Friday, August 31, 2018

खुर्ची




 खुर्ची
असो लाकडाची पत्र्याची
असो प्लास्टिकची
अथवा दगडाची...
किंमत हिला सिंहासनाची
दिसेल त्याला घाई बळकवायची
बसला जो यावर  तो उठे न केव्हा
वाट पहाणार्या बघ्यांच्या 
झोंबते डोळ्यात ही मिरची सारखी
की सलते मनात काट्यासारखी...?

Thursday, August 30, 2018

आज



अहो
कधीतरी सर्वांनाच
जायचे आहे.आज उद्या परवा
सांगता आले असते तर...
मरणात खरोखर
जग जगले असते
आजची भीती उद्यावर
उद्याची परवावर
अहो जीवनाचे रहस्य
दडले आहे कशात सांगू?
उत्तर अतिशय सोपे
आज आज आणि
आज मध्ये
आलेला आज जगण्यास शिका
हसा हसवा रुसा रुसवा शिका शिकवा
आजच... आणि
लुटा जीवनाचा आनंद आजच.

Tuesday, August 28, 2018

वेळ


कुठेतरी वाचले,

स्वतःला शिस्त लावायची असेल
तर दिवस आखून कामे करावीत
उठावेवेळेवरझोपावेवेळेवरवाचावेवेळेवरजेवावेवेळेवर खेळावेवेळेवरवेळेवरवेळेवरवेळेवरवेळेव

तर म्हणे
ध्येय लवकर साध्य होते
ठरविले पालन करावयाचे 
शाळेत गेल्यासारखे वाटले
दोन दिवस गेल्यावर
शिक्षका शिवाय वर्ग भरलायसे वाटले
वेळेवर काहीच जमेना
तेव्हां म्हंटले नाही जमायचे
समजूत काढली स्वतःची  
वेळेसाठी आपण नसतो.
वेळ आपल्यासाठी असते.
कशावरून?
सांगेन कधीतरी...

Saturday, August 25, 2018

स्वप्ने




हे कसे ? ते कसे?
माझे कसे? तुझे कसे?
तिचे कसे? हिचे कसे?
सर्वांचे कसे? 
हे असेच, ते तसेच
माझे ही असेच 
तुझे ही तसेच
हिचे देखील असेच
तिचे देखील तसेच
सर्वांचे देखील असेच
जेथे पाहावे तेथे असे कसे?

तुझे, माझे,हिचे,त्याचे 

आयुष्य
ही एक मोलाची देणगी
आनंद, प्रेम, दया,
क्षमा, शांतीत 
व्यतीत करा 
आणि  
थांबवा ह्या उठाठेवी. 
अहो, कधी तरी पहा
मोराची पिसे,
रंगीत स्वप्ने
इंद्रधनूची उधळण!


Friday, August 24, 2018

मुंगी


मुंगी साखरेला म्हणाली
“तू एवढी गोड कशी?”
साखर म्हणाली
वडील माझे “ऊस”
माझ्यात उतरलंय
त्यांचे अति गोड रक्त
म्हणून असावी मी ‘गोड’
ते देखील तुम्ही मुंग्या
व माणसे म्हणता म्हणून
मला माझी चव कशी कळणार?
तुम्हा मनुष्याना देखील
कुठे कल्पना असते
आपल्या स्वभावाची?
स्वभावाचे मोजमाप 
आप्तजन ठरवितात,
‘तो वडिलांसारखा एक कल्ली’
‘तीआई सारखी फटकळ’
अशा सोयीस्कर गैरसमजुतीत
गोड मानतात.
आहे की नाही गोड  गम्मत!





Sunday, August 19, 2018

पोपट



ऐका देऊनी तुमचे  कान 
होऊन थोडेसे  लहान
                                                           एके दिवशी काय झाले...

आला भुर्कन उडत पोपट हुशार
बसला पट्कन फांदीवर,
शोधू लागला पेरू हिरवागार
अचानक... 
सुटला वारा सुसाट न थंडगार,
ढग गरजले, बिजली कडाडली,
पावसाने घातले थैमान
झाडे रंगवली हिरवीगार,
वाऱ्या पावसाचे पाहून रुद्र रूप
भिजून पोपट थंडीने कुड कुडला  
लपून,दडून बसला  पोपट,
पानामागे चिडी चूप.


जसा पाऊस पळाला, वारा थांबला,
तसा पेरू शिवाय, 
हुशार पोपट भुर्कन,उडून गेला,
अन गोष्ट ऐकता..ऐकता
बाळ माझा झोपी गेला,





Friday, August 17, 2018

मी


'म' लाविसरू या
'मी' कोण?
'मी' काय केले
मी हे मिळविले
'मी' काय गमावले

हे 'माझे, ते माझे,
मी, मला, माझे
विसरूया

हो विसरणे सोपे नाही
प्रयत्न करावयास काय हरकत?
व्हा तयार,

असाध्य ते साध्य
करिता सायास
कारण अभ्यास
तुका म्हणे.


