Thursday, January 25, 2024

झाले बहु होतील बहु ...

 

झाले बहू... ही ब्लॉगमाला माझ्या १५ वया पासून २१ वया पर्यंत लागलेल्या व्यसनांतील मोजके बॉलीवूड हिरो, हेरॉईनस, म्युझिक डायरेक्टर, प्ले बॅक सिंगर्स, डायरेक्टर्स, ज्यांनी मला त्यांच्या विविध कलागुणाने आकर्षित केले व आनंद दिला त्यांना समर्पित,

ऐ मेरे वतन के लोगो
कुछ याद उन्हे भी करलो 


झाले बहु होतील बहु ... या पलीकडे माझ्या कडे शब्द नाहीत.




Monday, January 15, 2024

माकड चेष्टा

 माकड चेष्टा


दोन बोके. नाव त्यांची सोम्या गोम्या 

एक न्यायाधीश माकड.  नाव त्याचे चेष्टा

झाले बोक्यांचे भांडण कारण काय तर वाघाचा खरा नातेवाईक कोण?

न्यायासाठी गेले माकड " चेष्टा" कडे माकडांनी ४ दिवसाचा वेळ मागितला 

४ दिवसांनी माकडाने आणखी ४ दिवस मागितले नावा प्रमाणे चेष्टा करत  त्याने १ वर्ष ६ महिने काढले 

शेवटीं वनराजाने त्यास दिली तंबी  व न्यायाचा दिवस ठरविला.ते  समजल्यावर लबाड सोम्यानें गोम्याच्या नकळत  माकडास घरी बोलावले पंच पक्वाने जेऊ घातली वर  दक्षिणा म्हणून दिल्लीची सहल घडवली माकड खुश  ढेकर देत घरी गेला.ह्या दीड वर्षात माकडाने दोन्ही बोक्यांना ८ पिढयांच्या वंशावळीचापुरावा देण्यास सांगितला.

निकालाचा दिवस उजाडला आतुरतेने दोघे बोके माकडासमोर हजर झाले,माकडाने दोघांनी दिलेल्या वंशावळीचे वाचन सुरु केले. गोम्याची माहिती वाचताना काही माहिती न दिल्याचे सांगितले यावर गोम्याची येणारी प्रतिक्रिये कडे दुर्लक्ष करून 

सोम्याच्या बाजूनें  निर्णय देऊन टाकला व जाहीर केले, सोम्याच वाघाचा वंशज आहे. व त्यालाच वाघाचे पट्टे मिळाले आहेत.

बिचारा गोम्या हिरमुसला होऊन परतला येताना काळोखात त्याच्या हातात सोम्यानें गर्वाने चेष्टा करीत  एक मशाल देत म्हणाला आता ह्याच्या उजेडाची सवय करून घे हि जर विझली तर तुझे अस्तित्वच नाहीसे होईल.

गोम्याने मशालीच्या उजेडात प्रस्थान केले वाटेत वनराजाला कडून. न्याय मिळवायचाच ह्यचा निश्चय केला .गोम्या गेलेला पाहून सोम्याने न्यायमूर्ती माकडास टाळी दिली दोघे हसत हसत आप आपल्या वाटेस लागले.

बिचारा गोम्या आता वनराजाच्या बोलवण्याची वाट पहातोय. सोम्याने मात्र आपल्या खुर्ची मागे एक वाघाचे मोठे तैल चित्र लावले.

ह्यालाच माकड चेष्टा म्हणतात.


 

Sunday, December 31, 2023

सूर्योदय २०२४

 

सूर्योदय २०२४

दिसला सूर्योदय २०२४ चा, नव्या वर्षाचा. 

