Tuesday, November 2, 2021

पुन्हा एकदा दुसरी पाटी-

 



पुन्हा एकदा दुसरी पाटी-


आज माझ्या ह्या पाटीला १ वर्ष ११ महीने होत आलेत.

मी आजही या पाटीवरनित्य नेमाने १ चित्र काढतो,

माझ्या चित्रांचा आनंद मीच घेतो, इतराना देण्याचा 

प्रयत्न instagram  वर टाकून गेले वर्षभर करत होतो.


पण काही दिवसांपूर्वी लक्षात आले कि तुम्ही

जरी शेणाचा फोटो टाकलात तरी तुम्हाला 

१००० लाइकस मिळतात. 

ह्या instagram वर संचार करणार्यांचे हृदय प्रेमळ, 

कुणालाही दुखावणे ह्यांना आवडत नाही.

काही काय बरेचसे महाभाग आपला फोटो 

रोज टाकत असतात त्यांची मला गम्मत वाटते 

एका रात्रीत होणारा बदल तेच जाणो 

तरी देखील रोज ह्या पठ्यानां  १००० लाइकस मिळतातच.

पण माझ्या सारख्या बर्याच चित्रकारांना १० लाइकस

मिळाले तरी आम्ही खुश.

पण यंदा अनंत चतुर्दशी पर्यत श्री गणेशाची १० चित्रे 

टाकून instagram ला रामराम ठोकला.

झालेल्या कौतुकावर खुश रहावयाचा 

निर्णय घेतला.  रोज चित्र काढावयाचा 

रतीब मात्र आजही चालू आहे.

चित्रकाराला त्याच्या स्वत:च्या कलेत 

मिळणारा आनंद हा इतराना सांगूनही 

समजणार नाही. 

ईश्वराकडे एकच मागणे, लय नाही देवा 

जर मनुष्य जन्मास पुन्हा घातलेस तर 

मला चित्रकारचाच  जन्म दे. 




आज लक्ष्मीपूजन.

 हि दिपवाळी आपणास  भरभराट आणो. 



*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर  उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आलेमेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.




 


Tuesday, August 3, 2021

मैत्री

 Friendship day

मैत्री दिवस ऑगस्ट १.


सकाळ पासून फोन ची 

टीन टीन चालू होती,

आज मैत्री दिवस आहे ह्याची आठवण

करून देणारे वेग वेगवेगळ्या शब्दांकनात 

मैत्रीचे चाफे गुंफले होते, 

ह्यात आनंद एका गोष्टीचा 

की अनेक वर्ष न भेटलेल्यान्च्या 

स्मृतीत मी अजूनही स्थान करून होतो 

ह्या सर्व शुभेच्छा मध्ये सर्वात ल्क्षात रहाणारी शुभेच्छा  म्हणजे

सुदामाने कृष्ण से पुच्छा 

" दोस्ती का सही मतलब क्या है"

कृष्णने हसकर  जवाब दीया,

जहा "मतलब" होता है 

वहा दोस्ती कहा होती है"

ह्यात खऱ्या मैत्रीचे सार आहे.

"मैत्री दिवसाच्या प्रेम पूर्वक शुभेच्छा"




 

Wednesday, May 5, 2021

आई,

 

आई

तुला हरवून होतील आज १८ वर्षे,

तुझ्या वाढदिवशी, तुझ्या आठवणी

येतात दाटून लहानपणीच्या.

कोणकोणत्या म्हणून लिहू,


कधी ना  दिसली

तुझ्या कपाळावर आठी,

कधी ना  तू वटारलेस डोळे,

ना रागावलीस कधी आम्हा,

ना उचललास धपाट्यांसाठी हात.

७ जणांचे ७ चोचले,पुरविलेस तू,

कपाळावर कधी ना आली आठी 

रांधा,वाढा, उष्टी काढा ह्यात रमलीस

 नाही कंटाळलीस कधी.

आपुल्या आजाराचे गुपित लपवूनी 

सेवा करीत, बरे केलेस आमुचे आजार. 

रात्र असो वा दिवस तू सेवेस मात्र हजर 

तक्रार तुझी ऐकली न कधी.

आम्ही न केला तुझा जन्मदिवस,साजरा 

ना दिली कधी तुला भेट.

रुसलीस  आम्हावरी, दिलेस केवळ प्रेम.

कठीण प्रसंगी, सदैव राहिलीस उभी,

 बनून आमुची दीपस्तंभ,   

आज या तुझ्या जन्मदिनी,

आज तुझया ह्या जन्मदिनी

आम्हा सर्वांची हि स्वीकार छोटीशी भेट. 

Monday, April 26, 2021

हे देखील एक वावटळ


 

 

अगणीत तारांगणाखाली,

ओहोटीच्या लाटांच्या

अस्पष्ट गुणगुणगुण्यात

माझी पाऊले हरवली होती

शोधीत आठवणीच्या गुंत्यातून

ती पुसलेली आठवण.