Thursday, August 16, 2018


सर! 
नुसते सर नव्हे   
तर पवार सर!
पवार सर इतर सरां पेक्षा वेगळेच!!!
म्हणजे कसे?
ष-षटकोन
ष-षटकार
ष-षड्रिपू
ष-षांंताराम
ज्याला आवडले त्याला कायमचे आवडले
ज्याला नाही आवडले
त्यांनी खूप काही गमावले
कसे काय?
पवार सर म्हणजे
स्विस नाईफ!!!
कदाचित त्यापेक्षा थोडे जास्तच
एका मेंदूत 
दडलेली अनेक माणसे!
पवार सर -उत्कृष्ट पेंटर 
पवार सर-भन्नाट  कवी
पवार सर-उत्कृष्ट ३ डी डिजायनर
पवार सर-योग्य मार्गदर्शक
पवार सर-अचूक रत्नपारखी 
पवार सर-स्पष्ट  वक्ता
पवार सर-जिवलग मित्र
पवार सर-अफाट व्यासंगी वाचक 
पवार सर-दांडगी कल्पना शक्ती
आणि बरेच,,,  
यातील तुमच्या आवडी प्रमाणे
योग्य असलेले गुण आपण घ्यायचा
माझ्या सारख्या अनेकांना 
सराकडून काय मिळाले?
आमच्यात दडलेला 
आ त्म वि   श्वा   स ! त्यांनी जागा केला 
ज्यांनी सरांची विविध रुप प्रेमपूर्वक  न्याहाळली,
त्यांनी  थोडा वाण नाही 
पण गुण नक्कीच अंगिकारीला
 मला   स्वतःला मात्र आणखी एक गोष्ट मिळाली 
त्यांच्या पेन्सिलचे तुटलेले टोक
ज्यांनी आज थोडे फार ह्या ब्लॉगवर 
आत्मविश्वासानी मी मन मोकळे करू लागलो.
आज तुमचा जन्म दिवस
आमचा भाग्य दिवस 
तुम्ही ह्या जगात प्रवेश केलात 
म्हणून आम्ही घडलो 








Tuesday, August 14, 2018

७१ वा स्वातंत्र्य दिन...??


‘भारत’ तेरी उमर कितनी?
७१ साल की
७१ साल मे क्या देखा
क्या सुना, क्या सहा?
बहूत कूछ देखा, सुना, और सहा
पण काय? ... काय?
लोक संख्या ४० कोटी
वरून जवळ जवळ १५० कोटी झाली,
१५ पंतप्रधान पहिले,
काहींनी घोषणा केल्या,
काहींनी बदलीची खुर्ची गरम केली.
एका पंत प्रधानाने चक्क १० वर्षे मौन पाळलेले पहिले.
तुझ्या पाहण्यात  कुठल्या घोषणा यशस्वी झाल्या.
सर्वच,
खर? सांग कुठ्ल्या, कुठल्या
जवाहार जी  ने नारा लागाया, ‘आराम हराम है{.
या नंतर लोक आराम करायला लागले!
जय  जवान जय किसान!
ह्यांचा जय जयकार होण्या आधीच
लाल बहाद्दुर जी चल  बसे;
आगे क्या हुंआ?
इंदिराजी बोली ‘गरिबी हटाव’
उसके बाद सारे ‘गरीब हि हट गये’
भारतीय जनता पार्टी का  ‘इंडिया शायनीग’देखा
मुझे तो कहि  पर ‘शाईन’ नजर नाही आई ,
२०१४ अब की बार आले मोदी सरकार,
त्यांनी नारा दिला
 ‘सब का साथ, सब का विकास’
५ व्रर्षे गेली, विकासाबरोबर
नोटबंदी,जी एस टी,वाढणारी बेरोजगारी सारखे 
त्रासदायक प्रकार पाहिले .नावाजलेल्या उद्योगपतींनी
कोटी कोटीचे आर्थिक घोटाळे करून
देशाची अर्थ व्यवस्था मोडून टाकलेली पाहिली.
पंतप्रधानानी , मारुती प्रमाणे केलेली
पृथ्वी प्रदक्षिणेची उड्डाणे पाहत राहिलो.
या बरोबरच,
आणीबाणी,नसबंदी,स्त्रियांवरील
अत्याचार, सीमेवरील घुसखोरी,काश्मीर प्रश्न,
शेतकऱ्यांच्या आत्महत्या,
आरक्षणे,असे भेडसवणारे, इंदिराजी, 
राजीवजी की हत्याअसे 
घृणास्पद प्रकारही पहिले.

जनतेला माझा, 'भारत' देशाचा सवाल
१९४७ ते २०१८ शहरे सुधारली,
खेड्यांचे काय?गरीबी, लोकसंख्या,
जात पात, धर्मवाद, लाच लुचपत,
घराणे शाही,शेतकऱ्यांच्या आत्महत्या असे  अनेक प्रश्नावर
तोडगा काढणारे प्रामाणिक
सरकार कधी येणार ?

