Monday, May 18, 2020

”डीलिट ”

 

 

 

 ”डीलिट ”

 

 

आमचा शेजारचा नातू अर्जुन

 आमच्याकडे सवयी प्रमाणे येऊन बसला होता 

माझ्याशी बडबड चालूअसताना अंजलीने त्याला विचारले

“अर्जुना आजी कुठे बाहेर गेलीय का रे?”

एक सेकंद विचार करून म्हणाला

आजीचा मामा paased away so she has gone there’

 Anjali: I knew him

Arjun: you have his number/

Anjali: No

Arjun: You deleted?

A quick reaction from him surprised us,

त्याला म्हणयचे होते कि तो (मामा) वारला कळल्यावर

तू लगेच नंबर डिलीट देखील केलास?

हे चिमखडे बोल बरेच काही सांगून गेले.

एखाद्यास देवाज्ञा होणे म्हणजेच

 पृथ्वी वरून त्याचे  डिलीट होणे,

 काल इरफान खान सारखा प्रतिभावंत कलाकार /

अभिनेता डिलीट झाला आणि

आज लाखो दिलोंकी धडकन ऋषी कपूर डिलिट झाला.

कोरोना महामारीत आता असंख्य डीलीट होतील.

 ह्यापुढे ‘ डी’ म्हणजे पृथ्वीवरून

माणसाचे अस्तित्व संपणे.  

काही दिवसातच एखाद्याचे मरण

म्हणजे “अरे कालच अशोक डिलीट झाला”

 एका नवीन वाक्प्रचाराचा पायंडा पडेल.

आमच्या छोट्या अर्जुनाला मात्र त्याचा मागमूसही नसेल.

आता जेव्हां जेव्हां मी डीलीट

प्रेस करेन तेव्हा मी गेल्यावर मित्र  म्हणतील 

"डिलीट" झाला बिचारा.


*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर  उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आलेमेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.


Monday, April 20, 2020

गोड गोड गुपित


सारे जग हादरून गेलेय
कोरोना व्हायरसने.
गाला प्रथमच कुलूप
लागले.
अथक प्रयत्नाने देखील 
कुठल्याही देशाला आज पर्यंत 
ह्या कुलुपाची चावी बनविण्यास
यश आले नाही.
एकाहून एक महान देश थकले
ज्याची ओरिजिनल चावीच
कोणी पहिली नाही त्यांना
डूप्लीकेट कशी बनवता येणार.
काय सांगावे,बनवतील देखील.


असो,
लहान तोंडी मोठा घास!
“घरातील टीव्ही लाऊ नका.”
त्यावरील मृतांची व इतर आकडेमोड  
आणि रोज मरे त्याला कोण रडे असा  
लोकांचा स्वैराचार पहिला तर
उगाचच धडकी भरते.
जमल्यास, ती वेळ आपआपल्या
आवडी नुसार सत्कारणी लावा.
असे रिकामे दिवस पुन्हा येणे नाहीत.

काल मी नेटवर फेरी मारत असतांना
आपले लाडके कवी मंगेश पाडगावकरांच्या
चार ओळी सापडल्या बघा
तुम्हाला आवडतात का?

१ ‘ प्रत्येकाच्या मनात एक  
गोड गोड गुपित असत,
दरवळणारे अत्तर जस
इवल्याश्या कुपीत असते. ‘

२ करून करून हिशोब धूर्त
खूप काही मिळेल
पण फुल का फुलत
हे कसे कळेल?

३ कोऱ्या कोऱ्या कागदावर
असल जरी छापल,
ओठावर आल्याखेरीज
गाण नसत आपल

आणि मला आवडलेल्या
चार ओळी
“ सांगा कस जगायचं
कण्हत कण्हत की गाण
म्हणत तुम्हीच ठरवा."

अफाट साहित्याचा समुद्र
आपली अनमोल ठेव  

मराठी  साहित्य  समुद्रातील    
मी एक ओंजळ भर जरी साहित्य 
वाचले तरी आयुष्याचे सार्थक
झाल्याचे समाधान  मला लाभेल.
  





