Sunday, May 28, 2023

'राम' नाहीसा झाला.




१९६२
एका रटाळ १५० मुलांच्या वर्गात, विज्ञान शाखेत १ अपयशी वर्ष घालविल्यानंतर, जे जे च्या सुंदर वास्तूत प्रवेश केला व प्रेमात पडलो. आता हेच आपले देऊळ मानून शिकायचे ठरविले. प्रवेश मिळविणे तसे कठीण गेले,पण वडिलांचा आशीर्वादाने  तेही शक्य झाले.केवळ ४० मुलांना एका वर्गात प्रवेश, एकूण ४वर्ग  सर्व मिळून कमर्शिअलचे १६० विद्यार्थी.   

जेजे कमर्शिअलची इमारत पाहून कोणीही आकर्षित होईल, गेट मधून प्रवेश केल्यावर एक मोठे शिल्प त्या पाठीमागेच उभी असलेली हि एक मजली टुमदार वास्तू.( त्या काळी) प्रवेश मिळवण्यासाठी  त्या काळात  ड्रॉईंग च्या २ परीक्षा आवश्यक होत्या, नशिबाने मी त्या दिल्या होत्या व सीग्रेड मिळवून सर्टिफिकेट मिळवली होती.गेट मधून पाय आत टाकला समोरची वास्तू पाहून आनंद झाला.इमारतीतप्रवेश केला व पहिल्या मजल्यावर असलेल्या डीन श्री.दादा अडारकरांच्या केबिन बाहेर असलेल्या सोफ्यावरआत बोलवण्याची वाट पहात बसलो. काही तासांनी मला दादांनी आत बोलवले माझी सर्टिफिकेट व एस एस सी त लावलेला दिवा पाहून त्यांच्या भुवया उंचावल्या माझ्या चेहऱ्या कडे वरती पाहून नकारारार्थी मान हलवायच्या आधीच मी शिताफीने महान चित्रकार श्री देऊस्कर ह्यांची चिट्ठी पुढे केली. दादांनी माझ्याकडे पहात चिट्ठी उघडली वाचून  म्हणाले ठीक आहे वेटिंग लिस्टवर नाव टाकतो कोण सोडून गेले तर प्रवेश मिळेल मी ठीक म्हणून निराशेनेच घरी आलो. दुसरे दिवशी पुन्हा गेलो वेट लिस्ट  लागली होती व माझे नावही होते,बोर्डाला नमस्कार केला व तळ मजल्यावरील खिडकी खालील फळी वर जाऊन बसलो पाय काही घरी जाण्यास तयार नव्हते, फायनल लिस्ट लागायची होती. कॉलेज चालू असल्याने येणाऱ्या मुलामुलींचे आनंदी चेहरे पाहून मलाही माझ्यात स्फुरण आल्यासारखे वाटले. उगाचच ३ वाजे पर्यंत बसून राहिलो पण सार्थक झाले. लिस्टच्या बोर्ड वर शिपायाने येऊन नवीन फायनल लिस्ट चिकटवली मनातून धावत जाऊन बघावेसे वाटले पण संयम राखून शांतपणे बोर्ड जवळ चालत गेलो फायनल लिस्ट मध्ये माझे नाव दिसले व आनंद गगनात मावेना. मनाशीच ठरविले माझे स्वप्न ध्येय आता पूर्ण होणार. 

कॉलेजचा पहिला दिवस. 