हा दरवर्षी  येणारा स्वातंत्र्य दिन 
कशासाठी म्हणून साजरा करायचा?
केवळ एकच नारा यशस्वी झाला
“ इंग्रज भारत छोडो!”म्हणून
कीं
लाऊड स्पीकरवर ‘ मेरे देश की... 
वाजवण्यासाठी?
शहरात फ़्लॅशड़ान्स 
करण्यासाठी?
एक मेकास मोबाईल वर मेसेज करण्यासाठी?
कीं
 केवळ 'भारत माझे जन्म स्थान  आहे ' म्हणून?
कीं...?







तू कोण?


चाक फिरे गरागरा
माती फिरे गरागरा
मातीचे झाले घडे
कुंभाराचे काम संपले ?
मडकी गेली दूरदूर
प्यायली पाणी, परदेशी
परतली जशी मायदेशी,
घड्यानी प्रश्न केला कुंभाराला
तू कोण?
कुंभार उत्तरला

सांगेन कधी तरी ...

Sunday, August 12, 2018

श्रावण


श्रावण एक आठवण.
जे. जे. ईनस्टीट्युट ऑफ अप्लाईड आर्टच्या प्रवेश द्वारातून आलेला विद्यार्थी हा वास्तूच्या प्रेमात पडलाच पाहिजे, मी देखील असाच प्रेमात होतो. ५ वर्षात रोज घरी जातांना आम्हा मित्र मंडळीचा पाय निघता निघत नसे. कॅन्टीन हे आमचे दुसरे घर होते. मी मे महिन्याची सुट्टी देखील मी आवारात असलेल्या कॅन्टीन मध्ये घालवत असे.
 ५वर्षे कधी संपली हे कळलेच नाही. निकाल लागण्या अगोदर मला एमसीएम नावाच्या जाहिरात कंपनीत नोकरी लागली, नोकरीची वेळ सकाळी ९:३० ते ६ मी रुजू झालो. तो महिना मे होता. पहील्या दिवशी ६ वाजेपर्यंत वेळ कसातरी काढला.दुसऱ्या दिवसापासून मात्र ४:३० वाजता जे जे कॅन्टीन चे वेध लागायला सुरुवात झाली, पुढचे काही दिवस मला ६वा.पर्यंत बसवेना काहीतरी कारण सांगून मी ऑफिस मधून निघून जे जे मध्ये येऊन बसायचा, पण हे थापांचे गणित जास्त दिवस नाही चालले, कारण मला कामाच्या डेड लाईन सांभाळाव्या लागायच्या. ह्या नाखुशीत कसे बसे २ महिने काढले. पण मन मात्र जे जे च्या ओढीने दु:खी व्हायचे.
एवढ्यात श्रावण महिना लागला व माझ्या सुपीक डोक्यात वीज चमकली. पहिलाच श्रावणी सोमवारी लंच नंतर थोडासा धीर करून जैन साहेबांच्याटेबला जवळ गेलो व म्हणालो “सर आज से हमारा श्रावण महिना शुरू होता है”
जैन निर्विकार चेहर्यानी... तो?
मी घोडा दामटून, वो हमारेमे एक महिना सूर्य डूबनेके पहिले पूजा करके उपास छोडना होता है, तो ये एक महीना हम ४:३० बजे जा सकते है क्या?जैन माझा चेहरा न्याहळत म्हणाले ठीक है और किसको जाना है वो जा सकते है. मी पानिपतची लढाई जिंकलेल्या अविर्भावात त्याच्याकडे पाठ करीत आभार मानले. त्या नंतर एक महिना आम्ही सर्व आर्टिस्ट.  ४ वाजता बाहेर.
पुढचे सर्व श्रावण महिने रोज जे जे मध्ये जाऊन बसण्याच्या आनंदाची गोडी आजवर मी चाखली नाही. नंतर मात्र ओळखीची शेवटची बॅच पास झाल्यावर मी श्रावणातले उपवास सोडले व करिअर मार्गी लागलो.

लग्न



लग्न.

एक बंधन, आनंदाचे क्षण,
कोणाकरिता? आई वडीला करिता?
कुटुंबाकरिता?आप्तेष्टाकरिता,
की फक्त वधूवराकरिता,
आनंद हा प्रत्येकाच्या मानण्यावर
अवलंबून असतो.
उदाहरणार्थ
आमच्या जवळील
झोपडपट्टीतील लग्नाचा आनंद
ब्यांडबाजात असावा, कारण
बेसूर गाणे व ढोल ताशाचा
आवाज (वापर)हा बहुतकरून
वर वधूस बहिरे करण्यासाठी
असावा,जेणेकरून
पुढील संसार सुखाचा व्हावा.
आहे की नाही सुखी संसाराची
आनंदी गम्मत.




चाफा आणि सोनटक्क्याचेअबोल प्रेम

 मी पाहिलंय ते अबोल प्रेम,    ते देखील दुतर्फी, विचार करा १ नाही तर ५ वर्षे  त्याचे रोज तिच्या बाकावर  नियमितपणे ती यावयाच्या पूर्वीच  हळुवा...