती रुपांनी दाही दिशांवर विजय मिळवला, असे सांगितले जाते. विजयाच्या संदर्भात या दिवसाला दशहरा, दसरा आणि विजयादशमी अशी नावे आहेत. श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला, तोही याच दिवशी. या अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला विजयादशमी असे म्हटले जाते. पांडवांनी अज्ञातवास संपताच शक्तीपूजन करून शमीच्या वृक्षावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या गायी पळवणार्‍या कौरव सैन्यावर स्वारी करून विजय मिळवला, तोही याच दिवशी. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितापूजन आणि शस्त्रपूजा ही चार कृत्ये करायची असतात.





चातुर्मासातील एक महत्त्वाचा सण म्हणजे दसरा. साडेतीन मुहुर्तांपैकी दसरा एक मानला जातो.चातुर्मासातअश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत नवरात्र साजरे केल्यानंतर दहाव्या दिवशी म्हणजेच दशमीला दसरा साजरा केला जातो. या सणाला धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते. त्याचे प्रतीक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पाने, पाटी-पुस्तके अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रास्त्रांचे पूजन करण्यात येते. धनसंपदा (महालक्ष्मी), शक्ती (महाकाली), ज्ञानसंपदा (महासरस्वती) या तीन शक्ती देवतांचे स्मरण दसऱ्याला केले जाते. नवरात्रौत्सवात बसविलेल्या देवी मूर्ती आणि घटांची मिरवणूक काढून विसर्जन केले जाते. दसऱ्याला सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडाची पाने देण्याची प्रथा आजही टिकून असल्याचे दिसून येते

*
वरील माहिती गुगल च्या साहाय्याने घेतली आहे.

Saturday, October 21, 2023

महाअष्टमी



महाअष्टमी

आमच्या आई वडिलांनी आम्हा मुलांना कुठल्याही प्रकारे धर्म ह्यावर कधी भाषण दिले नाही किवां आपण हिंदू ते मुसलमान , ते ख्रिस्ती, ते पारशीअसा भेद भाव करणे हि शिकवले नाही त्यात हिंदूंचे जाती विभाजन देखील शिकवले नाही.घरात एक अण्णांचे कपाट होते त्यात वरच्या खणात रामाचे चांदीचे सिंहासन होते त्यात अण्णांचे राम पंचायतन चे एक नाणे होते ज्याची अण्णा आंघोळीनंतर  पूजा करीत आम्हाला कधीही सांगितले नाही कि तुम्ही रोज हात जोडलेच पाहिजेत वगैरे त्यानी शिकविलेला श्री राम, श्रीकृष्ण, व इतर दोन श्लोक मात्र नित्य नेमाने झोपण्यापूर्वी कपाटा  समोर उभे राहून म्हणावयास शिकविले होते तोच आमचा देवाशी कॉन्टॅक्ट,बाकी मार्केट मध्ये जाताना मारुतीचे एक देऊळ, व रस्त्यात झाडाला टांगलेले साई बाबा ह्याना लांबूनच नमस्कार करणे. तो देखील देखल्या देवा ... एक हात छातीस लावून. 

थोडक्यात सांगायचे तर आम्हा मुलांना फारशी सणावारांशी ओळख नव्हती.( म्हणजे सणाचे महत्व किवां का साजरे करतात, इतिहास वगैरे ) काही सण आई गोड पदार्थ करायची म्हणून कळायचे. होळीला पूरण पोळी, संक्रातीला तिळाचे लाडू, दसऱ्याला मसाले दूध, दिवाळीला फराळ वगैरे. 

अरे हो आमच्या घरी एक पुस्तक होते ते घरात कुणी कुणी वाचले होते कोणास ठाऊक.मी तर नाहीच नाही,पुस्तकाचे नाव होते हिंदू सण व व्रते, माझ्या लक्षात फक्त त्याचे कव्हर आहे. पिवळ्या रंगाच्या बॅकग्राऊंड वर एक वडाचे झाड व त्या भोवती फिरणाऱ्या बायका, आईनेच हे आणले असावे तिला वाचनाची खूप आवड. 

असो विषय थोडा लांबला.

