७ /१0/२३
अंजलीने विचारे अहो २७ नव्वे किती? मी तिचा 'किती?' हा शब्द ऐकण्या आधीच उत्तरलो त्रेचाळीसदोन. क्लिक ... ब्लॉगला विषय मिळाला.माझे २ ते ३० पर्यंत पाढे तोंड पाठ कसे झाले,ह्याचा एक मोठा किस्सा आठवला.
अंजलीने विचारे अहो २७ नव्वे किती? मी तिचा 'किती?' हा शब्द ऐकण्या आधीच उत्तरलो त्रेचाळीसदोन. क्लिक ... ब्लॉगला विषय मिळाला.माझे २ ते ३० पर्यंत पाढे तोंड पाठ कसे झाले,ह्याचा एक मोठा किस्सा आठवला.
आज गुरु पोर्णिमा!
राजारामचा हात आता कायमचा सुटला.
माझ्या मेंदूला 'रिकामपण' माहित नाही,
समोर टी व्ही चालू होता मी शब्दकोडे सोडवीत होतो
कान सर्व आवाज टिपत होते, नेमकी ब्रू कॉफी ची जाहिरात लागली
आणि मेंदूने नेमका ब्रू शब्द पकडला, मग काय त्या शब्दाचे
विच्छेदन सुरु, ब्रू हा शब्द ब+र +ऊ असा तयार झाला असावा
मग तो असाच का लिहितात? ब+रु = बृ असा का लिहित नाहीत
व असा कधी लिहावयाचा?
अब्रू हा शब्द अबरु किंवा अबृ असा का लिहित नाहीत.
ब्र हे अक्षर पाठीत धपाटा घालताना वडीलांच्या तोंडून
ऐकलाय व तारुण्यात ब्र ही कादम्बरी, (कविता महाजन)
वाचली तेव्हां.
विचारांनी ब्र पासून गाडी वळवली.
दृष्टीकोन शब्द.
दृष्टिकोन लिही तो ना लिहितो तोच
पुढचा शब्द नेमका गर्व होता,
झाले मला लगेच त्यावरून
माझ्या मुली बरोबर झालेला संवाद आठवला,
तिचे शिक्षण इंग्रजी माध्यमातले त्यामुळे इंग्रजी
तिची मातृभाषा. त्यात अमेरिकेत २३ वर्षे वास्तव्य.
मी कॉमप्युटर वर माझ्या portfolio चे काम
करत होतो येव्हढ्यात कन्येचा प्रवेश झाला,
त्यानंतर झालेले सम्भाषण,
Priya; hi baba what's up ?
Me; nothing; putting my portfolio in order
P: Why?
Me: I have completed 55 years
so I was thinking of putting some of my work on Instagram for young
professionals to see it.
P: But why? Nobody cares about your old times; they are living today
Save your time.
Instead, write your blog, do your drawings and be happy.
Let the world enjoy your new hobbies.
finishing her dialogue, she walked away
leaving me to ponder her words.
after a few minutes, I said to myself
there is
'SOMETHING TO THINK ABOUT '
immediately I shut my p. c.
प्रियाच्या बोलण्यात तथ्य नक्की होते
काही दिवसाने मला पटलेही.
तात्पर्य: जगण्सायाठी एकच काळ.वर्तमान काळ.
*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आले, मेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.
एकाच वेळीस मनात भिर भिरणार्या विचारांची वावटळ,
१) जो आला तो आपला
जो गेला तोही आपला
आलेला ही चांगला
गेला तो ही चांगला
दृष्टीकोन मात्र असावा चांगला२) एक न सुटणारे कोडे
आपले जवळची व्यक्ती गेल्या नंतरही
३० वर्षे त्या व्यक्तीच्या शोकात माणसे
कां रहातात? मान्य आहे शोक करणे,
पण ते वर्तमान पत्रातून जाहीर
करण्याची गरज कां वाटते?
३) तुझ्याकडे आहे तेच माझ्याकडे असावे कां?
ह्या भावनेने माणसा माणसात चुरस लागली
आणि सुखाची व्याख्या स्पर्धेत होऊ लागली.
४) कळणे
मिळणे
जुळणे
हे तीन शब्द माझ्यासाठी
आयुष्याचे सार सांगतात
बघा विचार करून.
५) एक आणखी जीवन सूत्र
उलट म्हंजे सुलट
सुलट म्हणजे उलट
करण्यास जमले तर
दुनिया पालट.
*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आले, मेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.
मनाला वाटले
तेच मी केले
बागेत टाकले खाटले,
निवांत पडलो त्यावर,
बघत,
ओळखत, सप्तर्षी,धनुर्धारी,बारा राशी,
चंद्राची रासक्रीडा,
अढळ ध्रुव ऐटीत चमकताना
सारे कसे रम्य पण प्रसन्न,
पापण्यांत साठवून हे तारांगण,
शिरलो मी कुशीत गाढ निद्रेच्या,
बरे झाले ऐकले मी मनाचे.
*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आले, मेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.
खुर्ची ऑफिसमध्ये एकदा एकटाच बसलो होतो. समोर माझी खुर्ची होती. रोजचीच. अनेक वर्षे वापरलेली. त्या दिवशी मात्र पहिल्यांदाच तिच्याकडे नीट...