Monday, July 13, 2026

"वेलकम बॅक!"




 

"वेलकम बॅक!"


"वेलकम बॅक!"

रडता रडता...

डॉक्टरांचे शब्द कानावर पडले.

माझंच स्वागत होत होतं.

क्षणभर प्रश्न पडला...

यांना कसं काय माहीत की मी पुन्हा आलोय?

मूर्ख मेंदूने जागेचं भान ठेवलं नाही आणि लगेच भोकाड पसरलं.

जागा अशी होती की माझा श्वास नुकताच सुरू झाला,

किंवा कदाचित...

पुन्हा सुरू झाला असावा.

म्हणूनच बहुतेक "वेलकम बॅक" म्हटलं असावं.

अजून अंगावर आईची ऊब होती.

पण मेंदू स्वस्थ बसणाऱ्यांतला नव्हता.

त्याने लगेच प्रश्न विचारला —

"आपण या आधी कधी इथे आलो होतो का?"

मी आठवायचा प्रयत्न केला.

पण काहीच आठवेना.

मग वाटलं...

जाऊ दे.

कशाला द्यायचा त्रास?

या थंडीत चांगली ऊब मिळाली होती.

मायेची कूसच ती होती.

आणि पहिली भेट जर "वेलकम बॅक!" 

या वाक्याने होणार असेल...

तर होऊ दे.

आता...

थोडावेळ रडूया.

मग शांत झोपूया.


अरुण काळे
जुलै २०२६

No comments:

Post a Comment

खुर्ची

  खुर्ची ऑफिसमध्ये एकदा एकटाच बसलो होतो. समोर माझी खुर्ची होती. रोजचीच. अनेक वर्षे वापरलेली. त्या दिवशी मात्र पहिल्यांदाच तिच्याकडे नीट...