Monday, December 31, 2018
Saturday, December 29, 2018
७ दशके
संपले! संपले! २०१८ साल
संपले!३६५ दिवस भुर्रर करून उडाले.
बघता बघता आयुष्याची साडे सात
दशके पार केली. कशी?
ही अशी,
दशक पहिले.घरातल्यांशी ओळख होण्यात, ही
आई, हे वडील,हे भाऊ, ह्या बहिणी,हे आपले घर वगैरे वगैरे समजण्यात
संपले अर्धे दशक. पुढची ५ वर्षे गेली शाळेशी
ओळख होण्यात,अनेक विषय डोक्यातील कप्प्यात साठविण्यात.प्राथमिक, माध्यमिक करीत,केलाप्रवेश
२ऱ्या दशकात,जाणीव झाली भावंडा बाहेरही मित्र असू शकतात. गद्य, पद्य
ह्यातील फरक, बालकवी, विंदा, अनिल,बा.भ. पु.ल.ह्यांची दर्शनाशिवाय ओळख करून, गणित
व बीजगणितातील फरक समजून घेण्यात केव्हा शाळा संपली व कधी मिसुरड घेऊन विद्यालयाची
पायरी चढलो, ह्या पायऱ्यावर ओळख झाली सिनेतारका, नटांशी राज कपूर, देव आनद पासून ग्रेगरी
पेक,क्लिंट इस्टवूड आणि नर्गिस मीना कुमारी ते एलेझाबेथ टेलर, गोल्डी हॉर्न ह्यांच्याशी
मैत्री होते ना होते, तो लगेच नोकरीच्या घाण्याला
जुम्पंलो, सकाळी ९ ते...? करीत, ध्येयाची शिडी चढत,
तिसऱ्या दशकात प्रवेश केला,
मला वेळ नाही बघून
वरच्यानेच दया येऊन लग्न जुळवले, अंजलीच्या प्रवेशाने माझा अरुणोदय खऱ्याअर्थाने
झाला. प्रसिद्धी, पैसा, सन्मान आणि दोन गुणी मुले असा दुग्घ्दशर्कराचा योग पूर्ण
केला तिसऱ्या दशकाने.
४थ्या दशकाच्या सुरुवातीस स्वतःचे संस्थान प्रस्थापित
केले,देशभर नावारूपास आणले व
५व्या दशकात पाय ठेवला शुभ अशुभ, उद्योगातील
चढ उतार व आपलेच संस्थान सोडण्याचे प्रसंग ह्या दशकात पहिले.
६व्या दशकात
पुन्हा गमभन गिरवित नवीन संस्थान उभे केले, पूर्वार्धात उत्तम बस्थान बसविले,
उत्तरार्धातमात्र उतारावर उभे असल्याची जाणीव झाली,कामात ओहोटीची सुरुवात झाली,व
७व्या
दशकाची नांदी झाली,
स्वतःच्या पाठीवर स्वतःच्या
कर्तबगारीबद्दल थाप मारून शाब्बासकी दिली व ठरवले, बस्स! बहुत हो गया!
जा अरुण
जा जिले अपनी जिंदगी अपने ख़ुशी से! असे म्हणत
सातव्या दशकात
दुकान बंद केले. रोज एक रेखाटन,व मनात घोळणाऱ्या वेड्या विचारांना ब्लॉग
द्वारे वाट दिली,बघता बघता त्यात ४ वर्षे ६महिने गेले,त्याबरोबर २०१८ देखील सरले. (हो अजून एक दिवस बाकी आहे).
तो हि सरेल. साडे सात दशके नजरे
समोरून ७ दिवसा सारखी सरकली.
ह्या सात दशकांच्या वाटेत . आनंद, दुखः सहन करण्याची ईश्वराने हिम्मत दिली,
त्याच्या आशीर्वादाने हा सात दशकांचा प्रवास शक्य झाला. त्यला माझा साष्टांग दंडवत.
अशी हि सात दशकाची संक्षिप्त कहाणी सफळ संपूर्ण.
ह्या सात दशकांच्या वाटेत . आनंद, दुखः सहन करण्याची ईश्वराने हिम्मत दिली,
त्याच्या आशीर्वादाने हा सात दशकांचा प्रवास शक्य झाला. त्यला माझा साष्टांग दंडवत.
