Monday, June 3, 2019

पेहचान कौन


काल रात्री,नेहमीच्या वेळेस,  
डोळे मिटून बिछान्यात येऊन पडलो,
बराच वेळ झाला, कां कुणास ठाऊक
झोप काही केल्या डोळ्यातून मेंदूत शिरत नव्हती,
चाचपडत सेल फोन शोधला  फोनवर
श्रेया घोशालला अंगाई  गीत गाण्यास बोलाविले
ती गाऊन दमली आणि गेली




झोपेचे झालेले खोबरे तसेच,  
मग जुन्या मित्राला महमदला गा सांगितले
तोही चांगला तासभर  गायला असावा,दमला,
पण मेंदूचे घुबड काही झोपेना,
सेल फोनला विश्रांती दिली  
एव्हाना पहाटेचे ३ वाजून गेले
आकडे मोजून झाले, मेंढ्या मोजल्या,
मग पंतप्रधान मोदींचे नवे मंत्री मंडळही
नव्याने निवडले त्यांचा शपथ विधीही 
पार पाडला झोपेच्या आशेने,आता मनाचा टी वी बंद केला,
तरीही झोप येईना मग स्वतःच
“ निंबोणीच्या ...”गुण गुणलो तरीही...
जागते रहो... कानात घुमतच होते
किल किल्या डोळ्याने घड्याळ पहिले चार वाजले
ध्यानाची उत्तम वेळ म्हणून उठून बसलो
पण ध्यानासाठी तनमन तयार होईनात
मग तसाच डोळे घट्ट मिटून झोप येईल 
ह्या आशेने बसून राहीलो, एव्हढ्यात...
शांततेत रात्रपाळीच्या पाहरेकऱ्याच्या
फोनवरून गाण्याचे बोंल कानावर पडले
मी कुत्र्यासारखे कान टवकारले कानोसा घेत
गाण्याचे सुमधुर आवाजातील बोल ऐकू लागलो  
स्मित हास्य करीत बसल्या स्थितीतून हळू हळू खाली सरकत गेलो
डोके उशीवर कधी घरंगळले...
...जाग आली तेव्हां आता वाजले की बारा परिस्थिती !!
एवढ्या सुमधुर आवाजाची किमया/जादू/
जगाच्या पाठीवर कोठेही असणे अशक्य
 ते जादूचे गाणे...
धीरे से आजा री अंखियनमे
निन्दिया आजा री आजा, धीरे से आजा
छोटेसे नैन की बगीयन मे...
गायक? पहचान कौन.,.

Monday, May 13, 2019

‘मदर्स डे




पश्चिमेचे वारे आपल्या संस्कारात वाहू लागल्यापासून आपण भारतीय देखील मोठ्या आनदाने हे वेग वेगळे ‘दिवस’(डे)साजरे करू लागलो काल काय तर  फादर्सडे, उद्या फ्रेन्डशिप डे,परवा सिब्लीन्ग्स डे, येरवा टीचर्स डे, मग येणार नेबरस, त्यानंतर अनिमल्स, मग इस्टर सन डे,


‘मदर्स डे’
सकाळ सकाळीच मुलांचा फोन अमेरिकेहून
आपल्या  आईस ‘मदर्स डे’च्या शुभेछा देण्यास
खणखणला.
माझ्या आईच्या भाग्यात ह्या शुभेच्छां नव्हत्या.
पण तिची आठवण मात्र ह्या निमित्ताने
रोजच्या पेक्षा थोडी अधिक झाली व डोळ्यासमोरून
५७ वर्षाच्या तिच्या सहवासाचा चलचित्रपट
५७ सेकंदात सरकला,मनोमनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
तिची जेव्हां जेव्हां आठवण येते... न कळत ओठावर
प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधु आई...
ह्या माधव जुलियन यांच्या कवितेतील
हे कडवे प्रकर्षाने गुणगुणले जाते.

वाटे इथून जावे तुझ्यापुढे निजावे
नेत्री तुझ्या हसावे , चिती तुझ्या ठसावे
वक्षी तुझ्या परी हे केव्हां स्थिरेल डोके
देईल शांतवाया ह्त्स्पंद मंद झोके 
घे जन्म तू फिरुनी येईन मीही पोटी
खोटी ठरो न  देवा  हि एक आस मोठी

अर्थातच माझ्याप्रमाणे असंख्य,अगणित आई विना असतील 
ज्यांना आईची उणीव रोजच भासत असेल
रोजच मनोमनी 'मदर्स डे'च्या शुभेछा 
आपल्या आईस देत असतील.

भूतलावरील सर्व माताना माझा प्रेमपूर्वक नमस्कार.
happy mother's day. 



Tuesday, May 7, 2019

वावटळ५



अनेक वेळा डोक्यात विचार एकाच वेळेस कल्लोळ करतात व वावटळी सारखे डोक्यात फिरत राहतात त्यांचा एकमेकाशी कसलाही मेळ नसतो.अशीच एक वावटळ .    