पडले आणखी एका नव्या वर्षात पाऊल,

वाढून काय ठेवले ह्या वर्षाच्या ताटात 

पाहू या तरी रोज उगवणाऱ्या दिनकराच्या साक्षीने,

गेल्या वर्षांत विशेष काही घडले नाही 

जे काही घडले ते तसे काही वाईट नाही ना उत्तम,

आणि आपण तरी ह्या वयात अपेक्षा कराव्यात तरी कशाच्या 

प्रकृती, आरोग्य, खाणे, पिणे, सर्व काही ठीक ठाक 

मुले बाळे खुशीत कि आपण खुशीत,

काही मित्र, नातलग वर गेल्याच्या बातम्या 

हे अंगवळणी पाडून... मनात म्हणावयाचे 

राम भजन कर लेना रे भाई 

एक दिन जाना रे भाई.

नैराश्याचे नावही न घेणे

येणे, जाणे हे नियतीचे चक्र

थांबवणे न आपुल्या हाती.


माझ्या  खास मित्रांसाठी एक आधारित गाणे

कसं काय पाटील बरं हाय का, अहो बरं हाय का ?

काल काय काय प्यालात , ते आठवतंय  का ?


अहो राव तुम्ही, ते नाही तुम्ही, अहो चष्मेवाले तुम्ही

न्हाय, न्हाय, न्हाय, न्हाय, मोबाइल वाले तुम्ही

सांगा काय ऐकलं ते खरं हाय का ?


काल म्हनं तुम्ही पार्टीला  गेला, 

रम व्हिस्की बिअर ने तहान  भागवलीत  का?

झिंग झिंग झिंगाट नाचलात  का?

सांगा काय ऐकलं ते खरं हाय का ?

पार्टीत म्हनं मोबाईल इसरून आला

इसरल्या ठायी, गावलं का न्हाई, 

आज तरि संगती आणलंय का ?

काल म्हनं तुम्ही पार्टी ला गेला, 

डोक्यातला ऐवज हरवून आला

आरंरं आज काय शिल्लक र्‍हायलंय का ?

काल काय ऐकलं ते खरं आहे का?


काल म्हनं तुम्ही पार्टीस  गेला, 

पिता पिता घोटाळा झाला

काय झालं पुढं, सांगा तरि थोडं आठवतंय  का ?

खाली नका बघु आता लाजताय का ?

आगं बया बया,काल काय ऐकलं ते खरं आहे का?



२०२४चे आगमन आनंदात साजरे करा.


Tuesday, December 26, 2023

आरक्षण,आरक्षण.आरक्षण.

 आरक्षण,आरक्षण.आरक्षण.



भटक्या,मागासलेल्या,आदिवासी व इतर जाती यांना ३०/% (?
आणि कुठल्या जमातीस २०%आरक्षण मग मराठ्याना ६०% 
का नको? 

हवे तर आम्ही न्याय निवाडा जाणत नाही, 
सरकारची चूक आम्ही भोगतोय.
आरक्षण  मिळालेच पाहिजे. 

प्रश्न: उच्च जातीयांनी काय करावे?

एकच उपाय सर्व उच्च जातीने 

आरक्षणाची जात पत्करणे 

पूर्ण महाराष्ट्रात आरक्षण.

तंटे, बखेडे मोर्चे उपोषण  

सर्व काही बंद.

आनंदी आनंद.  


Saturday, December 23, 2023

संकल्प ! २०२४

 संपले वर्ष २०२3

करा तयारी २०२४ च्या स्वागताची संकल्पाने!


का नाही? अहो सकारात्मक संकल्प करण्यास काय हरकत.

आता सकारात्मक  म्हणजे?काय? विचारू नका, सुरुवात करा स्वतः पासून...मी काय करणार? गेल्या वर्षातील चुका, अडथळे, कसे सुधारावेत ह्याचे नियोजन आता पासून करणार . 

 संकल्प !

आपल्या अवती भवोतीचे वातावरण बदलणे शक्य नाही तेथे चक्क डोळे झाक करणार.  म्हणजे काय?

राजकारण:  राज? का रण? हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार नाही  चर्चा करण्यात वेळ वाया घालवणार नाही.

कारण? सरळ साधे सोपे. मला त्याची ऍलर्जी आहे. संकल्प !