माझे लग्न ठाकरे कुटुंबात झाले व माझी खऱ्या अर्थाने देवांशी ओळख झाली. मला सर्व सण व्रते यांची माहिती महती समजली. त्यातील नवरात्री एक महत्वाचा भाग. त्यांच्या कडे म्हणजे सासरी पहिल्या रात्री पासून सणाला सुरवात व्हायची म्हणजेच घट बसायचे,रोज माहेरी जाणे शक्य नसल्याने अंजली आता घरात तिच्या परीने देवीची पूजा, पोथी वाचन ९  दिवस करते, त्याबरोबर देवाचा प्रसाद रोज केला जातो. अष्टमीला मात्र आम्ही माहेरी, सासरी, गेली ४६ वर्षे जातोय.ह्या दिवसाचे महत्व मी अलीकडे गुगल करून माहिती केले. अंजलीच्या माहेरी अष्टमीला घरी देविचा  प्रसाद म्हणजे मटण, कलेजी. कोलंबी, मासे, गोडाचे पदार्थ ( ह्यातील अर्धा मासाहारी प्रसाद अंजली करते )ह्याने पूर्ण , तुडुंब, भरलेली परात येळकोट येळकोट जय मल्हार चा गजर करत,सर्वानी त्यास हाताने स्पर्श करावयचा असतो त्यानंतर सर्वांचा ९ दिवसाचा उपवास सुटतो. हे माझयासाठी लग्नानंतर नवीनच होते, आता हि प्रथा बऱ्याच घरातून असते हे समजले. 


अष्टमी तिथीचे विशेष महत्त्व आहे, ज्याला 
महाअष्टमी (Mahaashtami) असेही म्हणतात. या दिवशी माता दुर्गेचे आठवे रूप गौरीची पूजा केली जाते.  गौरीचे वाहन बैल आणि शस्त्र त्रिशूल आहे. नवरात्रीत महाअष्टमीला इतके महत्त्व का आहे? पौराणिक कथांनुसार असे मानले जाते की महाअष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेने  चामुंडा या राक्षसांचा वध केला होता. त्यामुळे या तिथीला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, जो कोणी या दिवशी माता दुर्गेची खऱ्या मनाने पूजा करतो, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याला देवीचा विशेष आशीर्वाद मिळतो. या दिवशी देवीच्या शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे, त्यामुळे या दिवशी वीर अष्टमी असेही म्हटले जाते. ही तिथी अतिशय शुभ मानली जाते. या दिवशी निर्जल उपवास केल्यास मुलांचे दीर्घायुष्य वाढते. या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करताना  गौरीला लाल चुनरीही अर्पण केली जाते.


*वरील माहिती गुगल च्या साहाय्याने घेतली आहे.

Tuesday, October 10, 2023

'खचखोळ' {काही निवडक}-- 2


 

गेली ३/४ वर्षे लिहलेल्या ब्लॉग ची उजळणी करताना मला असे जाणवले की,बऱ्याच ब्लॉग मध्ये कांही कळत नकळ्त बरे विचार मांडले गेले आहेत म्हणून हे निवडक विचार पुन्हा एकदा मांडण्याचे धाडस. 



मन स्वछ असणे हे  काच स्वछ ठेवण्या सारखे.

मनाला स्थिर ठेवणे हे श्वास बंद करण्या येव्हढे कठीण.


रद्दी माणसांची व्याख्या काय? 

करायचीच  झाली तर "गरज सरो वैद्य मरो" हि व्याख्या.


कशा वेळ  फुकट घालवावा
संगीताच्या मैफिलीना
असता कानी स्मार्ट फोन! 
नाही हशा, नाही सम्भाषण 
विसरुनी भाषा मैत्रीची,
अवगतली मूक भाषा    
एकत्र आहोत आम्ही शरीराने!
करावयाची काय दुसरी भाषा
असता कानी स्मार्ट फोन! 

आणखी एक दिवस उजाडला 

हात लिहिताना नाही थरथरला!

हस्ताक्षर उगाचच हसू लागले.


सारे  कसे रम्य पण प्रसन्न,

पापण्यांत साठवून हे तारांगण,

शिरलो मी कुशीत गाढ निद्रेच्या.


