Tuesday, February 11, 2020

शंभर

शभंर

१८ जुलै १९९८
ओळख लेखाने(?) स्वतःची ओळख
करून दिली,तेव्हां वाटले देखील नाही
की, मी १०० कागद भरून काढेन.
एक १०० पानी वही भरली
माझ्या वेड्या वाकड्या विचारानि?
विचारू नकात किती जणांनी वाचली?
कोणी वाचो की न वाचो, लिहिण्या 
पाठीमागील उद्देश हा लोकांनी वाचावे नव्हताच
किंवा कोणी वाचून कौतुक करावे,
हि शंभर पाने म्हणजे माझ्या डोक्यात 
वेळोवेळी गरगरणारे विचार, ते डोक्यातून
कागदावर, कागदावरून संग्रही राहावे म्हणून
ब्लॉगवर ह्यातून बोधप्रय घ्यावे असे काही नाही. 
कोणी अभिप्राय द्यावे हि अपेक्षा हि केली नाही. 
अधिक लोकांनी वाचावे ह्या करिता फेसबुक वर 
जाहिरातही नाही केली. आपले हसे आपणच पाहावे 
नाही ह्सावे  त्याचे प्रदर्शन करावेसे हि नाही वाटले

आज पर्यंत १०० हा आकडा क्रिकेट बोर्डावर. नोटेवर, 
पाहिलाय एरवी शाळेपासून तो रेषेच्या खालीच पाहिलाय.
पण अलीकडेच मला १००/१०० मिळाल्याचा आनंद 
मिळालाय,नाही झालाय.


ह्या जुलै महिन्यात मी जे जे  त एक सहायकं शिक्षक 
म्हणून बोलावला गेलो.माझ्यावर २१ मुलांची जबाबदारी 
दिली गेली.२ एक महिन्यात ती संख्या १२ वर ढासळली. 
काही मुले सोडून गेली काहींनीबहिष्कार टाकला व काहींनी 
माझ्या पेक्षा दुसरे साहायक बरे म्हणून त्यांच्या वर्गात 
जाणे पसंद केले.
ऑक्टोबर महिन्यात माझ्या वर्गात ६ मुली
२ मुलगे असे एकूण ८ विद्यार्थी उरले, ज्याना 
माझे मार्गदर्शन योग्य वाटत असावे.
शेवटचे हे महिने म्हणजे वार्षिक प्रदर्शनाची
तयारी. आपले काम ह्या प्रदर्शनात लागावे हि प्रत्येक 
विद्यार्ह्याची इर्षा त्या साठी सर्व झटून कामास लागतात, 
त्या साठी माझ्या ८ विद्यार्थ्यांनी देखील झटून कामे केली.
प्रदर्शनासाठी एकूण ५४ विद्यार्थ्यांनी कामे निवडीसाठी
जमा केली. त्यातील ३७ कामे निवडली गेली. 
माझ्या ८ हि विद्यार्थ्यांची कामे निवडली गेली 
म्हणजेच मी १००% नि उतीर्ण झालो. 
योगा योगाने हे माझ्या १०० व्या लेखाबरोबर व्हावे,
हा मात्र माझ्यासाठी,‘सम समा संयोग कि जाहला’.
अर्थात ह्यात विद्यार्थ्याचा वाटा सिंहाचा.

माझ्या अनुभवाच्या विद्यार्जनाचे सार्थक झाले 
हे माझ्याकरिता मनपूर्वक नाही
१००% समाधान.

Thursday, January 30, 2020

ह्याला जीवन ऐसे नाव





 गेल्या पंधरवड्यात कॉलेज मधील वर्गातील
एक मित्र व एक मैत्रीण गेल्याचे फोन वर
कळले. मेंदू सररर करून वर्गात जाऊन बसला, 
सर्व वर्गात नजर फिरली व गेलेल्या 
मित्राच्या जागेवर खिळली,. अर्थात त्याबरोबर 
घालविल्या दिवसांची आठवणही उजाळली. 
बातमी आलेली मैत्रीण खूप हुशार होती.
ह्या बातम्या आता अंगवळणी झाल्या होत्या,

ह्या वरून मनात एक वावटळ  उठली.
वेग वेगळ्या वयात येणाऱ्या बातम्यांचे महत्व, 
स्वरूप त्याच वयात कळण्या सारखे असते

वय वर्षे ५/६ 
झाली कि अवती भवतीच्या
ह्या वयात आपल्याला वाढदिवसाच्या बातम्या 
कानावर येतात आज बबनचां
वाढदिवस उद्या चिंगीचा... आनंडी आनंद  

वय १० ते १५...
आर्या पहिली आली, विनोद ला ९०%
आशीर्वादला विज्ञान शाखेत प्रवेश मिळाला,
मालिनी चे अरंगेत्रम शुक्रवारी... 
आपले काय प्रश्न?