अशी हि सात दशकाची संक्षिप्त कहाणी सफळ संपूर्ण.
CHEERS!!!
HAPPY & HEALTHY 2019!!
Sunday, December 23, 2018
Monday, December 17, 2018
भाषा
मजा आला की
मजा आली
गाली दिली की
शिवी दिली
मी दवा घेतली की
मी औषध घेतले
मी म्हणल की
मी म्हंटल
का हून करून राहिलास की
हे काय केलेस
पुस्तक भेटले
पुस्तक मिळाले-- सापडले
भाषा भाषांभाषा !!
शहर बदलले तशी
भाषा बदलली!भाषा भाषांभाषा !!
एक महाराष्ट्र. एक मराठी भाषा..
भाषेच्या १२ बोली तऱ्हा, आदिवासी
भटक्या, विमुक्त जाती बोली
धरून ३८ तऱ्हा.
सर्व बोलीनां वान्ग्मयात तेवढेच
प्राधान्य म्हणूनच 'झुलवा' कादंबरीकार
उत्तम बंडू तुपे सारखे आपल्या मनातील
विचार आपल्या बोलीत
समाजा
सामोरे आणू शकतात व
मराठी भाषेस बळकट करतात.
कवी माधवजुलिअन
यांच्या कवितेतील ह्या पंक्ती
भाषेचे किती सुन्दर वर्णन करतात,
मराठी असे आमुची मायबोली
जरी भिन्नधर्मानुयायी असूं
पुरी बांणली बंधुता अंतरंगीं,
हिच्या एक ताटांत आम्ही बसूं
हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडूं
वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरीं
जगन्मान्यता हीस अर्पूं प्रतापें
हिला बैसवूं वैभवाच्या शिरीं ॥
आपल्या भाषेचा आदर करणे
म्हणजेच आईचे रक्षण करणे.
जय मायबोली ||
.
Tuesday, December 11, 2018
सत्य
आपले कोणी ऐकेनासे झाले
की समजावे सुरु झाली
नांदी उतारवयाची
आता no more अपेक्षा फ्रॉम एनी वन
आपल्या हाकेस आता कान नाही
बहिरे आपण नाही
ह्याची हि पावती
आता आपला
पेशन्स हाच खेळ
घालवायला वेळ,
आता स्वगत बोलायचे
आता आपला
पेशन्स हाच खेळ
घालवायला वेळ,
आता स्वगत बोलायचे
स्वगत ऐकायचे,
डोकाविले कोणी तर
स्मित हास्य तयार ठेवायचे,
जमल्यास सर्व ठीक असल्याची
खात्री, हात उंचावून द्यायची
आता राहिला एकच उपायडोकाविले कोणी तर
स्मित हास्य तयार ठेवायचे,
जमल्यास सर्व ठीक असल्याची
खात्री, हात उंचावून द्यायची
कोणता?
जो स्वये कष्टतची गेला
तोची भला रे भला,
हा मार्ग एक आपुला!
Saturday, December 1, 2018
जन्मदिवस
माझा वाढदिवस
जगाच्या दृष्टीतून.
पण मनात एक विचार डोकावला
या वयात कसे काय हो वाढदिवस ?
ह्या पुढे रोज उगवलेला दिवस
हा वाढदिवस न म्हणता
काढ(ला) आणखी एक दिवस
मी आज पासून ठरविले
या पुढील येणारे (आले तर)
वाढ दिवस, मी काढले हो
यंदा साजरा केला मी माझा जन्म दिवस
कसा?
जसा आलो तसा,
म्हणजे?
केले डोके खाली
केले पाय वर,
बायको ला म्हंटले
मार एक चापट ढुंगणावर’
चापट बसली तसा रडण्याचा सूर काढला
मग जसे केले पाय खाली तसे झाले
डोके वर
मनाशी हसत म्हणालो झाला
माझा जन्म दिवस साजरा,
कोणी केला होता का कधी साजरा
असा आपला जन्म दिवस?
Thursday, November 29, 2018
जगणे
माझे तुझे काही नसते
आज दिसते ते उद्या नसते
फुलते ते प्रेम नसते
फळते ते नशीब नसते
जीवन...म्हणजे श्वास घेणे का?
वृक्ष वेली पण श्वास घेतात
वृक्ष वेली सावली फळे पाने,
प्राणवायू पण देतात
जगणे जगणे म्हणजे काय?
