Saturday, November 5, 2022

खचखोळ सप्ताह


सोमवार:

नव, नवीन 

जूने, जुने

हरवले ते कोठे गेले,

सापडेल तरी कोठे?

नाही कळत, कधी उमजेल...

काय हरवले? 

धुंद आठवणीत,

 वेडे मन. हरवून गेले.

मंगळवार:

भिर भिरल्या आठवणी 

काही ठळक काही पुसट 

लहानपणीच्या, 

तुझ्या विजयाचे प्रतिक

माझ्या उजव्या 

हातातील कडे'

सरकवीताना, 

तुझ्या चेहऱ्यावर ओसंडलेला 

तुझ्या 'आनंद' नावाचे सार्थक,

करणारा आनंद 

आजही दिवसातून 

असंख्य वेळा आठवण 

ते कडे वर खाली करताना 

त्या ६२ वर्षा पूर्वीच्या दिवसाची,

आज तुला जाग येऊन 

बरीच वर्षे लोटली सर्व काही विसरून,  

नवा जन्म घेऊन तू आज 

जगाच्या पाठीवर सुखात असशील 

मी मात्र तुझ्या आठवणीत 

मी त्या चिरंतन झोपेची वाट पहात

आजही अडकलोय.

बुधवार :

झाली पहिली ओळख त्याची 

तिच्याशी नजरेने. जवळीक 

वाढली केवळ नजरेच्या भाषेने,

वाचक मात्र ती दोघेच त्यांना

गरज नव्हती शब्दांची.

डोळ्यात वाच माझ्या ...

गुरुवार : 

अबोल प्रेम,

चाफ्याचे आणि सोनटक्याचे

फुलांची अदला बदल 

हेच त्यांचे बोल

एक सुवासिक प्रेम 

अबोलच राहिले. 

शुक्रवार:

तारुण्याची ऐट

औट घटकेची 

बघता बघता 

विश्वसुंदरी देखील 

म्हातारी होते. 

"आज" मिळालेला आनंद 

समजण्या आधीच 

"काल चा " होतो.

वार्धक्य थांबवणे  म्हंजे 

सूर्यास उगविण्या पासून थांबवणे. 

-----------------------------------------

शनीवार:

आयुष्यात काही केले का?

उत्तर नसलेला प्रश्न 

भेडसावू लागलाय 

उत्तर सापडण्यास 

उशीर झालाय का?

नसावा 

नाही नक्कीच,

it's never too late.

-------------------------

रविवार :

शांत मन घेऊन 

डोळे झाकले, 

जाग सकाळी आली 

पुसल्या पाटी सारखी

खच् खोळ विचारांचा खडू, 

सज्ज  झाला 

नव्या आठवड्यासाठी. 


*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर  उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आलेमेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.

 







 

 

Thursday, October 13, 2022

रिकामा न्हावी...

 नुकताच  सूर्योदय होत होता.

आकाशाची लोभनीय लाली पहाताना,

नेहमी सारखी विचारांची वावटळ 

भिर भिरू लागली,थांबली ती एका 

वेड्या विचारावर.

विचार म्हणा किंवा रिकामपण म्हणा.

आज  पर्यंत म्हणजेच गेल्या ७८ वर्षात 

"आपण किती मनुष्य प्राण्यांना भेटलो?"

झाले, लगेच तुंबडया लावण्यास सुरुवात.

१) आसमंत: 

जन्मानंतर पहिली पाहिली घरातील,

बिल्डींग मधली, नात्यातील, घर पोच 

वाण सामान व इतर जीवनापयोगी

घरपोच पोहचवणारे, आस्म्न्तातले 

दुकानदार, मार्केटमधील भाजी,फळ,

मासे,मटण, कोंबडी, व इतर विक्रेते

एकूण अंदाजे ३००+ ह्यातील अर्धे अधिक 

आजही नाव,चेहऱ्या सहित आठवतात.

२). मोंटेसरी ते इयता ४थी.(वय ६ ते ९)

वर्गातील ४०+ इतर वर्गातील कमीत कमी 

४० नावे,चेहरे मी आज हि भेटल्यावर ओळखेन.

