Wednesday, July 15, 2026

"सी यू सून!"

 

"सी यू सून!"

"सी यू सून!"

शब्द कानावर पडले.

क्षणभर वाटलं...

 कोणाला म्हणाले?

आजूबाजूला पाहिलं.

मित्रमंडळी जमली होती.

शांतपणे उभी होती.

मग लक्षात आलं...

माझ्याचसाठी होतं.

हे सारे मी चाललोय समजल्यावर निरोप घ्यायला आली असावीत.

प्रश्न पडला...

यांना का वाटतंय की मी पुन्हा भेटणार नाही?

मूर्ख मेंदूने जागेचं भान ठेवलं नाही.

तो अजूनही काम करत होता.

जागा अशी होती की आता त्याने शांत व्हायला हवं होतं.

अंगाला ऊब जाणवत होती.

पण मेंदू स्वस्थ बसणाऱ्यांतला नव्हता.

त्याने लगेच प्रश्न विचारला,

"आपण या आधीही कधी असं गेलो होतो का?"

मी आठवायचा प्रयत्न केला.

पण काहीच आठवेना.

मग वाटलं...

जाऊ दे.

कशाला जाता जाता...मेंदूला द्यावा त्रास?

जर निरोपच "सी यू सून!" या वाक्याने होणार असेल...                        

त्यांना उभं राहण्याची गरज नाही.

आता... मला जागं राहणं शक्य नाही.

मला थोडं शांत झोपू दिलं तर बरं होईल.

"सी यू सून!" 


अरुण काळे
जुलै २०२६

No comments:

Post a Comment

खुर्ची

  खुर्ची ऑफिसमध्ये एकदा एकटाच बसलो होतो. समोर माझी खुर्ची होती. रोजचीच. अनेक वर्षे वापरलेली. त्या दिवशी मात्र पहिल्यांदाच तिच्याकडे नीट...