आजही कालच्या प्रसंगा सारखा डोळ्यासमोर सरकला.मी वर्गात प्रवेश केला वर्तुळाकारात डेस्क लावले होते एक दोन मुलगे व मुली बसल्या होत्या. मीही आत शिरलो  कुठं बसावे ह्या विचारात असताना एका मुलाने हात करून शेजारच्या डेस्क कडे हात केला, मी त्या दिशेने गेलो त्याच्या शेजारील रिकाम्या डेस्कच्या बाकड्यावर बसलो, त्या मुलाने स्मित हास्याने स्वागत केले, मुलगा उंच व खूपच शीड शिडीत, हसरा चेहरापाहून मलाही बरे वाटले
 त्याच्यात नावडण्यासारखे काहीच नव्हते. मी बसल्यावर त्यांनी आपली ओळख स्वतःहून करून घेतली मी 'राजाराम भानजी ' व हात पुढे केला माझा हातही पुढे झाला व मी 'अरुण काळे'. ही आमची  
हातमिळवणी काल २५ मे २०२३ ला राजाराम गेल्याचा फोन आला तेव्हां सुटली. तब्बल ६० वर्षे ही मैत्री राहिली कधी आम्ही भांडलो नाही एकमेकाला विसरलो नाही, एक मेकाच्या आयुष्याचे भाग बनून राहिलो यश अपयशाचे दुःख वाटले तसे आनंदाचे क्षण अधिक वाटले. 
प्रत्यक्ष भेटी मात्र राजाराम गेल्या ४/५ वर्षात आजारी पड्ल्याप्सून फोनवर व्हायला लागल्या, पुढे त्याही त्याच्या श्वासाच्या प्रॉब्लेमने कमी झाल्या, शेवटचे बोलणे झाले ते एप्रिल सुरवातीस. 

राजाराम माझा 'मारुती' सारखा भक्त होता. अरुण जे बोलेल तो त्याच्या साठीअखेरचा शब्द. 
त्याला मी कधीही  इतर मित्रां प्रमाणे 'राजा'  हाक नाही मारली माझ्यासाठी तो 'राजाराम.च राहिला. राजाराम एक उत्तम फोटोग्राफर होता पण त्याला मिळावे तेवढे यश काही मिळाले नाही, पण राजारामला त्याचे दुःख कधी वाटले नाही किवां त्यांनी कधी बोलूनहीदाखवले नाही. 

राजारामचा हात आता कायमचा सुटला.



  

 




Saturday, April 22, 2023

स्वप्न?


मला जाग आली तेव्हा मला त्पा रात्री पडलेले स्वप्न आठवले ते गूढ होते; मी एकटाच एका मोठ्या डोंगराकडे चाललो होतो माझ्या वाटेवर मला एक संन्यासी भेटला जो डोंगराच्या पायऱ्या चढत होता. मी हसलो तो परत हसला. त्याचे हसणे मला त्याच्याशी संवाद सुरू करण्यासाठी पुरेसे होते.
नमस्कार, मी मुंबईहून आलोय .
तो: नमस्कार,
मी: या गावाची महती एकुन आलो, या डोंगराच्या माथ्यावर मला शांती मिळेल आणि माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील असे सांगितले. रे आहे का?
संत हसत हसत उत्तरले "शांतता आपल्या प्रत्येका बरोबरच असते. ती अनुभवणे आपल्यावर अवलंबून असते.
जेव्हा संताने मला हा गुरुमंत्र दिला तेव्हा मी माझा प्रवास तिथेच थांबवला.
मी नतमस्तक झालो आणि माझी आंतरिक शांती शोधण्यासाठी मला आशीर्वाद देण्याची विनंती संतांना केली आणि त्यांनी हसून तथास्तु म्हणून ते मार्गक्र्मास लागले.

संतांची दिव्य वाटचाल पाहत, मी जवळच असलेल्या एका, झाडाखाली बसून मी डोळे मिटून ध्यान करू लागलो.
मी माझे डोळे हलके उघडले त्या क्षणी मला आधी भेटलेले संत समोर आले, हसले आणि म्हणाला बेटा तू तुझ्याच विचारात अडकला आहेस. पृथ्वीवरील कोणतेही नाते वाईट नाही तुमचा तो दृष्टीकोन आहे. प्रयत्न करा आणि इतर दृष्टीकोनातून पहा नातं बदलेल. ज्या क्षणी तुम्ही जागे व्हाल त्याच क्षणी, तुम्ही नवीन जगात जाल जिथे प्रत्येकजण तुमच्यावर प्रेम करेल, नेहमी हसत राहा.
आनंदी तणावमुक्त जीवनाची ही गुरुकिल्ली आहे. आनंद घ्या
हे त्याचे शेवटचे शब्द होते .

डोळे उघडले तेव्हा माझा कुत्रा मोती माझे गाल चाटत होता.
स्वत बोललो, नवीन नात्याची सुरुवात दिसते.