Thursday, April 2, 2020

काळ


वेळ, 
ज्याला लागत नाही
ह्याला कधी कोठेही कोणीही प्रवेश
नाकारू शकत नाही,
सांगून ह्याचे येणे
फार क्वचितच,  
मन मानेल तेव्हां
एकाच वेळेस अनेक जागी
फक्त हाच जाऊ शकतो,
ह्याच्या डायरीचा हिशोब
लागणे कठीण, त्याच्या
मनात आले कि तो हजर,
त्याला अनेक रूपे
कुठले रूप घेऊन
तो समोर कधी उभा ठाकेल
आज पर्यंत कोणी सांगू
शकले,
शकणार,
नाही.
त्याला देश
नाही वेश नाही,
रंग रूप तो ठरवेल तेच
तो आपली भेटीची वेळ स्वतः ठरवितो.
एका लाटेत शेकडो,हजारो, लाखो
तो बासरीवाल्या सारखा
एकाच वेळेस घेऊन जातो.
सध्या कोरोना या नावाने जगात
त्याने धुमाकूळ घातलाय.
आज मितीस त्याने ५००००
लोकांना आपल्या सदनात नेले आहे.
त्याला कसा थांबवावा ह्याचे उत्तर
काही सापडत नाहीय, मनुष्यप्राणी 
काकुळतीला आलाय.
त्याचे थैमान तोच थांबवेल.
तो पर्यंत कितीना आपले सदन
दाखवेल हे देखील त्यालाच माहित.
आता केवळ त्याच्या कलाने घेणे
घरात बसून त्याच्या दृष्टीस न पडणे
हाच उपाय.
घरात राहाल तर 
सुखरूप रहाल,
Home safe Home.


Sunday, March 15, 2020

तारांबळ/करूया वंदन




झाली सुरवात जानेवारीत 
गेले पूर्ण जग हादरून 
एका वायरस कोरोनाने
महा मारीत केली गणती स्वतःची 

कोरोना आला कोठून ?
सर्व नजरा चीन कडे
खोकून शिंकून
हा हा हाकार उडाला
बघताबघता पसरला
जग व्यापून बसला
कधी जाणार? नाही माहित  .


शाळा बंद... बरे झाले!
मॉल बंद... आता कुठे फिरायचे?
होटेल बंद... ब्रह्मचार्यांचे काय?
कॉलेज बंद ,,, भेटायचे कुठे?
बसेस बंद ... नका हो करू 
विमाने बंद ... देस भी नाही परदेस भी नाही
झाले दळण वळण बंद ...
कधी उघडणार?  नाही माहित

क्रिकेट बंद... 
टेनिस बंद.
फुटबॉल बंद ...
खेळ कुदच  बंद
व्यायाम बंद .
कधी उघडणार? नाही माहित 


लग्न समारंभ बंद 
मोर्चे बद,, सभा बंद ... 
भाषण बंद .घोषणा बंदव... 
बोलतीच  बंद झाली की?
कधी उघडणार? नाही माहित

गाव बंद शहर बंद  
झाले राज्यही बंद.
कधी उघडणार? नाही माहित

चीन बंद अमेरिका, स्पेन, जपान, इटाली 
अखं युरोप, सर्व जग बंद.?,,,
तुम्ही येऊ नकात 
आम्ही पण नाही येणार
पर्यटन बंद !
कधी उघडणार?नाही माहित

कोरोनाला नाही करुणा  
मनुष्य हानी करीत राहिला
यमदेव देखील थकला!

थकले नाहीत इस्पीतळातील
सेवक. सेविका आणि डॉक्टर

त्यांना करूया वंदन



  
.
   

Friday, March 13, 2020

पुन्हा एकदा उसने


पुन्हा एकदा उसने.

अलीकडेच मराठी भाषा दिवस साजरा झाला.
महाराष्ट्रातील सर्व शाळा मधून इयता १० वी पर्यंत
मराठी सक्तीचे केले ऐकून खरोखरीच आनद झाला.

मराठी वांग्मय अथांग सागर
त्या साठी घ्यावे तेव्हढे जन्म थोडेच,
माझ्या सारख्या अशिक्षित माणसाला
हे आकलन होई पर्यंत आयुष्याची चांगली
७५ वर्षे सरली. ह्या भाषेच्या सागरात थोडे जरी हात पाय मारले
असते तर कमीत कमी किनाऱ्याच्या
आस पास राहून तरी पोहता आले असते,

आता ७५ व्या वर्षी हि अक्कल सुचली व नियमाने
१ तास तरी भाषे च्या सागरात बुडी मारून अंग
ओले करतो व सुखावतो.

आज ठरविल्या प्रमाणे बुडी मारली  आणि हाती
बा भ बोरकरांचे जीवनाचे सार आले.