खेळ: सर्व पहाणार,  ह्या सारखे सुख नाही. जगभर अनेक प्रकारचे खेळ चालू असतात, हातात रिमोट असला की जगात कुठल्याही स्टेडियम वर असलेला सामना बघण्यात हाती असलेला रिकामं वेळ घालवणार.बसल्या बसल्या फेर जगात फटका. संकल्प !

व्यायाम: आपल्या प्रकृती प्रमाणे वयानुसार नियमित फेरफटका सकाळचा चालू ठेवणार खंड पडू देणार नाही.संकल्प !

वाचन : ह्या सारखा दुसरा मित्र नाही, वेळ मिळत नाही म्हणून कारणे न देता ही आवड पुढे चालू ठेवणार.काय वाचणार? काहीही हाती येईल ते, तशी पुस्तकालयात जायची आवडही आहे. सध्या तीन सम व्यावसायिकांनी लेखन केलेली वाचनात आहेत.संकल्प !

लेखन: आपले विचार मांडण्याची मला पहिल्या पासून आवड आहे. खचखोळ चालू राहीलच. माझ्या आनंदासाठी.

प्रवास: ह्या वर्षात परदेशगमन करण्याचा मनसुबा आहे, पाहू कसे जमते ते. संकल्प !

व्यवसाय: आले अंगावर तर घेईन शिंगावर ह्या तयारीत मी नेहमीच असतो.संकल्प !

शिक्षण: मी कधीच थांबलो नाही. सध्याच्या कॉम्प्युटरयुगात  माझ्या व्यवसायास लागणारे सर्व मी शिकत आहे व शिकत रहाणार. आज तरुण मुले जाहिरात व्यवसायातील एकमेकांशी सवांद साधतात त्यात भाग घेण्या एव्हडी तयारी नक्कीच ठेवणार. तसा फारसा  मागे मी नाही,कासवांसारखे(खऱ्या ) का असेना सशांच्या शर्यतीत खांदा लावून प्रयत्न नक्कीच करेन. संकल्प !

आहार : मागील पानावरून पुढे खाऊ हे तत्व जोपासणार. संकल्प!

करमणूक : ह्याला घरी टीव्ही असल्या कारणाने व आवड असल्याने ओटीटी मुबलक करमणूकिचे मोठे साधन, बातम्या पासून नवीन ओटीटी  रिलीजेस पहाण्यास कंटाळा येऊ न देण्यास वेळ काढणे.संकल्प !

विश्रांती: आवडता विषय नाही नुसता झोपण्या पूर्ती नव्हे तर भिर भिरत्या मनाचे गणपत वाण्या सारखे मनोरंजन करणे.संकल्प !

निद्रा : वयामुळे नाश पावत असणारी गोष्ट. पण त्यावरील देखील उपाय म्हणजे रात्री नाश पावलेला वेळ वाम कुक्षीत भरून काढणे.वाचलात माझा दिनक्रम/उपक्रम /स्वप्न/संकल्प !

संकल्प!  उद्याच्या श्वासाची शाशवती नसताना देखील... मनुष्य प्राणी केवळ ह्यावर जगतो.असो. 

नवं वर्षाच्या शुभेच्छा.

Thursday, November 30, 2023

राजकीय चिखल


राजकीय चिखल

महाराष्ट्र




राष्ट्र




अराज का? रण. 
सध्या देशात राजकारण म्हणजे दुसऱ्या पक्षावर चिखल फेकणे व आपण स्वच्छ असल्याचा दावा करणे.
राजकर्त्या पक्षा विरुद्ध "ब्र" काढलात की तुमच्या पाठीमागे इनकम टॅक्स,  ई डी, पोलीस,ह्यांचा ससेमिरा लागलाच समजा.कुठलाही टीव्हीचॅनल लावा ह्यांनी त्याला,फटकारकले त्यांनी त्यास धक्का दिला ,आज ह्याच्या घराची झडती,उलटतपासणी त्याची सुरु झाली चिन्ह खटला, पार्टी पळविणे, चोरांना आश्रय देणे, हिंदुत्व, आरक्षण मिळविण्यासाठी खोत जातीचे दाखले ह्या गोष्टी रोज दात घासण्या सारखे झाले आहे. एकूण संपूर्ण देश चिखलाने बरबटलेला आहे. 