हसत हसत मोतीला थोपटले.



Tuesday, April 4, 2023

वर्तमान

                  

    माझ्या मेंदूला 'रिकामपण' माहित नाही,


समोर टी व्ही चालू होता मी शब्दकोडे सोडवीत होतो 

कान सर्व आवाज टिपत होते, नेमकी ब्रू कॉफी ची जाहिरात लागली

आणि मेंदूने नेमका ब्रू शब्द पकडला, मग काय त्या शब्दाचे 

विच्छेदन सुरु, ब्रू  हा शब्द ब+र +ऊ असा तयार झाला असावा 

मग तो असाच का लिहितात?  ब+रु = बृ असा का लिहित नाहीत 

व असा कधी लिहावयाचा? 

अब्रू हा शब्द अबरु किंवा अबृ असा का लिहित नाहीत.

ब्र हे अक्षर पाठीत धपाटा घालताना वडीलांच्या तोंडून 

ऐकलाय व तारुण्यात ब्र ही कादम्बरी, (कविता महाजन)

 वाचली तेव्हां. 

विचारांनी ब्र पासून  गाडी वळवली. 


दृष्टीकोन  शब्द. 

दृष्टिकोन लिही तो ना लिहितो तोच 


पुढचा शब्द नेमका गर्व  होता, 

झाले मला लगेच त्यावरून  

माझ्या  मुली बरोबर झालेला  संवाद आठवला, 

तिचे शिक्षण इंग्रजी माध्यमातले त्यामुळे इंग्रजी 

तिची  मातृभाषा. त्यात अमेरिकेत २३ वर्षे वास्तव्य.

मी कॉमप्युटर वर माझ्या portfolio चे काम  

करत होतो येव्हढ्यात कन्येचा प्रवेश झाला,

त्यानंतर झालेले सम्भाषण,

Priya; hi baba what's up ?

Me; nothing; putting my portfolio in order

P: Why?

Me: I have completed 55 years

so I was thinking of putting some of my work on Instagram for young

professionals to see it.

P: But why? Nobody cares about your old times; they are living today

Save your time.

Instead, write your blog, do your drawings and be happy.

Let the world enjoy your new hobbies.

finishing her dialogue, she walked away

leaving me to ponder her words.

after a few minutes, I said to myself

there is 

'SOMETHING TO THINK ABOUT '

immediately I shut my p. c.

प्रियाच्या बोलण्यात तथ्य नक्की होते 

काही दिवसाने मला पटलेही.

तात्पर्य: जगण्सायाठी एकच काळ.वर्तमान काळ.  




*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर  उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आलेमेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.

 




                 

Wednesday, March 8, 2023

वावटळ

  एकाच वेळीस मनात भिर भिरणार्या विचारांची वावटळ,

१) जो आला तो आपला 

जो गेला तोही आपला 

आलेला ही चांगला 

गेला तो ही चांगला 

दृष्टीकोन मात्र असावा  चांगला

२) एक न सुटणारे कोडे

आपले जवळची व्यक्ती गेल्या नंतरही

३० वर्षे त्या व्यक्तीच्या शोकात माणसे 

कां रहातात? मान्य आहे शोक करणे, 

पण ते वर्तमान पत्रातून जाहीर 

करण्याची गरज कां वाटते? 


३) तुझ्याकडे आहे तेच माझ्याकडे असावे कां?

ह्या भावनेने माणसा माणसात चुरस लागली

आणि सुखाची व्याख्या स्पर्धेत होऊ लागली.

४) कळणे

मिळणे 

जुळणे 

हे तीन शब्द माझ्यासाठी

आयुष्याचे सार सांगतात 

बघा विचार करून.

५) एक आणखी जीवन  सूत्र

उलट म्हंजे सुलट 

सुलट म्हणजे उलट 

करण्यास जमले तर

दुनिया पालट.


*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर  उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आलेमेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.

Wednesday, February 22, 2023

तारांगण

 मनाला वाटले

तेच मी केले 

 बागेत टाकले खाटले,

निवांत पडलो त्यावर,

बघत,


तारांगण लुकलुकताना.