३). इयता ५ वी ते ११वी वर्गातील,

शाळेतील इतर, मास्तर, बाई, शिपाई,

मुलांचे आई ,वडील, क्यांटीन, बोरे,आवळे, 

भेल, केळी विक्रेते.अंदाजे ५०० सहज.

४) ११वी स्पेशल गणित क्लास, हिंदी स्पेशल

कोवीद परीक्षे पर्यंत येथे १०० ओळखी.

५) कॉलेजच्या  ५ वर्षात भेटलेला मित्रपरिवार,

गुरुजन, बस, ट्रेन प्रवासातील भेटणारी 

माणसे, 

नोकरीतील ५० वर्षे सहवासातील,

लग्न, सामाजिक समारंभात झालेल्या 

असंख्य भेटी, तंगड्यात तंगडी असलेले 

एकमेकांचे नातेवाईक,शेजार पाजार.

 मित्रपरिवार.ह्या व्यातरिक्त डॉक्टर, वकील, प्लम्बर, 

इलेक्ट्रिशिअन,हॉटेल ओनर्स, वेटर्स, 

समाज सुधारक, राजकारणी, चांभार सुतार,

वगैरे, वगैरे वगैरे,...ह्या सर्वांना नावासहित 

आठवत बसलो, ते दुपारच्या जेवणाची हाक 

येईस्तो आकडा ५००० पर्यंत गेला  , 

माझा वेळ मस्त गेला.

त्याजबरोबर 

रिकामा न्हावी कुडाला तुंबडया लावी 

म्हण सार्थक केली.

(देवाने  पुरुशांना २.७ ग्र्याम मेंदू व स्त्रियांना २.२ग्र्याम)* 
एवढासा मेंदू (५-५ X६.५ X ३ .६से.मी.)
शर्टाच्या खिशा एवढा  
कुठल्याही बाहेरील अधिक जीबीची 
मदत न घेता जगातील सर्वात मोठे
आठवणींचे स्टोरेज स्पेस,  प्रत्येक जीवितास 
भेट दिले आहे.

भगवान तुसी ग्रेट हो. 


  






*The average brain weight of the adult male was 1336 gr; for the adult female, 1198 gr. With increasing age, brain weight decreases by 2.7 gr in males and by 2.2 gr in females per year. Per centimetre body height, brain weight increases independent of sex by an average of about 3.7gr 


*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर  उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आलेमेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.

Tuesday, October 11, 2022

अजरामर

  आज दुपारी मराठी गाणी ऐकायचा मूढ लागला यूट्यूब वर चाळत असता भा. रा तांबे ह्यांच्या कवितान वर नजर गेली व कविता ऐकू लागलो. एका मागे एक ऐकत होतो व ह्या राज कवींच्या विचारांची भिंगरी कशी  फिरत असेल व हे कल्पनाशक्ती बाहेरील काम, त्याही पलीकडे जाऊन हा अमुल्य ठेवा जेव्हां लता,आशा हृदयनाथ उषा मंगेशकरांनी आपल्या स्वर्गीय स्वरान्म्ध्ये  गाऊन आपल्या महाराष्ट्रास जगभरात  ध्रुव स्थान मिळवून दिले आहे. 

भा रा तांबे , कवी अनिल, कुसुमाग्रज, केशव सुत, ग दि मा., मंगेश पाडगावकर,,सुरेश भट्ट,  शांताबाई शेळके, असे असंख्य कवी, महाराष्ट्राचे भूषण असलेले ज्ञानेश्वर. तुकाराम, मुक्ताबाई,असे अनेक संत ह्या सर्वांची सुरेल स्वरात ओळख करून देण्याचे महान कार्य केवळ एका कुटुंबाने पेलले. 'मंगेशकर कुटुंबीय.' माझ्या बुद्धीस अजरामर होणे  म्हणजेच  'मंगेशकर कुटुंबीय 'होणे व ऐकणारे सर्व आम्ही भारावलेले. 

ओळख. 