भरकटलेले मन वाटले

स्वतःशी करावेसे मोकळे,

तेव्हां शोधीत एकांताला

पाऊले वळाली स्मशानाकडे


क्षण, क्षण, होतो वेचीत,

प्राजक्ताच्या  फुलांप्रमाणे

मी तुझ्या आठवणीना,

साक्षिला ठेवुनी तारकांमध्ये होतो शोधीत, 

हरवलेल्या त्या चंद्राला!


क्षण भंगुर जीवनाला,

लाभली झालर शांततेची

भासली उणीव केवळ,

तुझ्या श्वासाची करण्यास,

भंग त्या शांततेला



Sunday, December 6, 2020

गेले ते दिन गेले



 घर बसल्या बसल्या

गेले ते दहा महिन्याचे दिवस!

प्रश्न केला मी, माझा मला

खरेच, काय रे केलेस तू?

गोंधळून, मन माझे, विचारात गुंतून गेले !

आठवू लागले दिनक्रम गेल्या दिवसांचा,

 पाउल न पडले

एकही दिवस उम्बरठ्याबाहेर,

मग होतो करत तरी काय?

बसून खिडकी जवळील खुर्चीवर...

 पहात होतो,

ऋतू बदलताना,

 पहात होतो,

उन्हाळ्याला घाम पुसताना  

 पहात होतो

विजेला, काळेभोर ढग कापताना

 पहात होतो

घोंघावणार्या वाऱ्यास,

मुसळधार पावसाशी भांडताना  

 पहात होतो,

विचाराना हातातून चित्र रूपे रेखाटताना

 पहात होतो,

टीवी वर येणारे कोविड१९चे भयाणआकडे

 पहात होतो

रोज, जगभर उडणारा हा:हा:कार,

 पहात होतो

झाकळलेली पहाट होताना

 पहात होतो

अस्वछ दिवस मावळताना,पहात होतो

काळोखी रात्र, दमून झोपताना.

 

होतो वाट पहात

नव्या स्वछ सूर्योदयाची

नव्यां स्वछ श्वासाची

होतो वाट पहात.,

बसून खिडकी जवळील खुर्चीवर...

 

पहाता पहाता वर्षाचा शेवट कि हो आला

राहिले केवळ काही दिवस, वर्ष बदलायला,

२० चे २१ व्हायला,

नव वर्षांच्या आगमनाला...नव्या उमेदीला...

व्हा तयार स्वछ २०२१, च्या स्वागताला!


*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर  उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आलेमेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.


Tuesday, October 13, 2020

वावटळ -८


 अनेक वेळा डोक्यात विचार एकाच वेळेस कल्लोळ करतात व वावटळी सारखे डोक्यात फिरत राहतात त्यांचा एकमेकाशी कसलाही मेळ नसतो.अशीच एक वावटळ .    


(धो धो कोसळणाऱ्या पावसाकडे

पहात मला पडलेला,एक प्रश्न?)

“नेमेची येतो मग पावसाळा

हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा”   

कवीने ही वाक्य रिम झिम पावसाला

पाहून लिहीली असावीत बहुतकरून.

गावातील नद्या,गुरे, ढोरे,घरे आणि शेते 

पूरात वाहून जाताना पहिले असते 

तर ह्याच कविने काय लिहिले असते?

बाळाला पावसाचे,सृष्टीचे कौतुक कर

असे सांगावेसे वाटले असते का?


बातमी: भारतात कोरोनाचे अगणीत रुग्ण!

थोडक्यात...हाताची घडी तोंडावर... नाही मास्कवर  बोट, 

गुमान घरी बसा आणि राहिलेले दिवस मोजा.

मोजता, मोजता,मोजा निघाला फाटका,

उभे काही रहावेना,पायाला बसला चटका, 

लागली तहान भारी,  प्यायलो वाकून नळाचे पाणी,

टना टन पडली खिशातून नाणी,

शोधून,शोधून थकलो, झाडावर जाऊन बसलो,

पाहून नव्या शेजाऱ्याला  पोपट जोरात हसला

हसता हसता म्हणाला, तुझी चोच कुठाय?

माझ्या चोचीची तुला कशाला  पोच?

बंद कर तुझी वटवट, खा पेरु चट पट

नि जा भुर्रर उडून झट झट .


चौकोन मला आवडत नाही 

सर्व काही असते काटकोनात 

अडकतो आपण चार भिंतीच्या आत,

उठतो, बसतो, बोलतो भांडतो 

कधी कधी श्वास गुदमरतो,

सर्वांगाला फुटतो घाम,

सांगता नाही येणार कधी म्हणू राम! 


माझे काही जात नाही 

जात असते तर दळले  असते 

मग ते कुठल्याही  जातीसाठी असो 

जात, जात , जात !

पाहा भाषेची करामत!!

शब्द एक,पण अर्थ मात्र ३ !!


*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर  उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आलेमेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.


 

 

 

 

 

  

  

 

 

खुर्ची

  खुर्ची ऑफिसमध्ये एकदा एकटाच बसलो होतो. समोर माझी खुर्ची होती. रोजचीच. अनेक वर्षे वापरलेली. त्या दिवशी मात्र पहिल्यांदाच तिच्याकडे नीट...