वृक्ष वेली पण श्वास घेतात
वृक्ष वेली सावली फळे पाने,
प्राणवायू पण देतात
जगणे जगणे म्हणजे काय?
नुसते श्वास घेणे
नव्हे तर...
निसर्ग, पशुपक्षी, प्राणीमात्रावर
प्रेम करणे
आणि म्हणूनच...
माझे ते तुझे नाते असते
दिसते तेच खरे असते
फुलते तेच प्रेम असते
फळते तेच नशीब असते
प्रेम करणे म्हणजेच
जगणे असते.
नव्हे तर...
निसर्ग, पशुपक्षी, प्राणीमात्रावर
प्रेम करणे
आणि म्हणूनच...
माझे ते तुझे नाते असते
दिसते तेच खरे असते
फुलते तेच प्रेम असते
फळते तेच नशीब असते
प्रेम करणे म्हणजेच
जगणे असते.
Tuesday, November 27, 2018
वावटळ ३
अनेक वेळा डोक्यात विचार एकाच वेळेस कल्लोळ करतात व वावटळी सारखे डोक्यात फिरत राहतात त्यांचा एकमेकाशी कसलाही मेळ नसतो.अशीच एक वावटळ .
वावटळ ३
लोकांचा स्वीकार
ते आहेत तसाच करावा
व त्याचा आनंद लुटावा,
तुम्ही लोकांना काय करावे
हे सांगू नका त्त्यांना
त्यांच्या
जीवनाचा आनंद लुटू द्या.
वेडापिसा छंद असा लागला
तुझ्यात जीव रंगला!
तन जो कर ना पाई // वो मन
कर पाई //
बुरा मत सुनो बुरा मत बोलो बुरा मत देखो और बुरा मत सोचो
सिंह राशीवालो
तील के लड्डू बाटो
आज का दिन फायदेमंद रहेगा.
आपण आपला विचार
दुसऱ्याच्या डोक्यात घालू
शकतो
मनापासून प्रयत्न करून बघा
आणि अनुभवा.
जय हो ब्रह्मकुमारी शिवानी.
बचावली= ब+चावली
ब= नाही
बचावली= चावली न गेलेली=म्हणजेच वाचली.
बचावली= ब+चावली
ब= नाही
बचावली= चावली न गेलेली=म्हणजेच वाचली.
Thursday, November 15, 2018
शोध
जुलै ३१, १९९५, अगा जे घडलेच नाही.
त्यावेळेस आपले कम्युनिकेशन
मंत्री श्री सुखराम व
पश्चिम बंगालचे मुख्य मंत्री श्री, ज्योती बसू ह्यांनी
मोबाईल फोन वरून एकमेकाशी सवांद साधला व
भारतात एक मोठी क्रांती घडली.
आज मोबाईल फोन हा जनतेचा
श्वास होऊन बसला आहे.
कुठल्याही रस्त्यावर, कुठल्याही
ट्रेन, बस, कार,
सायकल,विमान अन इतकाच काय तर बैलगाडी
कोठेही तुम्हाला १ तरी
मनुष्य प्राणी मोबाईलवर
बोलताना,खेळताना,ऐकताना दिसेल.
साध्या मोबाईल फोनचे रुपांतर गेल्या २० वर्षात
स्मार्टफोन मध्ये झाले व आज आपण जगातील कुठल्याहीकोपऱ्यातील ठिकाण अचूक दोन तीन बटने दाबून पाहू शकतो,आप्तेष्ठाशी देखील समोर बसल्यागत गप्पा मारू शकतो.
साध्या मोबाईल फोनचे रुपांतर गेल्या २० वर्षात
स्मार्टफोन मध्ये झाले व आज आपण जगातील कुठल्याहीकोपऱ्यातील ठिकाण अचूक दोन तीन बटने दाबून पाहू शकतो,आप्तेष्ठाशी देखील समोर बसल्यागत गप्पा मारू शकतो.
आता 'दुनिया मुठीमे' खऱ्याअर्थाने म्हणू शकतो.
एक ताजी बातमी,
महाराष्ट्रातील एका
छोट्याशा रायपुर खेड्यातील शेतकऱ्याने
अनेक एकर शेतीवर औषधांचे फवारे मारण्यासाठी
इंटरनेट च्या साय्याने स्वतः ड्रोन बनविला ज्याने
त्याचा
वेळ व मनुष्यबळ वाचते.