१६ ते २०...

देव आनंदचा ‘काला बाझार,’ मेकांनाज गोल्ड 
कसला तुफान, हिच्कोक भन्नाट डिरेक्टर,
नौशादने कसले म्युझिक दिलय यार...
अशोक इन्जिनिअरिन्गला गेला...
अनिल मेडिकलला जायचे म्हणतोय...
आपले काय... प्रश्न?
 २२ ते २५...
 शिला, राम जेठमलानी बरोबर काम करते,
निर्मला मास्टर्स करायला यु एसला
गेली, वाडकरांचा सुरेष शिक्षण सोडून
गातो म्हणे,गणेशचे लग्न ठरलय,
रघु आणि मैना पळून गेले...
आपले काय... प्रश्न?

२५ ते ३०...
सन्नी, मोहन,गंगा... जवळजवळ
सर्वांची लग्न झाली, आशुतोष नेहमीच
सर्वापुढे त्याला दोन लेकरे आहेत आणि
बंगळूर मध्ये स्थायिक देखील झाला...
आपले काय... प्रश्न?

 ३५ ते ४५,,,
 किशनचा वरूण लार्सेन मध्ये लागला,
जामसंडेकर अमेरिकेत सेटल झाला,
परवा गौरीच्या मुलीचे लग्न खांडेकरच्या
मुलाशी ठरले, राघव च्या पार्टीत कसली 
धमाल केली, जुन्या आठवणी गप्पाना उत
आला पहाटेचे ३ वाजले... बापटची आई वारली, 
सारंग चे वडील १५ दिवसापूर्वी गेले...
आपले काय... प्रश्न?

 ५० ते ६०...
 साठेला प्यारेलेसीस झाला उजवी बाजू
कामातून गेली, काशीला डायाबेटीसने
फुल ग्रासलेय, हरीश आता मोदीचा
टेक्निकल सल्लागार झालाय वट वाढली 
लेकाचे करून करून भागले आणि...
वृंदा, भारत भारतात परतले 
पुण्यात सेटलझाले,शामच्या 
मुलाने आई बापाला केसरी 
मधून जग फिरवले
६५ ते ७५...
आपले काय... प्रश्न?
मधुकर गेला...हरीचे पण खरे नाही
शालिनी शिव गेल्या पासून एकटी पडली
घनश्याम वृद्धाश्रमात राहायला गेला,
मंदाकिनी मंदारचा आजार काढून थकलीय...
आपले काय... प्रश्न?
आतापर्यंत तरी आल वेल...! उत्तर.

अशा ह्या वयोपरत्वे बातम्या माझ्या
कानावर पडत गेल्या व त्यांचे ह्या 
वावटळीत शब्दांकन करावेसे वाटले.

ह्यालाच जीवन ऐसे नाव...











     












Sunday, January 5, 2020

आज थोडे उसने-



परवा संध्याकाळी whats app ची रिंग वाज ली पण दुसर्या कशात गुंतलो असल्या कारणाने
सवयी प्रमाणे झोपण्या पूर्वी सर्व मेसेजीस वाचत असता एका काव्य प्रेमी मित्राने वि.दा. ची
मी विसरलेली कविता  नव वर्ष शुभेच्छा म्हणून पाठवली.  तुम्ही सर्वांनी वाचली देखील असेल
तरी पुन्हा इथे प्रस्तुत करावीशी वाटली.तुम्हालाही वि.दा. ची शिकवण उपयोगी पडेल.




Tuesday, December 31, 2019

२०२०


१९
संपले,
२० लागले.
वर्षभरात तसे काही नवे नाही घडले
मागील पानावरून पुढे चालू असेच
हे वर्ष गेले. पुन्हा एकदा तुम्हा सर्व
मित्र परीवारास सुसंदेश
नवे आकाश,
नव्या उमेदीने
नव्या जोमाने,
नव्या विचाराने
घ्या उंच भारारी
आणि करा आकांक्षा
पुढे गगन  ठेंगणे.