जीवन त्यांना कळले हो

मी पण ज्यांचे पक्व फळापरी
सहज पणाने  गळले हो 
जीवन त्यांना कळले हो 

जळापरी मन निर्मळ ज्यांचे ,
गेले तेथे मिळले हो 
चराचरांचे होऊनि जीवन 
स्नेहासम पाजळले 
जीवन त्यांना कळले हो 

सिंधूसम हृदयात जयांच्या 
रस सगळे आकळले हो 
आपत्काली अन दीनांवर 
घन होऊनी जे वळले हो
जीवन त्यांना कळले हो 

दूरित जयांच्या दर्शनमात्रे 
मोहित होऊन जळले हो 
पुण्य जयांच्या उजवाडाने 
फुलले अन परिमळले हो 
जीवन त्यांना कळले हो

आत्मदळाने नक्षत्रांचे वैभव 
ज्यांनी तुळीले हो 
सायासाविण ब्रम्ह सनातन 
उरींचे ज्यां आढळले हो 
जीवन त्यांना कळले हो

                 बा. भ.  बोरकर  


Saturday, February 29, 2020

दुसरी पाटी.


दुसरी पाटी.                                            *


६/७ वर्षाचा होतो, इयता  दुसरीत प्रवेश घेतला तेव्हां,दप्तरात एक पाटी, दुधी पेन्सील , अंकल्पी, मधल्या सुट्टीतील खाऊचा डब्बा. प्रार्थना झाल्यावर आम्हाला, आमच्या वर्ग शिक्षिका तेलंग बाई पहिल्या मजल्यावरील वर्गात रांगेतून घेऊन जायच्या. तेलंग बाईंच्या हातात लाकडी फुटपट्टी असायची ती त्या फक्त खोडकर मुलांवर डोळे मोठे करून  नुसत्या उगारायच्या. पट्टीचा वापर मात्र कधी नाही झाला.
त्या वयात गम्मत म्हणजे मला कुठलीही गोल वस्तू दिसली कि तेलंग बाई आठवायच्या, तेलंगबाई गोल,  गुलाबी गोऱ्या, सफेद साडीतच असत. (मोठा झाल्यावर समजले त्या विधवा होत्या.) वर्गात आल्याबरोबर सर्व मुलांचा ' बाई नमस्ते' चा कोरस व्हावयाचा, मग बाई पटीनेच खाली बसावयाची खुण करीत. त्यांनंतर 'मुलानो पाटी काढा' चा आदेश सुटायचा.
व बाई फळ्यावर लिहावयास लागायच्या ' बे चा पाढा, तीन चापाढा' मग  आम्ही मुले आप आपल्या  पाटीवर उतरवीत असू,
मला ह्या कृतीचा मोठा कंटाळा असे. एक तर मला पाटीवर दुधी पेन्सिल ने लिहिताना येणारा कर्कश आवाजाने अंगावर कांटा उभा राहायचा, माझे उतरवून होई पर्यंत फळा पुसला जाई,थोड्या दिवसात अंकाल्पित हेच पाढे असतात मग बाई फळ्यावर कशासाठी लिहायच्या? बरे व्हायचे काय कि पाटीला दोनच बाजू त्यामुळे भाषेच्या तासाला पाटी पुसावीच लागायची. काही मुलांकडे डबलपाटी असायची त्यामुळे त्यांना सोयीस्कर पडायचे. पण रोज पाटी न्यावी तर लागायचीच.इयता ३ रीत  पाटी गेली आणि वहीआली ती देखील चार ओळींची,अक्ष्रर वळणदार व्हावे म्हणून.
असो, मग पुन्हा पाटी पहिली ती माझ्या मुलांना कोणी भेट दिलेली.

माझ्या ७५व्या वाढदिवसाला प्रियाने, (माझ्या मुलीने,)माझी दुसरी पाटी भेट म्हणून दिली पण ही पाटी पहिल्या  पाटी सारखी नाही. कम्प्युटराईजड आहे हो आता घरा घरातून हि पाटी दिसेल तिला नोट प्याड.स्लेट,अशी नावे आहेत.
आता भेट मिळालेल्या पाटीवर मी चक्क पेंटीगस करू शकतो. अहो त्यात असलेल्या प्रोक्रीएट सौफटवेर मुळे कॅनव्हास वर  करू एवढी सुंदर पेंटिंगस होतात.
माझा वेळ ह्या पाटी मुळे उत्तम  चाललाय रोज दिवसातून मनाला स्वैर सोडून २/३ पेंटिंगस करण्याचा अवर्णीनिय आनद मी घेत आहे .
पेंटिंगस होतात छान, पण...
जो आनंद कॅनव्हास वर कुंचल्याने रंगाचे फराटे मारण्यात, रंगाने हात माख्ण्य्यात  मिळतो तो ह्या पाटीत नाही. मग कधीतरी हळूच पेपर/ कॅनव्हास काढून रंगवण्याची मज्जा लुटल्या शिवाय रहावत नाही,
जुने तेच सोने’
हे मनोमनि मान्य करावेच लागते,