मनुष्याच्या संशोधन बुद्धीचे कौतुक करावे तेवडे थोडेच.
आता आपल्यासमोर उरतोय तो यक्ष प्रश्न
आपण मनुष्य संबंध विसरतोय का?
आता आपल्यासमोर उरतोय तो यक्ष प्रश्न
आपण मनुष्य संबंध विसरतोय का?
Friday, November 9, 2018
वाढ दिवस
माझे रोजचे संध्याकाळचे चालणे
हे
एका नटाच्या घरापासून ते दुसऱ्या नटाच्या बंगल्या पर्यंत.
२
तारखेस बंगलेवाल्याचा होता ५० वा वाढदिवस,
मी
चालत तेथे पोहोचलो आणि तेथील दृश्य
पाहून
अवाक झालो, हीरो आपल्या बंगल्याच्या
२०
फुटी गेटवर चढला होता व बंगल्याच्या बाहेरील
हजारो
चाहत्यांना हात हलवून स्वागत करत होता
चाहते
‘ हैप्पी बर्थडे’ ओरडत होते काही चाहते
त्याला
आणलेल्या भेट वस्तू फेकत होते
आणि
तो आदबीने आभार मानत होता,
आनंदाने
जल्लोष चालू होता, एवढ्यात
खांद्यास
स्पर्श करून गेली त्या बरोबर
सेकंदात
हिरो गायब, जल्लोष काही थांबला नाही,
५
मिनिट गेली नाहीत तोच गेट मधून ४/५ जीप
बाहेर
पडल्या व त्यातून चाहत्यांवर ‘वेफर्स’
ची
पाकिटे, पाण्याच्या बाटल्या, सौफ्ट ड्रिंक्स
ह्याचा
दुष्काळग्रसताना हेलीकॉपटर मधून जसा
अन्नपुरवठा
करतात तसा वर्षाव करत ह्या गाड्या
फिरत
होत्या आणि जनता देखील अधाशा सारख्या
उडया
मारत होती.
डोळ्यासमोरचे दृष्य क्षणभर पहिले
व जसा भानावर आलो तसा विचार मनात आला,
आज कुठल्याही धर्माच्या प्रार्थना स्थळी
एवढी गर्दी दिवसभरात
झाली नसेल.
हे
अभिनेते जो पर्यंत चलती आहे तो पर्यंत पृथ्वी वरील देव,
१० वर्षा नंतर ह्या बंगल्याबाहेर कोण फिरकेल का?
तेव्हा चित्र पूर्णतःबदलले असेल
नवा हिरो नवीन देव, नवीन देऊळ. नवीन भक्त.
Happy Birthday to all in बॉलीवूड.
Tuesday, November 6, 2018
दिवाळी
दीन दीन दिवाळी गाई म्हशी ओवाळी...
आली आली दिवाळी,पाहटे काळोखात उठा,
घनश्याम सुंदराने... स्वागत करा दिपावलीचे
आकाश कंदिल लावा,पाटा भोवती रांगोळी काढा
आईकडून,उटणे लाऊन ओवाळून घ्या ,
पायाखाली महिषांसुराला चिरडा,आसुरी आनंद घ्या
गरम पाण्याने स्नान करा,छान छान कपडे करा,
देवाच्या पाया पडा. वडीलधाऱ्याचे आशीर्वाद घ्या,
ताई, माई घरापुढे गेरू सारवा, ठिपक्यांची रांगोळी काढा
घर भर पणत्या लावा,फुलबाजे अनार, भुईचक्राची
लवंगीची, शेजारच्या बाब्या बरोबर मजा लुटा,
एकमेकास शुभेछा द्या.
भूक लागली भूक लागली करीत
फराळाला बसा लाडू, करंजा,अनारसे, शंकरपाळे,
चकली, कडबोळे, शेवेचा स्वाद घ्या,
पोटभरून गोड गोड ढेकर द्या,
चांदोबा ते दीपावली मासिकांची
पेंगत पेंगत पाने चाळा, जेवणाची
वाट पाहत व्यापाराचे डाव टाका,
बिजली, पाणी, मार्केट खरेदी करा,
आलाच कंटाळा तर सापशिडी खेळा,
नाहीतर आहेच पाच तीन दोन,
किंवा आपला गुलाम चोर.