नाही. त्याला देश
नाही वेश नाही,
रंग रूप तो ठरवेल तेच
आपली भेटीची वेळ स्वतः तो ठरवितो.
एका लाटेत शेकडो,हजारो, लाखो
 बासरीवाल्या सारखा तो 
एकाच वेळेस घेऊन जातो.






Tuesday, October 3, 2023

आठवणीं

 






पहात तुझ्या कडे एकाग्रतेने.

मनातील वादळ शमवावेसे  वाटते.

उगाच, असंबंधपणा, लिहिताना डोकावतो.

आपले  नाते काय? एक न सुटणारा गुंता होय, 

वर्षे सरली पण गुंता तसाच, 

कधीही न सुटणाऱ्या भूत काळातील गाठी,

तुझ्या टोका पासून 

माझ्या टोकापर्यंत 

न सुटणाऱ्या 

आठवणींच्या गाठी. 

एक गाठ सुटल्यावर, 

पुढील गाठ सुटेपर्यंत, 

आठवणींच्या वादळाचे गलबत 

हेलकावे खात राहते  

ना जात पुढे ना पाठी,

अचानक भोवऱ्यात सापडते. 


आठवणी त्या भोवऱ्यात गोल गोल 

फिरून विरून जातात.

बऱ्याच गाठी सुटत नाहीत,

सुटू नयेत हाच तर मनसुबा 


 

झाले बहू... शम्मी कपूर








झाले बहू... ही ब्लॉगमाला माझ्या १५ वया पासून २१ वया पर्यंत लागलेल्या व्यसनांतील मोजके बॉलीवूड हिरो, हेरॉईनस, म्युझिक डायरेक्टर, डायरेक्टर्स, ज्यांनी मला त्यांच्या विविध कलागुणाने आकर्षित केले व आनंद दिला त्यांना समर्पित,


याहू!... याहू!
बरोबर ओळखलंत, 
एकमेव शम्मी कपूर.
१९५८ मी ९ वित्त होतो,
सुपर सिनेमा 
मी माझे तीन सिनेमा वेडे मित्र.   
१२ आण्याचे तिकीट.   
स्क्रिन पासून ३ री लाईन. 
मान डोळे वरती.
इंडियन न्युज संपते  न संपते तो... 
सेन्सॉर सर्टिफिकेट,
सिनेमाचे नाव "उजाला" वाचून कर्कश शिट्या,
पिक्चर सुरु,  कानठळ्या बसण्या एव्हढ्या शिट्या,
रामू { शम्मी कपूर ), छबिली (माला सिन्हा) जानि व्हिलन कालू ( राज कुमार ) , 
रामूची ३ भावन्डे, हिंदी सिनेमात जिचे हसू कोणीही न पाहिलेली  सदा रडणारीआई,{लीला चिटणीस ) असा नेहमीचा संच 

रामू सज्जन, कालू च्या दोस्तीस बळी पडून  वाईट मार्गास लागतो,बहिणीस अपघात झाल्यावर सुधारण्याचा प्रयत्न करतो ,,,, वगैरे, वगैरे
आता रामू छबिली जोडीचे गाणे पडद्यावर येते आमच्या आजू बाजूचा पब्लिक वेडा होतो...

गाणे: "झूमता मोसम मस्त महिना",समोर शम्मी कपूर, माला सिन्हा

पब्लिक सीटवर उभे, केवळ विद्यार्थी म्हणून आम्ही स्वतःला आवरून बसून राहिलो..
काय सांगू तुम्हाला अहो शम्मी कपूर ने ह्या एका गाण्यावर लाखोंनी फॅन्स कमावले ते कायम राहिले त्यात अस्मादिक हि सामावले.
हे गाणे जरूर बघा बघा बघा.
सिनेमातील अविसमरणीय क्लायमॅक्स सिन, 
कालू आणि रामू मधील फाईट. 
दोघे एका हात गाडीच्या दोन बाजूस,
एक मेकास खो खो खेळातील हूल देत,
अचानक कालू हातगाडीवर उडी मारतो 
खिशातून सर्र्र्र करून चाकू काढतो,
रामूला उद्देशून जानी... आणि... 
कालूच्या बाजूचे प्रेक्षक, शिट्यानि 
थेटर दुमदुमून सोडतात,
राजकुमारला फॅन्स मिळतात, 
सिनेमा सुटल्यावर जानि...जानि ...
जयघोष

शम्मी कपूरचे सर्व सिनेमे.  मी पहिले.यादी खूपच मोठीआहे तरी पण नोंद केल्याशिवाय रहावत नाही.