 मरणांत खरोखर जग जगते
अधिं मरण अमरपण ये मग ते ॥
अनंत मरणे अधीं मरावी
स्वातंत्र्याची आस धरावी
मारिल मरणचि मरणा भावी
मग चिरंजीवपण ये मग ते ॥ १ ॥
ब्लॉगच्या आयचा घो !!
पूर्ण दिवस काय लिहावे ह्यातच गेला
नाराजीचा फुत्कार टाकीत पी सी बंद केला
उद्याचा दिवस कारणी लागेल ह्या आशेने,
नाहीतर... ब्लॉगच्या आयचा घो भाग दुसरा !!

मन कधीच कुणाचे बांधील नसते
त्याचा स्वैराचार झोपेतही चालू असतो 
का?

कधी?
केव्हां?
कोणी?
कुठे?
कुणाला?
कशाला?
उन्हात केस पिकवायला?
कशासाठी?
कुणासाठी?
तुझ्यासाठी?
माझ्यासाठी?
सर्वांसाठी?
कधीतरी,केव्हांतरी?
सांग पाहू?
असाला की मसाला
चार शिंगे कशाला?
सांग पाहू ?
अंग नाचे तंग नाचे
तंगाची दोरी नाचे
मी नाचे बाबू नाचे
बाबूची शेंडी नाचे.

इथे सुरु होण्या आधी संपते कहाणी साक्षीला केवळ 
उरते डोळ्यातील पाणी.


  



Sunday, May 5, 2019

६मे








सकाळ झाली,जाग आली,
पापण्यात उरलेली झोप घेऊन उठून बसलो,  
घरात मात्र सामसूम
सर्वांची जणू मध्यरात्र 
पक्ष्यांची किल बिल, हळुवार येणारी मंद झुळुक
चंद्रकोरीचे सूर्याआड होणारे अस्पष्ट दर्शन,
देऊळातील घंटानाद,चर्च मधील पियानो,
मशीदितील बांग, तांबडे फुटलेले आकाश,
अस्पष्ट ऐकू येणारा रेडीओ,
वाहनाची सुरु झालेली वर्दळ,ऐकली नाही  
तर उजाडणारा दिवस देखील
झोपलेला वाटतो ... 
सवयी प्रमाणे डोळ्यासमोर वार,तारीख आली 
आज सोमवार, ६मे २०१९, 
आज आई १०४ वर्षाची झाली.
माते, असशील तेथे,
तुझा वाढ दिवस सुखाचा जावो...
तुझे आशीर्वाद,
हीच आमची अनमोल ठेव.

Friday, April 19, 2019

नमो विरुद्ध रागा


निवडणुकीचे नारे ऐकू येऊ लागले चारी दिशांना
 घराण्याची गादी द्या राहुलला, मत द्या मोदीला, 
'राफेल' मोदीने  अंबानीला विकले,
'हेलीकॉपटर' वाध्रा सोबत  राहुलने  फिरवले.
पडला मोदी सर्वाना भारी,  राहुलपप्पूला कोणी ना विचारी
पप्पू धावला दाही दिशांना समदुखीःसवंगडी जमवाया.
हत्ती मायावती, तृणमूल बंगाली, अखिलेश समाजवादी
पूर्वेचे, दक्षिणेचे मित्र आले धावून ,
 कराया वध मोदीचा. सज्ज झाहला मर्द मराठा.
पाजी क्रिकेटरने गिरवले धडे सैराट उंदरासाठी,  
भांगडा नाचत  दाखवीले, कसे बदलावे बोट थुंकीचे.
शिकूनी त्याचे, पाहून उत आला सिने कलाकारांना.
केली सुरवात बिहारी बाबू ने, पांघरून तिरंगा रातो रात , 
पप्पूचे गुण गान गात , 
ऐकून त्याला, खामोश!!!ओरडे जनता  
 





डफलीच्या तालावर, गात गुण मोदीचे धरूनि बोट शहाचे 
'शी बाई ह्या निळ्याचा वीट आला' म्हणत 
कवटाळला भगवा   डफलीवालीने.
पक्षांच्या ह्या मेळ्यात ‘आप’ला भेटेना ‘बाप’
ओरडत राहिला तो पोरका, ‘कुणी मला दत्तक घेता कां हो दत्तक’
दिल्ली पासून गल्ली पर्यंत करती नेते  फसवणूक मतदात्याची,
कथा न वेगळी  आपल्या कणखर महाराष्ट्राची
रस्सीखेच चालू होती भुंग्याची अन वाघाची
पडले हाताला जसे गठ्ठे, ‘म्हणत ताकत आपली समान,
एकवटूनी  ताकत आपुली , करूया गड सर  निवडणुकीचा!
वंशज बाबासाहेबांचा  भेटला महम्मद गझनीला  
म्हणाला भूल जा दुष्मनी अपनी पुरानी,कर लेअब यारी  
दे मेरा साथ मरोड देंगे कमल और हाथ.
 एकटे राहिले इंजिन बिचारे, धावण्यास मिळाले नाही निखारे
कळत नव्हते त्यास काय करावे,जशा फुटल्या वाटां,
 फुंकत शिटी फिरतोय  महाराष्ट्र, बिचारा. 
ओरडत , "लाव रे तो विडीओ", ‘मोदी- शहा’ जोडी म्हणजे देशाची नासाडी,
जशी संधी दिली तुम्ही  मोदीला,‘द्या एक संधी पप्पूला.   