पाडवा मात्र आई अण्णांचा
आईच्या खुश चेहऱ्याचा
आली भाऊबीज ताई, माई,शिलाला,
आईनेच दिलेली ओवाळणी हसत मुखाने करा,
लाडूचा घास विसरू नका, संपली दिवाळी
आली तशी गेली दिवाळी,संपली सुट्टी.
घरचा अभ्यास पूर्ण करा,
दर दिवाळीची ही कहाणी,
कंटाळा कधी न आला.
स्मरणात मात्र आठवणीचा दीप कायम तेवत राहिला.
दीन दीन दिवाळी गाई म्हशी ओवाळी...
Thursday, November 1, 2018
देवांना देखील मरण असते.
देवांना देखील मरण असते.
३० नव्हेंबर २०१८
५:३० ला tv ऑन केला,बातमीत प्रसिद्ध संगीतकार गीतकार
श्री. यशवंत देव, देवाघरी गेल्याचे ऐकले. आणखी एक देव (माणूस) गेल्याचे दुखः झाले. श्री यशवंत देव म्हणजे उत्कृष्ठ संगीतकार,उत्कृष्ठ गीतकार उत्कृष्ठ शिक्षक,उत्कृष्ठ निवेदक,उत्कृष्ठ विडम्बनकार, आणि बरेच काही उत्कृष्ठ ...
एक अमुल्य संगीत खजाना सोडून गेले. वयाच्या केवळ ८ व्यावर्षी सतार वाजवायचे शिक्षण न घेता केवळ वडिलांना वाजवताना पाहून पहिल्यानेच रेडीओवर जो वाजवतो व वाह वाह मिळवतो तो देव माणूसच असला पाहिजे. ज्या माणसास नोकरी देखील मिळते ती देखील ‘आकाशवाणीत’
तो देव माणूसच असला पाहिजे.
दिवस तुझे फुलायचे...तुझे गीत गाण्यासाठी ...शुक्र तारा...मन पिसाट...अशी अवीट गोडवा असलेली अनेक भावगीते संगीतबद्ध करतो तो देव माणूसच असला पाहिजे. ह्या देव माणसाचे पहिले वहिले सिनेमातील गाणे ‘तू नजरेने हो म्हटले ..’पण आजही बर्याच जणांच्या ओठावर असते, ज्या माणसास लता बाईनी म्हटलेल्या श्री गणेश आरती शेवटी मंत्र पुष्पांजली म्हणावयास आमंत्रित केले जाते तो देव माणूसच. ओशो उवाच ‘समोर आलेल्या क्षणा पुरते जगणे’ हा देव माणूस पूर्णपणे अंगीकारून होता.एका मुलाखतील त्यांचे एक वाक्य जीवनाचे मर्म सांगून जाते,
‘हातावर एक वेळ धन रेषा नसली तरी हरकत नाही,
पण ओठावर स्मित रेषा मात्र कायम ठेवा’
अशा देव माणसास कधीही मरण नसते.
श्री. यशवंत देव तुम्ही अमर रहाल.
Subscribe to:
Posts (Atom)
चाफा आणि सोनटक्क्याचेअबोल प्रेम
मी पाहिलंय ते अबोल प्रेम, ते देखील दुतर्फी, विचार करा १ नाही तर ५ वर्षे त्याचे रोज तिच्या बाकावर नियमितपणे ती यावयाच्या पूर्वीच हळुवा...
-
एकाच वेळीस मनात भिर भिरणार्या विचारांची वावटळ, १) जो आला तो आपला जो गेला तोही आपला आलेला ही चांगला गेला तो ही चांगला दृष्टीकोन मात्र अ...
-
मी पाहिलेला अनभिषिक्त राजा जे जे मध्ये १९६२ मध्ये प्रवेश करून २/३ महिने गेल्यावर वर्गातील सर्व मुलांची एकमेका सोबत ओळख झाली होती. माझी क...
-
आला, आला आला वारा! सोसाट्याचा वारा !! ताड नाही पडला माड नाही पडला नारळ नाही हल्ला...अरेरे छत्रपतींचा 35 फुटांचा पुतळा मात्र पाडून ग...