ओळखत, सप्तर्षी,धनुर्धारी,बारा राशी,

 चंद्राची रासक्रीडा,

अढळ ध्रुव ऐटीत चमकताना 

सारे  कसे रम्य पण प्रसन्न,

पापण्यांत साठवून हे तारांगण,

 शिरलो मी कुशीत गाढ निद्रेच्या,


बरे झाले ऐकले मी मनाचे. 


*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर  उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आलेमेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.

   

Tuesday, January 31, 2023

ध्रुवोत्तर

 ध्रुवोत्तर 

प्रश्न पडत होता म्हणून, उत्तर सरसावले, 

प्रश्नाला हात देऊन, त्यांनी त्यास  सावरले 

तेव्हढ्यात कोणीतरी ओरडले

चूक चूक उत्तर चुकतेय, उत्तरांनी दिला हात सोडून,

गेले तिथून निघून.  प्रश्न पुन्हा (बुचकळ्यात) पडला, 

उत्तर काही दृष्टि  पडेना, कोणास उत्तर  सापडेना

शोधा शोध केली सर्व अक्षरांनी, स्वल्प विराम, 

अवतरण,उद्गार,अर्ध विराम 

शोधून शोधून थकले. 

बुचकळ्यातून  प्रश्नाला ना काढू  शकले.

प्रश्न,प्रश्न

बुचकळ्यातून बाहेर येईना,

अन उत्तरीत प्रश्न तसाच राहिला अनुत्तरित

"जीवन म्हणजे काय?"

अक्षरांना बाजूस सारून 

पूर्व,पश्चिम,दक्षिण धावून आले मदतीला,

म्हणाले 'चला शोधूया उत्तरेला' 

लुक लुक लुक्णाऱ्या ध्रुवाने हक मारली

अरे वेड्यांनो, उत्तर माझ्या घरात आहे

सर्व  एक सुरात ओरडले, ठाऊक आहे आम्हाला, 

पण प्र्श्नाच्चे उत्तर कुठाय? माहित आहे काय?"

फारच सोपे आहे उत्तर, हसत,हसत  ध्रुव म्हणाला 

ऐका तर  "जीवन म्हणजे अढळ रहाणे "

कोणी न म्हणावे "उठ " कोणी न म्हणावे "बस"

आपले 'जीवन' ही आपली नौका 

वल्हवा आत्मबळावर, 

आपल्या मर्जीने, पाहिजे त्या दिशेने,

हेच जीवनाचे सार. 





    


 


 

Saturday, January 7, 2023

गुरुदक्षिणा

नव वर्षआरंभ.

आज लागला मुहूर्त. ५ दिवस उलटून गेले. 

३६० राहिले.सवय झालीय आता 

दिवस मोजण्याची.

खास भेट मिळालेल्या घोटीव कागदाच्या 

वहीत सुरवात केली.

माझ्या विद्यार्थीनिची हंपीवरून 

आणलेली भेट.

विद्यार्थ्या कडून भेट घेणे 

माझ्या स्वभावाला न पटण्या सारखे.

तिने देताना सर गुरुदक्षिणा, म्हणून आणलीय.

त्यावरील चित्र पहा, ते पाहून मला तुम्ही दिसलात..

आणि माझ्या खिशाला परवडण्या सारखी होती.

मी काही न बोलता  स्वीकारली.

सर,दुकानात असलेल्या गर्दीत सामील झाले

आणि माझी नजर ह्या छोट्याशा वहिवर पडली,

ते चित्र पाहून तुमच्या वृक्षासारख्या ज्ञानाच्या

सावलीचा  लाभ आम्हाला मिळाला 

म्हणून ही गुरुदक्षिणा समजा.

मी गप्प,


नववर्षाची  सुरवात ह्याहून 

उत्तम होऊच  शकत नाही. 


HAPPY  NEW YEAR EVERYONE



*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर  उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आलेमेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.

 

 

 

खुर्ची

  खुर्ची ऑफिसमध्ये एकदा एकटाच बसलो होतो. समोर माझी खुर्ची होती. रोजचीच. अनेक वर्षे वापरलेली. त्या दिवशी मात्र पहिल्यांदाच तिच्याकडे नीट...