मी जन्मतः शहरवासी.
ग ला काना गा +व =गाव. एक शब्द.
बाकी सर्व कल्पनेत रंगवलेले म्हणजे
माझ्यासाठी ‘गाव’
शाळा,कॉलेज मध्ये असताना सुट्टीत बरीचशी मुले गावी
जायची,
परतल्यावर गावाचे वर्णन मुलांकडून ऐकल्यावर
गावा विषयी कुतुहुल वाढायचे. पण...मोठा
होईपर्यंत
‘गाव’
हा मात्र एक शब्दच राहिला.
देशभरच्या प्रवासाने मी शहाणा झालो
गाव म्हणजे काय याचा उलगडा झाला
,
आपलेही एक गाव असावसे वाटले
शहर एक नशा आहे.ना शुद्ध हवा ना
शुद्ध पाणी
निसर्गाशी नाही नाते.
डोंगर ,नद्या, झरे, हे सारे सोडून,
गावातील हे लोंढे शहराकडे का आकर्षित होतात?
कारण...
......................................
सुज्ञास सांगणे न लागे.
तरी सुद्धा...
गावकऱ्याला शहराची ओढ,
शहरवासियाला गावाची ओढ.
तुम्हीच सांगा.
आहे का हि गम्मत?
Excellent poems...very deep thoughts and thinking.
ReplyDelete