  • (भास्कर रामचंद्र तांबे (ऑक्टोबर २७१८७३ - डिसेंबर ७१९४१)[१], अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी. ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते. हिंदी काव्य, उर्दू नज़्म आणि गज़ल यांच्याशी झालेला परिचय, तसेच वैदिक परंपरेचे शास्त्रशुद्ध शिक्षण असे संस्कार घेऊन तांबे यांनी मराठी कवितेत विशुद्ध आनंदवादाची मळवाट रुंद केली. ’राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता’ या ग्रंथात त्यांची कविता १९३५ मध्ये प्रकाशित झाली आहे. या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. भा.रा. तांबे यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते)

  • भा रा च्या  काही अविस्मरणीय कविता :

  • कशी काळ नागिणी
  • कळा ज्या लागल्या जीव
  • घट तिचा रिकामा
  • घन तमीं शुक्र बघ
  • जन पळभर म्हणतील हाय हाय
  • डोळे हे जुलमि गडे
  • तिनी सांजा सखे मिळाल्या
  • तुझ्या गळा माझ्या गळा
  • नववधू प्रिया मी बावरतें
  • निजल्या तान्ह्यावरी माउली
  • मधु मागशी माझ्यमावळत्या दिनकरा
  • या बाळांनो या रे या
  • रे हिंदबांधवा थांब 


थोडासा अवसर शोधून आपल्या श्रवण इंद्राना सुखमय अनुभव जरूर द्या, 


*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर  उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आलेमेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.

Wednesday, September 7, 2022

वाढ दिवस


 ३६५ दिवस  गेले उडून भुर्रकन.

८ सप्टेंबर, 

मत माउलीचा जन्मदिवस.

तिच्या वाढदिवसाच्या निमिताने येथे ७ दिवस जत्रा भरते. 
यंदा जत्ना २ वर्षाने भरणार आणि लाडक्या देवीचे दर्शन देखील गर्दीमुळे दर्शन कठिण.  ४४ वर्षाचा दर्शनाचा शिरस्ता मोडून २ दिवस आधी दर्शन घेतले.तिच्या पाय्थ्याशी आमची ४४ वर्षे गेली. 
या वर्षी माउली तुला पाय्थ्यावरून नमस्कार. जगभरात पसरलेल्या महामारीस आता थांबव हीच तुझ्या चरणी प्रार्थना, 
मत माऊलीस वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
आणि आज आमच्या ठाकरे बाबांचा ९८वा वाढदिवस, तुम्हा दोघांना नतमस्तक होऊन शुभेच्छा.

असेच ३६५ दिवस  जातील  उडून भुर्रकन.


Thursday, July 14, 2022

गुरु पोर्णिमा

 



आज गुरु पोर्णिमा!
वर्षातून गुरुचे एकदा दर्शन घेण्याचा दिवस .


गुरु कोणाला म्हणावयाचे?
"आई वडील सर्व प्रथम गुरु" 
त्यानंतर माझे अस्तित्व सुरु
माझ्या अस्तित्वास आकार दिला माझ्या 
शालेय, विद्यालयातील गुरुजनांनी, नंतर
माझ्या आयुष्याच्या टप्प्या टप्प्यावर भेटलेल्या 
अनेक गुरूनी , 
यातील अनेक गुरु आज चंद्राने नेले. 
प्रत्येक गुरुपोर्णिमेस, 
चंद्र अधिक तेजोमय दिसू लागला. 
आता हे विश्वची माझे गुरु.
या विश्वात येणाऱ्या सर्व  गुरुपोर्णिमेस माझा चंद्रास नमस्कार,
मी करतो माझी गुरुपोर्णिमा साकार.


*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर  उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आलेमेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे. 

Thursday, June 30, 2022

एके दिवशी काय झाले !

 एके दिवशी काय झाले !


वाघाची डरकाळी जंगलातील 

इतर वाघांना ऐकू येईनाशी झाली,

वाघ राजा गाय वासरांच्या व  घडाळ्याच्या टीक 

टीकेला भुलला  त्या  मैत्रीत जनतेचा,  

आपल्या सैन्याचा, त्यास विसर पडला, 

जंगलातील इतर वाघांची कुरबुर सुरु झाली 

 सैन्यातील  वाघांना प्रश्न पडला 

आता आपला रक्षणकर्ता राजा कोण?