*नवीन पाटीवर केलेले पेंटिंग.



Tuesday, February 11, 2020

शंभर

शभंर

१८ जुलै १९९८
ओळख लेखाने(?) स्वतःची ओळख
करून दिली,तेव्हां वाटले देखील नाही
की, मी १०० कागद भरून काढेन.
एक १०० पानी वही भरली
माझ्या वेड्या वाकड्या विचारानि?
विचारू नकात किती जणांनी वाचली?
कोणी वाचो की न वाचो, लिहिण्या 
पाठीमागील उद्देश हा लोकांनी वाचावे नव्हताच
किंवा कोणी वाचून कौतुक करावे,
हि शंभर पाने म्हणजे माझ्या डोक्यात 
वेळोवेळी गरगरणारे विचार, ते डोक्यातून
कागदावर, कागदावरून संग्रही राहावे म्हणून
ब्लॉगवर ह्यातून बोधप्रय घ्यावे असे काही नाही. 
कोणी अभिप्राय द्यावे हि अपेक्षा हि केली नाही. 
अधिक लोकांनी वाचावे ह्या करिता फेसबुक वर 
जाहिरातही नाही केली. आपले हसे आपणच पाहावे 
नाही ह्सावे  त्याचे प्रदर्शन करावेसे हि नाही वाटले

आज पर्यंत १०० हा आकडा क्रिकेट बोर्डावर. नोटेवर, 
पाहिलाय एरवी शाळेपासून तो रेषेच्या खालीच पाहिलाय.
पण अलीकडेच मला १००/१०० मिळाल्याचा आनंद 
मिळालाय,नाही झालाय.


ह्या जुलै महिन्यात मी जे जे  त एक सहायकं शिक्षक 
म्हणून बोलावला गेलो.माझ्यावर २१ मुलांची जबाबदारी 
दिली गेली.२ एक महिन्यात ती संख्या १२ वर ढासळली. 
काही मुले सोडून गेली काहींनीबहिष्कार टाकला व काहींनी 
माझ्या पेक्षा दुसरे साहायक बरे म्हणून त्यांच्या वर्गात 
जाणे पसंद केले.
ऑक्टोबर महिन्यात माझ्या वर्गात ६ मुली
२ मुलगे असे एकूण ८ विद्यार्थी उरले, ज्याना 
माझे मार्गदर्शन योग्य वाटत असावे.
शेवटचे हे महिने म्हणजे वार्षिक प्रदर्शनाची
तयारी. आपले काम ह्या प्रदर्शनात लागावे हि प्रत्येक 
विद्यार्ह्याची इर्षा त्या साठी सर्व झटून कामास लागतात, 
त्या साठी माझ्या ८ विद्यार्थ्यांनी देखील झटून कामे केली.
प्रदर्शनासाठी एकूण ५४ विद्यार्थ्यांनी कामे निवडीसाठी
जमा केली. त्यातील ३७ कामे निवडली गेली. 
माझ्या ८ हि विद्यार्थ्यांची कामे निवडली गेली 
म्हणजेच मी १००% नि उतीर्ण झालो. 
योगा योगाने हे माझ्या १०० व्या लेखाबरोबर व्हावे,
हा मात्र माझ्यासाठी,‘सम समा संयोग कि जाहला’.
अर्थात ह्यात विद्यार्थ्याचा वाटा सिंहाचा.

माझ्या अनुभवाच्या विद्यार्जनाचे सार्थक झाले 
हे माझ्याकरिता मनपूर्वक नाही
१००% समाधान.

खुर्ची

  खुर्ची ऑफिसमध्ये एकदा एकटाच बसलो होतो. समोर माझी खुर्ची होती. रोजचीच. अनेक वर्षे वापरलेली. त्या दिवशी मात्र पहिल्यांदाच तिच्याकडे नीट...