दूर दृष्टी
देख तेरे संसार की हालत क्या हो गयी भगवान,

कितना बदल गया इंसान..कितना बदल गया इंसान,
सूरज ना बदला,चाँद ना बदला,ना बदला रे आसमान,
कितना बदल गया इंसान..कितना बदल गया इंसान ||

आया समय बड़ा बेढंगा,आज आदमी बना लफंगा,
कहीं पे झगड़ा,कहीं पे दंगा,नाच रहा नर होकर नंगा,
छल और कपट के हांथों अपना बेच रहा ईमान,
कितना बदल गया इंसान..कितना बदल गया इंसान ||

राम के भक्त,रहीम के बन्दे,रचते आज फरेब के फंदे,
कितने ये मक्कार ये अंधे,देख लिए इनके भी धंधे,
इन्हीं की काली करतूतों से हुआ ये मुल्क मशान,
कितना बदल गया इंसान..कितना बदल गया इंसान ||

जो हम आपस में ना झगड़ते,बने हुए क्यूँ खेल बिगड़ते,
काहे लाखो घर ये उजड़ते,क्यूँ ये बच्चे माँ से बिछड़ते,
फूट-फूट कर क्यों रोते प्यारे बापू के प्राण,
कितना बदल गया इंसान..कितना बदल गया इंसान ||

स्वर - प्रदीप कुमार
फिल्म - नास्तिक (1958)

Wednesday, November 29, 2023

"अलबेला"

 






हिंदी सिने सृष्टीतील संगीतकार म्हणून एक अढळ स्थान मिळविलेला "ध्रुव तारा'." 


रेल्वे स्टेशन मास्तरांचा मुलगा. तारुण्यात सिनेमा नाटकाचे वेड लागलेला "अलबेला". 

१७वर्षांचा, नववी पास घर सोडून कोल्हापूरला येतो लवकरच "नागानंद" सिनेमात भूमिका पटकावतो तोंड घशी पडल्यावर हिरो होण्याचे वेड सोडून मुंबईचा रस्ता धरतो. आता तो आपल्या दुसऱ्या प्रेमाकडे "संगीता "कडे वळतो.

गंधर्व महा विद्यालयात विनायक बुवा, गोविंदराव पटवर्धन ह्यांच्या कडून शिक्षण घेतो व सिनेमात छोट्या भूमिका जशा मिळतील तशा करतो. सिनेमाची कधी न ऐकलेली  नावे 'आत्मा तरंग' "सैदे हवंस' १९३६ /३७.


ओळखलंत का कोण? नाही ना पुढचा प्रवास वाचा. 

मिनर्व्हा थिएटर मधील संगीतकारांना पेटीची साथ करता करता एक दोन तामील फिल्मना संगीत देतो.

ह्या अलबेलाच्या उडत्या गाण्यांना वेस्टर्न गाण्यांचा साज होता, तसेच हिंदुस्थानी गाण्यास रागदारीची झालर होती. ओळखलंत का? नाही मग चला पुढे, ह्याच्या संगीतास तारुण्याचा उन्माद ठासून भरलेला त्यांनी सेक्साफोन च्या जोडीला गिटार आणि माऊथ ऑर्गन ची जोड देऊन हा उन्माद खरा ठरवला ."आना  मेरी जान" "शोला जो भडके" ह्यात बॉन्गो, सेक्साफोन वापरून रॉक म्युझिक ची ओळख बॉलीवूड मध्ये आणली. पहा आठवून " इन मीना डिंका " सारखे अजरामर गाणे तुमचे पाय आपोआप ठेका धरतील. १९४२ च्य सुमारास हे साहेब त्याकाळातील विनोदी अभिनेता भगवान दादांना भेटले  आणि चमत्कारास  सुरुवात झाली केवळ वयाच्या २४ वर्षी,  "ललकारी," "सम्राट चन्द्र गुप्त", "भक्तराज" फिल्म्स ने त्याच्या उदयास सुरुवात झाली, भक्तराजच्या प्रोड्युसर जयंत देसाई यांनी  त्याचे नावच बदलून टाकले मग काय विचारता सूर्यउदय झाला, आता तरी ओळखलंत,  

बरोबर! दुसरे तिसरे कोणी नसून हा 'अलबेला' म्हणजे सी. रामचंद्र सर्वांचे लाडके अण्णा.  