एवढ्यात एक धीट वाघ पुढे आला  

मित्रानो घाबरू नका ह्यावर बंड हा एकच उपाय 

चला माझ्याबरोबर मी दाखवतो मार्ग,


सेनापती बनून पुकारले त्यांनी वाघांना  

"खरे, सच्चे वाघ" असाल तर  जागे व्हा 

 हे जंगल सोडून या माझ्या मागे,   

त्याच्या  हाकेला होकार देऊन 

आले जंगल सोडून, चाळीस जण   

ओरिसाच्या  जंगलात पोहोचवले सेनापतीने,  

 शब्दास जागून त्यांची योग्य ती बडदास्त

ठेवली.

ह्या जंगलात कमळाने भरलेले 

एक तळे होते त्यातील कमळे पाहून 

वाघ हर्षित झाले आता त्यांची खात्री 

झाली की सेनापती योग्य ठिकाणी 

घेऊन आलाय. त्यांच्या खुशालीचे 

वर्तमान ऐकून एक एक करून 

 चाळीस वाघ जमा झाले.


इथे जंगलच्या राजाला काही सुचेना 

आपली राज गुहा तर्कटपणे सोडून 

कुटुंबीया समवेत  जुन्या स्वगुहेत आला.

घड्याळ व गाय वासरू 

आता राजाचे सांत्वन करू लागले 

पण मनोमनी राजा खिन्न झाला 

मोठ्या गर्वाने वागल्याचा,चुकीचे 

मित्र केल्याचा पश्चाताप झाला,

आता त्याला ध्वज गमविण्याची 

भीती भेडसाऊ लागली 

खोटे अवसान आणून 

कावरा बावरा होऊन तो 

सैन्य गोळा करू लागला 

पण...

"बुंद से गई वो हौद से कैसे आती" 

आता उशीर झाला होता, 

जंगलातील इतर वाघांनी 

आपला नवा नेता निवडला, 

तात्पर्य : 

राज्य चालविताना आपल्या सैन्याचा 

सम्भाळ इतर कोठल्याही संकटापेक्षा महत्वाचा.! 



*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर  उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आलेमेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.

 




Tuesday, May 17, 2022

तुतारी

 

 शाळेत असताना मराठी चा 

तास माझ्या आवडीचा  सुंदर, आल्हाद दायक, 

स्फुरणदायक विचारांच्या, कविता!

शिकवल्या  जात  व  इतर विषयात लक्ष 

न लागणारा मी ह्या तासाला मात्र एकाग्रतेने 

ऐकत असे, नकळत यां शालेय जीवनातील 

बर्याचशा  कविता आज देखील पाठ आहेत..

आज सकाळी जागा झालो ती ह्या  

केशव सुतांच्या तुतारीने. 


एक तुतारी द्या मज आणुनी

फुंकीन जी मी स्वप्राणाने
भेदुनी टाकीन सारी गगने
दीर्घ तिच्या त्या किंकाळीने,
अशी तुतारी द्या मजलागुनि
जुने जाऊ द्या मरणालागुनि
जाळूनी किंवा पुरुनी टाका
सडत न एका ठायी ठाका
सावध ऐका पुढल्या हाका
खांद्यास चला खांदा भिडवूनी
एक तुतारी द्या मज आणुनी
प्राप्तकाल हा विशाल भूधर

सुंदर लेणी तयात खोदा
निजनामे त्या वरती नोंदा
बसुनी का वाढविता मेदा
विक्रम काही करा चला तर
हल्ला करण्या ह्या दंभावर,
ह्या बंडावर
शुरांनो या त्वरा करा रे

समते चा ध्वज उंच धरा रे
नीती ची द्वाही फिरवा रे
तुतारीच्या या सुरा बरोबर

-- केशवसुत 

बघता बघता..

बघता बघता... बघता बघता जुलैचे वीस दिवस संपले. दिवस छोटे झाले... रात्र मोठी झाली... पण घड्याळ मात्र अजूनही चोवीस तासच दाखवत आहे. गेल्या दोन-त...