लागणारे २० वे वर्ष
तुम्हा सर्वांस सुखाचे आन्दाचे
व भरभराटीचे जाओ.

  


Monday, December 9, 2019

७५


एका झुळके सारखी गेली
ही सत्तरावर पाच,
केले बरे काय?
म्हंटले तर बरेच काही
म्हंटले तर काहीच नाही.
केलेल्या बद्दल काय बोलायचे
स्वतःची टिमकी 
स्वतःच वाजवायची?पटले कधीच नाही.
७५ री करताना
खंत मात्र काही नाही,
मिळाले  फक्त आणि फक्त
 मा  धा  
बरयांच जणानी घासलेले गाणे
माझ्या बाबतीत देखील...
“मै जिन्दगी का साथ निभाता चला
“मै फिक्र को धूवे मे उडाता चला गया” 
... खरे ठरेल.

Wednesday, December 4, 2019

नशा

४ वर्षांपूर्वी लिहिलेला ब्लॉग मी पुन्हा पब्लिश करतोयआजही योग्य पेक्षा वाढत्या व्यसनाचे वाढते परिणाम आपल्याला रोजच ऐकायला मिळतात म्हणून, पुन्हा एकदा स्वीकार करा.


 व्यसन लागले  

Two teenagers drown in Tapi River while taking a selfie.

Taking a selfie turns tragic at Bandra; girl, rescuer feared drowned.



विसरती जग भोवतालचे
हाती स्मार्ट फोन घेउनी
झाली युवा पिढी व्यसनी.
करावयाचे काय ग्रंथालय,
गरज काय ह्या मैदानांची
वाचन लेखन संगीत खेळ कुद
सर्व काही मिळते ह्या फोनवरी

कशा 
वेळ  फुकट घालवावा
संगीताच्या मैफिलीना
असता कानी स्मार्ट फोन! 

चुकून कधी भेटले चार मित्र
असले एकत्र तरी  
नाही हशा, नाही सम्भाषण 
विसरुनी भाषा मैत्रीची,
अवगतली मूक भाषा    
एकत्र आहोत आम्ही शरीराने!
करावयाची काय दुसरी भाषा

रोग हा सांसर्गिक पसरला
वणव्या परी,न सुटले पादचारी,
न वाहनचालक, आई,बाबा,
मामा,मावशी,अडकली कामवाली या पाशात  

प्रश्न भेडसावी एकच,
'विज्ञान संशोधन' लिहील का 
ह्या भूतलाचा अंत?

Monday, December 2, 2019

वावटळ ६


वावटळ ६

मुंबईत काय करायचे हो
ट्राफिक पोलीस?
हात दाखवून अवलक्षण?
मनमानी आता वाहनवाल्यांची,
तशीच ती पादचाऱ्यांची.
आपुल्या सोयीने कोणीही
हात दाखवून थांबवीत वाहने
प्रवहाच्या विरुद्ध कसे हि कोठेही
चालती वाहने, दुचाकी वर बसती चार चार
शिटी वाजुवूनी थकती हवालदार ,
कंटाळुनी सोडूनी देती,दमूनी 
पकडा पकडीचा खेळून खेळ 
करती काणाडोळा म्हणती मनात
मरा लेकांनो नशीब तुमचे,
गरज काय आता त्या खाबांची 
लाल हिरव्या नारंगी दिव्यांची?
मुंबई कोणाची ?
ना तुझी, ना माझी,
ना भैयाची, ना भागवानची,
ना मियांची ना बेगमची,
ना आंटीची ना अंकलची
ना पार्श्यांची ना गुजरात्याची
ना मद्राष्याची, ना कानडयाची,
मग मुंबई कोणाची? कोणाची?
महाराष्ट्राची? मराठ्याची ?छे!छे!
बळकावली तीस अंबानी अडानीने,
बसली पाहत मराठी जनता
आ वासोनी होऊनी, त्यांची दास.
भंगले  स्वप्न मराठी जनतेचे,
भारताचे, आता अंबानी, अडानी
झाले माई,बाप.

  







खुर्ची

  खुर्ची ऑफिसमध्ये एकदा एकटाच बसलो होतो. समोर माझी खुर्ची होती. रोजचीच. अनेक वर्षे वापरलेली. त्या दिवशी मात्र पहिल्यांदाच तिच्याकडे नीट...