ऐका ताई माई अक्कानो, मतदाते राजानो,
आणा शपथा आमिषे, शिव्या शाप घाला चुलीत
उमेदवाराना तोला प्रमाणीकतेच्या, कर्तव्याच्या, तागडीत
राष्ट्र भविष्य आहे फक्त तुमच्या तर्जनीत.
दवडू नका ही सुवर्ण संधी देश बदलण्याची   
मूठ झाकली तुमची  लाख मोलाची, 
करा  विचार ठरवा, कोणास द्यावयाची खुर्ची.

 मतदान हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे.

Wednesday, April 3, 2019

हजर जबाब





 अलीकडे मोबाईलने जीवन सुखकर केल्या पासून फोन करण्या ऐवजी मंडळीWhats app वर लिहून बोलणे पसंद करतात.
असाच एक मेसेज मित्राने मला केला...त्याला उत्तर देताना न कळत मजेशीर हजर जबाब त्याला पाठविला.

मित्र: काय रे करतोस काय? (Whatsapp वर )

(त्याने विचारायचा अवकाश,चालून बकरा घरी आल्याच्या आनंदात मी सुटलो,)


मी:  मी काय करतो ह्याचे तुला काय?
गाईच्या दुधावर धरली साय
सायीचे झाले लोणी
आता मला  पुसेना कोणी, 
पुसून घेतले  स्वतःला
झाला ओला पंचा
पंचा मात्र गांधींचा
गांधींच्या हातात काठी
नेहरू त्यांच्या पाठी 
बोसांचा सुभाष लढला वेगळा
नाहीसा झाला करीत रक्त गोळा 
आठवणीत आज हि आहे तो चंद्र  
चंद्रावर गेला Armstrong
टाकले त्याने पहिले पाऊल  
वाह! वाह!जग म्हणाले   
विज्ञानाचेनवे  दालन की हो उघडले
मानवा केलेस खरे असाध्यास साध्य  
प्रश्न पडला आता पुढे काय?
प्रत्येक ग्रहावर ठेवणार का पाय?

मित्र: थांब!थांबव तुझी कल्पना शक्ती  
जमल्यास कर थोडा आराम 
राहिलेल्या गप्पा गोष्टी
मारू या प्रत्यक्ष भेटी.


Monday, March 25, 2019

आरसा


५ -६ वर्षापूर्वी माझे वजन जरा जास्तच वाढले होते आरशात स्वतःला पाहणे सोडून दिले होते त्याच वेळेस कोणीतरी एका भेटीत नवीन डायेटीशनचे नाव सुचवले. दुसर्याच दिवशी मी स्वतःचे पाय पुन्हा स्वतःलादिसतील ह्या आशेने  त्यांच्या पार्ल्यातील क्लिनिक मध्ये हजर झालो पहील्या क्षणीच समोर बसलेल्या डॉक्टरांकडे (डॉक्टरांची उंची  ६’ असावी तसेच शिडशिडीत बांधा )पाहून आपले वजन नक्कीच ह्या कमी करू शकतील ह्याची खात्री पटली.त्यानंतर त्यांच्या सांगण्याप्रमाणे १ महिना डायेट केला व पुन्हा मी आपल्या पायांचे दर्शन घेऊ शकलो.त्यांच्या ह्या जादूच्या कांडीस (डायेटला) व अथक पृथ्वी  वरील वजन कमीकरण्याच्या प्रयत्नास माझा एक छोटासा सलाम.


आमची काया तुमची माया
आमचा बी पी तुमची रेसिपी

आमचा कोलोस्टरोल तुमचा कंट्रोल  
काल ५०० ग्राम कमीआज ६००  ग्राम कमी
वजनात घट होतेय भरा भरा
महिन्या अखेर रिपोर्ट आला बरा

पोटाचा नगारा झाला सपाट 
टायर्स कंबरेचे  झाले फ्ल्याट 

जुनी जीन्स जुना कुर्ता
पुन्हा झाला बरां 

नको आता पिझ्झा
नको वडा पाव

नको वास  बासुंदीचा
नको वास  बिर्याणीचा


आता आरसा झाला सखा!

आता केवळएकच ध्यास सशक्त
आणि निरोगी शरीराचा





आभार! आभार! डॉक्टर ...

खुर्ची

  खुर्ची ऑफिसमध्ये एकदा एकटाच बसलो होतो. समोर माझी खुर्ची होती. रोजचीच. अनेक वर्षे वापरलेली. त्या दिवशी मात्र पहिल्यांदाच तिच्याकडे नीट...