अण्णा प्लेबॅक देताना मात्र खरे नाव 'चितळकर' लावीत.

(जो पर्यंत मी नाव सांगत नव्हतो तो पर्यंत "अरे ""कारे",  मध्ये मी उल्लेख करत होतो जसे नाव उलगडले तसे माझ्या करवी आपोआप आदरार्थी सम्बोधन होऊ लागले.) 

अण्णांचा आवाज माझ्या तारुण्यात सुरु झाला. मी १० वीत होतो इंपिरिअल थेटरला भगवान दादांचं अलबेला, मी अकरावी पास होईपर्यंत ठाण मांडून बसला होता. 

अहो गाणी आठवा... 'भोली सुरत, शोला जो भडके, धीरेसे आजारे..." सिनेमातले प्रत्येक गाणे हिट अण्णांच्या म्युझिक बरोबर भगवानदादा देखील उदयास आले. 

अण्णांचा दबदबा वाढला तो "अनारकली" नन्तर व तेव्हां खऱ्या अर्थाने "सी.रामचंद्र" हे नाव "झाले बहू होतील बहू " परंतु ह्या सम हा!" यादीत बसले .   अनारकली नन्तर अण्णा आणि लता दीदी हि जोडी अतूट झाली. लंडन मधील एका पत्रकाराने "अनारकली" पहिल्यांनंतर लिहिले कि सिनेमातील हिरोईन एखाद्या स्वर्गातल्या परी सारखी गायली, त्या बिचाऱ्याला लता दीदी माहित नव्हती.

अण्णांची महती वाढतच गेली त्यात लता दीदीची साथ.  नवरंग, स्त्री, अनारकली,आझाद, नास्तिक, पतंगा,पैगाम,अनेक बहारदार संगीताने नटलेले चित्रपट ८०% गाण्याच्या मदारीवर चालले अहो हेच ते अण्णा ,"झाले बहू होतील बहू...अण्णांचा दरारा बॉलीवूड मध्य वाढू लागला, एस डी  बर्मन सारख्या नामी संगीतकारास देखील काही बदल सुचवलेत. तुम्हाला " थन्डी हवाये" गाणे आठवते का? त्यात "ला ला ला' ची जोड अण्णांनी सुचवली व गाणे हिट झाले असे हे "झाले बहू होतील बहू...  अण्णा.

१९५० चे दशक ह्या अलबेलाने गाजवले, अण्णांनी त्यांच्या उडत्या व भावूक गाण्यांनी देश गाजवला.

ह्या सर्व शिखरावर त्यांनी कळस चढवला तो १९५३ साली प्रजासत्ताक दिनी झालेल्या सोहळ्यात अजरामर गाण्याने. लता दीदी च्या गळ्यातून उतरलेली  "ऐ  मेरे वतन के लोगो" आर्त हाकेने पंडित जवाहरहलालजीनी देखील अश्रू ढाळले   आज ७० वर्षे, दर २६ जानेवारीस गल्लो  गल्ली  हे गाणे घुमते, अंगावर शहारे आणते, केवळ अण्णा तुमच्या संगीताने.


अण्णा तुम्ही माझ्यासाठी मात्र सदैव "झाले बहू होतील बहू.... " 




खुर्ची

  खुर्ची ऑफिसमध्ये एकदा एकटाच बसलो होतो. समोर माझी खुर्ची होती. रोजचीच. अनेक वर्षे वापरलेली. त्या दिवशी मात्र पहिल्यांदाच तिच्याकडे नीट...