१९५६ तुमसा नही देखा 
अहो ह्या सिनेमाची सुरवातच 
शम्मी च्या बूट हलवताना होते
आणि अमिताला पाहून गाणे 
युं तौ हमने लाख हंसी देक्खी है..
पब्लिक वेडा,मी...

१९५८ उजाला
याला याला दिल ले गइ...
१९५९ दिल देखे देखो.
दिल देखे देखो

१९६१ जंगली 
याहू याहू ... जरूर पहावे असे, त्याचे कुठलेही गाणे घ्या तुम्हाला आनंद  मिळताच पाहिजे.  

एक छोट्टासा किस्सा ( कौतुक नाही}साल १९८७/८८  
माझा मुलगा अपूर्व ८ वर्षाचा शाळेतून घरीआला कि पलंगावर बसून टॉम न जेरी वगैरे कार्टून व्हिडीओ पाहायचा त्यात घरातील 'जंगली' चा व्हिडीओ देखील लावायचा, त्याने जवळ जवळ ६५ वेळा ''जंगली' केवळ शम्मी कपूर साठी पाहिलाय. बर्याच वेळेस तो कॅसेट लावून बाहेर बसायचा पण आत कुठला सिन चाललाय ते डायलॉग सहित सांगायचा विचारले कि सांगायचा याहू गाणे बघायला मजा येते. असे हे गाणे,

यादी 
१९६२ प्रोफेसर 
१९६३ चायना टाऊन 
१९६३ ब्लफ मास्टर, राज कुमार,काश्मीर कि कली, जानवर, तिसरी मंझिल ,इव्हिनिंग इन पॅरिस, ब्रम्हचारी, प्रिन्स,अंदाज लिस्ट न संपणारी     

गोविंदा आला रे आला ...

गेली साठ वर्षे प्रत्येक दहीकाल्या च्या दिवशी वाजलेच पाहिजे ह्या गाण्याचा विडिओ पहा अहो शम्मी चा नाच बघा.
त्याच्या नंतर अनेक हिरोनी ह्या गाण्यावर नाच केले पण नाही नाही कोणीही जवळ नाही पोचले, पोहचणेअशक्य,अशक्य.
शम्मी कपूरचा कुठलेही गाणे घ्या त्यातील नाच पहा कुठंही लैंगिक हातवारे दिसणार नाहीत उलट त्यात तो रमलेला 
उत्तम डान्सर पहायला मिळतो त्याची  देहबोली आपणास आपलेसे करते व त्यामुळेच त्याचे फॅन खुश होतात.म्हणूनच तो या सम... 

यू ट्यूब वर हे गाणे पहा.
हिंदी स्क्रीन वरील एकमेव ६ फूट  देह, 
त्याची अदाकारी नाच अनेकांनी प्रयत्न करून ही जमले  नाही म्हणूनच तो या सम... 

निळसर हिरवे डोळे,चेहऱ्याला साजेसे केस, देह, केवळ हिरो होण्यासाठीच ईश्वराने जन्मास घातलेला, तो दुसरा कुठल्याही व्यवसायात शोभालाही नसता. म्हणूनच तो या सम...

आज पावेतो बॉलीवूडमध्ये पैदा नही हुआ ना होगा.म्हणूनच तो या सम...

आपल्या खात्री करीता यु ट्युब वर  शम्मी कपूर ची गाणी पहा व त्याच्या  अदाकारीने तुम्ही नकळत फॅन व्हाल. आजच्या एका हीरो चे नाव घ्या कि जो शम्मी कपूर सामोरे उजवा दिसेल /ठरेल.
म्हणूनच तो या सम...

त्याच्या अदाकारीमुळेच शम्मी कपूर अमर राहील, 
म्हणूनच तो या सम...

 




      


चाफा आणि सोनटक्क्याचेअबोल प्रेम

 मी पाहिलंय ते अबोल प्रेम,    ते देखील दुतर्फी, विचार करा १ नाही तर ५ वर्षे  त्याचे रोज तिच्या बाकावर  नियमितपणे ती यावयाच्या पूर्वीच  हळुवा...